टूर निघाली टूर निघाली कोकण हौसला टूर निघाली
मेजवानीचा खासा बेत आता नो वेट वेट.
दिवस,तारीख,ठरली वेळ मैत्रिणींचा जमला मेळ
महिला आमच्या भारी हौशी सत्तर,ऐंशी,तर कुणी षोडशी
कोण म्हणे मी शाकाहारी कोण म्हणे मी मांसाहारी
दोन्हीचा स्वाद घेईन म्हणतेय मी खरी
सुरमईची घशी घरगुती चिकन भातावर मिळेल का माशाच कालवण.
काजूची उसळ आणि आलू लपेटा मस्त करू टाकूया सगळंच फस्त
आत्ताच लागली सपाटून भूक त्यात थीम ठरली वेस्टर्न लूक.
चला निघुया करूया गंमत छान जमेल अंगत पंगत.
गट क्रमांक २
मधुरा मधुकर कासार
पारितोषिक : तृतीय क्रमांक (विभागून)
लोकशाहीत शासकीय यंत्राचे वापर | गैरवापर
“लोकशाही" म्हटले की, लहानपणी नागरिकशास्त्रात शिकलेली लोकशाहीची पहिली व्याख्या आठवते. " लोकांनी लोकांसाठी तयार केलेल शासन म्हणजे लोकशाही, ही पद्धत्त महत्त्व बहुसंख्येला व अल्पसंख्येला देते. सरकार निवडून येणे हे लोकांच्या पदरात येऊन पडते ते म्हणजे लोकशाही मुळे. सरकार लोकांना चालवत नाही तर लोक चालवतात व पाडतात देखील. जगात बहुधा सर्वच देश लोकशाही आहेत 'क्युबा', 'वियेतनाम' सारख्या देशांना वगळता. काही असेही देश आहेत जे स्वतःला लोकशाही म्हणतात. पण काम मात्र हुकुमशाही वाली करतात, याचे उत्तम उदाहरण चायना, रशिया आणि उत्तर कोरिया शिवाय कायच असू शकते. मग लोक सरकार ला चालवतात अशी समज असली तरी वस्तुस्थिती प्रचंड भिन्न असते, ती कशी हे मी तुम्हाला पटवून देते.
लोकशाहीचा 'ब्रम्हास्त्र' असतो 'निवडणूक' आणि तुम्हाला आणि मला देखील माहित आहे निवडणूक कशी होते. तुम्ही तुमच्या आवडीचे नेते निवडा असे म्हणून चायना सारख्या देशात निवडणूकीला तोच एकच पक्ष आणि त्याचा एकच माणूस दरवर्षी उभा राहतो आणि निवडून पण येतो. आता निवडणूकीतील 'पक्ष प्रचार' हा अतिशय गंमतीचा मुद्दा आहे. एक पक्ष बहुसंख्य गटाला पकडून बसते तर दुसरे अल्पसंख्येला आणि मग सुरू होते मारामार, शारिरीक नाही तर शाब्दिक, मग माणसांमाणसांमध्ये फुट पडते आणि ती नोकझोक पिढ्यान पिढ्या चालते. आता हिंदू-मुस्लिम हा वादच बघाना, माणसाच्या काळजी असला विषयी हे पक्ष घेतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात. आणि जितका बुद्धीमान आहे तितकाच तो मूर्ख व बालीश आहे. धर्म, पंथ, जात असे विषय आले की, वयाने माणूस मोठा असो अथवा लहान तो त्याची बौद्धिक पातळी तिथे बंदच पडते आणि त्यात तेल टाकतात ते म्हणजे त्या लोकशाहीतील पक्ष. मग एकतर हे कडू गोड नाते आयुष्य भर चालत राहते आणि मध्ये कधीतर रक्ताच्य आणि निमनुष्य झालेल्या माणसाचे ढीग लावते.
आता सर्वांच्या चर्चेतील आवढीचा विषय, 'भ्रष्टाचार' हे करणारे पण आतो लोकशाही पक्षच असतात. आता भ्रष्टचार फक्त लोकशाहीतच होते असे नाही. राजेशाही, हुकुमशाही यामध्ये पण भ्रष्टाचार होतोच की, मग लोकशाहीतील भ्रष्टाचारच लोकांना का खटकतो. त्याचं कारण अस असते की, राजेशाही अथवा हुकुमशाही मध्ये निर्णय घेणारा एकच असतो तर, जर तुम्हाला स्वतःचे काम करायचे आहे तर मग दया पैसे त्या एकालाच. पण लोकशाहीत तसे नसेत, ह्यात पॉवर' मध्ये असणोर लोकं बरेच आहेत. अगदी सरपंच पासून ते पंतप्रधान पर्यंत, मग अश्यात लोकांना अनेक शासकीय यंत्रांना पैसे द्यावे लागतात, आणि ह्या आतल्या आतील का ळाबाजारीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
ह्यावेळी मी तुम्हाला शासकीय यंत्रनोनी पॉवर'चा केलेला खरा गैरवापर सांगते. ९/११ नंतर अमेरिकाने त्यांच्या नागरिकांच्या दुरध्वनीवर नजर ठेवली होती, औपचारिक भाषेमध्ये 'टॅक : तर सरकार अधिक विचित्र कायच असेल असे जर तुम्हाला वाटत तर थांबा अजून बरेच विचित्र होणार आहे. त्यांनी त्या गोष्टी नंतर अनेक मुस्लिम धर्माच्या लोकांना ताब्यात घेऊन प्रश्न विचारले. आता त्यात काही चुकीचे वाटत नाही पण चुक तेव्हा होते जेव्हा प्रश्न विचारण्या ऐवजी त्यांना शारिरीक ७ हानी देऊन त्यांच्याकडून ती माहिती काढून घेते होते जे त्यांना माहितच नाही आहे. आता आतंकवादी हमला करणारी मंडळी इस्लामची होती म्हणून प्रत्येक अमेरिकन मुस्लिमांचा गळा पकडणे किती योग्य / अयोग्य आहे, हे तर आपल्याला माहितच आहे. आता अमेरिकाच असा देश नाही आहे ज्यांनी स्वतःच्या नागरिकांकडे चोर दृष्टा पाहिले होते. चायना मध्ये सार्वजनिक ठिकाणी ( रस्ता, उदयाक, सिनेमा गृह इ.) जेवढे पण 'सिसिटिव्ही' आहेत त्यांच्या वर सरकारचे लक्ष असते. एक नागरिक काय करत आहे आणि काय नाय हे सरकारत्या लगेच समजेते. तत्वज्ञांचे म्हणणे आहे की एका चायनिज नागरिक वर लक्ष ठेवण्यासाठी दहा कॅमेरा असतात, मग अश्या वेळी privacy आणि 'freedom' ही चार भिंतीच्या खोलीतच असते असे म्हणावे लागेल.
आता चायना आणि 'स्वतंत्राचा' विषय काढला आहे तर 'रशिया-उक्रेन चा उयुध्दाची मते अतिशय गंमतीची असतात. पण सरकारी कार्याबद्दल मत देणे हे तर घोर पापच असते मग की ते चायना मध्ये असो, अमेरिका का आपला भारत, 'पॉवर' असलेल्या पार्टीबद्दल तुमचे मत चांगलेच असले पाहिजे नाहीतर काय होते याच चित्र 'बॉलीवुड' दाखवतेच की, आपल्याला उत्तर कोरिया जो स्वत:ला लोकशाही म्हणतो, त्याची वस्तुस्थितीची भावन आपल्याला आहेच. माइकल जॅकसनचा नृत्य आणि बियोंसेच गाण मेकल तर तुम्हाला मृत्यूची शिक्षा होईल का, असे विचारले तर एकच उत्तर असणार, त्यांच्या हुकुमशाहाने हे हुकुम दिले आहे की अमेरिक कल्चर तिथे दिसलापण नाही पाहिजे. घराला आग लागली तर 'सुप्रिम लिडर्स' चे छायाचित्र पहिली बाहेर काढा, लोक माणूस मरतो आहे तर मरू दया. अशी ह्या लोकशाहीतील शासनाची प्रवृत्ती.
मग लोकशाही संपूर्ण निकामी असते असे नाही, लोकशाही धारण केलेली कित्येक देश आहेत ज्यांनी प्रगती केली आणि करत आहे. घोड्यांनी त्याच्या बांधलेली दोर स्वतःच तोंडात घेऊन चालणे व माणूस घोडरावास फक्त बसण्याचे धोरण होते. पण आता ती दोर त्या घोडसवार पक्षाच्या हातात आहे आणि हे सरकार व पक्ष लोकांना चालवत आहेत. म्हणून देशाची शासन पद्धत तेव्हा ठरते जेव्हा देशातील नागरिकांची स्थिती कळते. नागरिकांची स्थिती जर वाईटच आहे. दारिद्र, मारहाण, परातंत्र असे मग देश हुकुमाशाहीत असो का लोकशाहीत काय फरक जाणवेल.म्हणून लोकांनी आवाज उठवला पाहिजे, अन्याय तुमचा शेजारी करत असो वा सरकार, माणसानी झुकले नाही पाहिजे. माणसाला माणूस असल्या दर्जा मिळाचलाच पाहिजे, तेव्हाच तर लोकशाहीची व्याख्या वस्तुस्थितीत दिसेल, आणि आत्तापर्यंत तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल असे गृहित धरते.
“लोकशाही हि सर्वोच्च आहे आणि ती म्हणजे नागरिकांमुळे" अज्ञात.
गट क्रमांक १
क्षितिजा चंद्रकांत मोरे
पारितोषिक : व्दितीय क्रमांक
* विज्ञानाचे महत्त्व *
पृथ्वीतलावरील मानवाला प्राप्त झालेले अदभुत यश व वरदान म्हणजे विज्ञान होय. विज्ञानाच्या मदतीने मानवाने पृथ्वीवर लावलेले अदभुत शोध हे अद्वितीय आहेत. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची ताकद व शक्ती ही विज्ञानात आहे.
'सूर्यजालमरीचिस्थं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः । तस्य षष्ठतमो भाग: परमाणुः स उच्यते ||
विज्ञानातील अणू (atom) या घटकाचाच म्हणजे सगळ्यात छोटा. निश्वयव असा सहावा भाग म्हणजे परमाणु होय. कणाद ऋषींनी परमाणुची व्याख्या या संस्कृत श्लोकात नमूद करून ठेवली आहे. विज्ञानाच्या भाषेत परमाणुलाच sub-atom असे म्हणतात. यावरून हे समजते की प्राचीन काळी आपले विज्ञान प्रगत होते.
आपल्या पृथ्वीवर कदाकाळी महाकाय असे प्राणी होऊन गेले. त्यांचेच काही गुणधर्म असणारी प्राणी व पक्षी आज पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत', असे आपल्याला कोणामुळे समजले विज्ञानामुळेच.
'विज्ञानामुळे आज' आपण आरामदायी व सुखद असे जीवन जगू शकत आहोत. मानवाच्या दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. सकाळी उठल्यावर दात स्वच्छ करण्यासाठी लागणारा टूथब्रश, संध्याकाळी ऑफिसमधून दमून भागून आल्यावर बाबांना लागणारा. थंड हवा देणारा पंखा, 'रात्रीचा किट्ट काळोख नष्ट करण्यासाठी लागणारा दिवा. आईला जेवण बनवण्यासाठी लागणारा गैस अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात पाहतो.
अद्भुत असा गुरुत्वाकर्षणाचा शोध 'न्यूटन' यांनी विज्ञानाच्या मदतीने लावला. या शोधामुळे आपल्याला भरती व ओहोटी का होते ? हे समजले. विज्ञानाच्या मदतीने Edmond Bequerel यांनी सौरऊर्जेचा शोध लावला. हा शोध/ संपूर्ण मानवजातीसाठी व तसाच हा वसुंधरेसाठीही महत्त्वपूर्ण ठरला. विज्ञानामुळे लागलेला विजेचा शोध हा आजच्या युगात 'अमृततुल्य ठरला आहे. त्यांच्या या शोधामुळे आज आपण अनेक उपकरणांचा वापर करू शकत आहोत. त्यांच्या या शोधामुळे आज आपले जीवन सुखद बनले आहे. आपण सदैवच अप्रत्यक्षरित्या त्यांचे ऋणी राहू.
आपल्या वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या सोबतीने घडून आणलेला सगळ्यात अद्भुत असा आविष्कार म्हणजे संगणक. जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विचार थोडक्यातच संपूर्ण जगालाच एकत्र आणण्याचे या संगणकाने केलेले आहे. या विज्ञान युगात प्रगतीचा खरा मंत्र म्हणजे संगणकाविषयीचे ज्ञान असणे असा बनला आहे.
मोबाईल, टॅब हे तर संगणकाचेच भाऊबंध. बिजेचे बील असो वा दूरध्वनीचे बील असो किंवा रेल्वे, विमान यांचे तिकिट काढण्याचे काम असो, विज्ञानाचे आविष्कार संगणक व त्यांचे भाऊबंधत्व आपले मदतगार ठरले आहेत.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण, नोकरदारांचे व वर्क फ्रॉम होम व अबालवृद्धांचे मनोरंजन या सर्वांसाठीच विज्ञानाचे हे आविष्कार देवदूत उरले.
ज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी विज्ञानाने लावलेला छपाई यंत्राचा शोध हा अदभूत आहे. या छपाईयंत्राच्या शोधामुळे आपल्याला घरबसल्या अनेक बातम्या, माहिती, जगात घडणाऱ्या घडामोडी या वर्तमानपत्रे, मासिके व नियतकालिके यांच्या माध्यमाने समजतात. लेखकांच्या आवृत्या, त्यांचे लेख हजारोंच्या संख्येत या छपाई यंत्राच्या माध्यमाने छापून निघतात.
विज्ञानाने भूमीवर विलक्षण असे चमत्कार घडवून आणले आहेत. विज्ञानाने ओसाडी वाळवंटी प्रदेश नंदनवनांनी, फुलापाखरां नी पशुपक्षांनी फुलून जायला निघालीत. कृषी क्षेत्रात विज्ञानाने प्रगती घडवून आणली. नानाप्रकारांच्या बियांवर मानव विज्ञानाच्या तंत्राच्या मदतीने प्रयोग करू लागला. अनेक विविध यंत्र तयार होऊ लागली. विज्ञानाने मानवाप्रमाणेच चालणारा, बोलणारा रोबी मानव बनवला.
विज्ञानाप्रमाणेच मानवही विज्ञानाचा सोबती बनला. त्यांनी भूमीप्रमाणेच वसुंधरेप्रमाणेच सागरावरही विजय मिळवला. अथांग सागरातील अनेक गुपिते. सागराच्या आतील भूरचना, वनस्पतीसृष्टी, तेथील जीवसृष्टी यांचा अभ्यास मानव विज्ञानाच्या मदतीने करू लागला. सागरातील 'मरियाना गर्ता ' समजून घेणे हे ध्येय वैज्ञानिकांनी ठेवले आहे.
विज्ञानाच्या मदतीने निर्मित केलेली कृत्रिम उपग्रहे अवकाशात सोडून विज्ञान अमर्याद अवकाशावर संशोधन करू लागला आहे. डॉ. स्टेपल हॉलिंग' यांच्या मते, “विज्ञान अंतराळातील अनेक गुपिते जाणून घेईल. त्याचे मूळ त्याचा इतिहास व त्याचा विनाशही विज्ञान समजून घेईल." असा डॉ. स्टेपन हॉकिंगचा विश्वास विज्ञान सत्यात उतरवू पाहत आहे. आपल्या अंतराळात असलेल्या असंख्य आकाश- गंगा'. त्या आकाशगंगांतील अनेक सूर्यमाला. त्या सूर्यमालेतील अनेक ग्रह, त्या ग्रहांवरील भूरचना, तेथील जीवसृष्टी', हवामान, मृदा, इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास मानव विज्ञानाच्या मदतीने करण्याच्या प्रयत्नात आहे.
मानवाच्या व्यक्तीगत जीवनाप्रमाणेच विज्ञानाने औदयोगिक क्षेत्रातही क्रांती घडवून आणण्याचे काम केले आहे. आपण जीवघेण्या रोगांवरील रामबाण, जीवनदायी अशी औषधे फक्त आणि फक्त विज्ञानाच्या मदतीने करू शकलो. यामुळे अनेक निष्पाप जीव या जीवघेण्या रोगांच्या वेढ्यातून निसटून सुखरूप झाले. अपघातातून अपंग झालेल्या व्यक्तीनो आपण कृत्रिम अवयव लावू शकतो. हाही विज्ञानाचाच चमत्कार.
जसे विज्ञान जीवनदान देऊ शकते. तसेच मरणही देऊ शकते. मानवाने विज्ञानाच्या मदतीने अणुबॉम्ब सारखे विध्वंसक असे शस्त्र बनवण्यास सुरुवात केली. आणि यांच मुळे अनेक राष्ट्र सुरक्षित बनली.
विज्ञानाचा आणखी एक शोध म्हणजे प्लास्टिक. आपण म्हणतो प्लास्टिक वाईट आहे पण हे त्याच्या वापरावरून ठरते. मानव जसा विज्ञानांच्या आविष्कारांचा वापर करेल तसाच फायदा किंवा तोटा मानवाला मिळेल. त्यामुळे विज्ञान वाईट आहे असे म्हणता येणार नाही.
विज्ञानामुळे मानव व्यवहारी बनला आहे. विज्ञानांचा आविष्कारांचा वापर कल्याणासाठी करायचा कि वि नाशासाठी हे मानवावर अक्लंबून आहे. जशी अश्वाची दौड ही त्याच्या सारथीवर अवलंबून आहे तशीच अश्वारूपी विज्ञानाची दौड ही मानवावर अवलंबून आहे.
गट क्रमांक १
वेदांती शैलेन्द्र कदम
पारितोषिक : उत्तेजनार्थ
परीक्षा नसती तर .....!
वाह ! काय कल्पना आहे. काहीच अभ्यास करायला नको. नुसती मज्जाच मजा. साप्ताहिक परीक्षा, मासिक परीक्षा नाही. प्रथम चाचणी, प्रथम सत्रांत, द्वितीय चाचणी, द्वितीय सत्रांत परीक्षा नाहीत. मौखिक परिक्षा पण नाही, मग काय पाठ करायला नको की आठवायला नको. खरचं या परीक्षांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात ताण आणला आहे एक झाली की दुसरी मग तिसरी हे चक्र चालूच राहते.
आजच्या स्पर्धेच्या,
धावपळीच्या आणि विज्ञानयुगाच्या जगात आजचा विद्यार्थी हा विद्यार्थी
(विद्या + अर्थी:
विद्या संपादन करणारा)
परीक्षार्थी झाला आहे. मला एवढे गुण,
एवढी श्रेणी मिळाली
पाहिजे हाच उद्देश.
भले विषयाचे आकलन होवो न होवो.
कधी कधीतर स्मरणशक्तिचीच परीक्षा
होत असल्यासारखे वाटते.
खरचं परीक्षा नसत्या तर?
पुस्तकांचा जन्म तरी झाला असता हे सांगता येणार नाही.
ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो त्यांना तर काय आनंदी आनंदच.
पालकांचा शिकवणी, मार्गदर्शिका,
अपेक्षित प्रश्नसंच यांवर खर्चच झाला नसता.
कधीकधी उत्तरपत्रिका गहाळ होणे,
प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटणे,
प्रश्नपत्रिकेसाठी परीक्षकांना लाच देणे,
परीक्षेत विद्यार्थ्याने कॉपी घेऊन जाणे असे अनुचित
/गैरप्रकार घडलेच नसते.
शिक्षकांचे प्रश्नोत्तर, शंकानिरसन असे व्याप वाचले असते.
बक्षीस समारंभच झाले नसते.
'सगळे विद्यार्थी एकसमान
1" सगळे विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलले गेले असते.
परीक्षा नाहीत म्हणून
विद्यार्थ्यांनी अभ्यासच करणे सोडून दिले असते.
परीक्षा नसती तर 'बाळा अभ्यासाला बस' असे सांगावे लागले नसते. आई-वडिलांचा मार खायचा वाचला असता. मुलांनी आपल्या आवडत्या छंद, कला यांमध्ये प्रावीण्य मिळवले असते. जसे संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, खेळ यामध्ये कोणाला ना कोणाला तरी असतो. यांतूनच पुढे प्रसिद्ध खेळाडू जसे मा. सचिन तेंडूलकर, मा. विश्वनाथ आनंद, मा. सायना नेहवाल, मा.गीत सेठी, मा. मेरी कोम इ. कलाकार जसे उस्ताद झाकीर हुसेन, पं. जसराज, मा. स्व. लता मंगेशकर, मा. आशा भोसले असे गायक, गायिका जन्माला आले असते.
अपेक्षित गुण /श्रेणी मिळवण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. आपली आवड, छंद, कला यांना बाजूला ठेऊन पुस्तकी किडा होतात. निकाल लागल्यावर जर मनासारखे गुण मिळाले तर वाहवा ! नाहीतर आई- बाबांची बोलणी खावी लागतात ते वेगळे. कधी कधी तर विद्यार्थी आपला आनंदच आत्मविश्वासच गमावून बसतात.
जशा नाण्याला दोन बाजू आहेत: तशाच या परिस्थितीला पण दोन बाजू आहेत. परीक्षा नसतील तर विद्यार्थी आळशी होईल. संस्कृतमध्ये म्हटलेच आहे, अलस्य कुतो विद्या अविदयस्य कुतो धनम् । आळशी माणसाला कुठे विद्या ? आणि विद्यविहीन माणसाला कुठे कुठली धनप्राप्ती? थोडक्यात काय जीवनात अंधारच.
परीक्षा नसेल तर विद्याथ्र्यांनी काय ज्ञान
मिळवले हे कळणार कसे?
ज्ञानाची कसोटी घेण्याची
परीक्षा हेच साधन आहे.
परीक्षा नसेल तर कायमची सुट्टी असल्यासारखे वाटेल.
मग सुट्टीचाही कंटाळा येईल.
पुष्कळ अभ्यास करून परीक्षा
दिल्यावर मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद अवर्णनीय असतो.
त्याशिवाय चांगले गुण मिळवून जी
'वाहवा' होते ती वेगळी.
मागील दोन वर्षी असलेल्या करोनाच्या
संसर्ग संकटात परीक्षाच काही ठिकाणी घेतल्या गेल्या
नाहीत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक
नुकसान तर झालेच
पण त्यांचे लिहावयाचे सराव पण गेले
त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला.
लिहण्याच्या सरावाने स्मरण
शक्ती सुद्धा वाढते. करोनाकाळात झालेल्या परीक्षा न झाल्याचे
मुलांचे शैक्षणिक नुकसान हे याचे उत्तम उदाहरण
आहे.
करोनाकाळात on-line (थेट - प्रक्षेपण ) पद्धतीने शिक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्या अडथळी झाल्या त्या लक्षात राहिलेल्या आहेत. शिक्षक- विद्यार्थी संवादाचा अभाव, शंकानिरसन न होणे, लिहण्याचा सराव न होणे, हे सर्वांनीच अनुभवलेले आहे. आजच्या संगणयुगात जरी सर्व सहज उपलब्ध असेल तरी जीवनात यांत्रिकता नाही आली पाहिजे म्हणून परीक्षेचा आधार घ्यावा लागतो.
खरत तर शिक्षणपद्धतीत थोडे बदल घडावयास हवे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची गोडी लावली
पाहिजे. 'Learning by doing' कृतींतून शिकणे
या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने आदान-प्रदान
(देवाण - घेवाण) या पद्धतीने केले तर त्यांचे ज्ञान भक्कम होते.
वर्गामध्ये छोट्या छोट्या कोडी,
विनोद, प्रश्नमंजूषा, वाद-विवाद याने विद्यार्थ्यांना अभ्यास हे ओझे न वाटता,
अभ्यास हा जीवनाचा अविभाज्य घटक वाटेल.
याने त्यांचे सामान्य ज्ञान पक्के तर होतेच पण संबंधित विषयाचे ज्ञान पण वाढते.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांना परीक्षेला आनंदाने
सामोरे जाणे आवडेल.
विद्यार्थ्यांना घोकंपट्टी हे स्थान कामा येऊ नये,
यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसो बत शंकानिरसन करून घ्यावे.
परीक्षेमुळे स्वावलंबन,
स्वयंशिस्त यांची सवय लागते.
कमी गुण मिळाले तर खचून न जाता;
आपण कुठे चुकलो, आपण स्वतःला कसे सुधरवू शकतो याचा विचार करायचा.
छोट्या छोट्या चुकीमुळे
शिकत माणूस बराच मोठा होतो.
हे पुढच्या मोठ्या परीक्षांमध्ये व आयुष्यात उपयोगी येते.
वेळेचे बंधन, वेळेचे नियोजन यांची पण सवय परीक्षेतून लागते.
विद्या ददाति विनय विनयाद याति पात्रताम् । पात्रत्वादनमाप्नोति धनादर्मं ततः सुखम्
|| विद्ये सोबत विनय (नम्रता)
येते, विनयसोबत पात्रता (सृजनता)
येते, पात्रतेने धनप्राप्ती
होते, धनामुळे धर्म आणि धर्मामुळे सुखप्रप्ती होते.
थोडक्यात विद्यार्थ्यांनी
परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जाऊन ज्ञान प्राप्त करून सुखकर व्हावे.
म्हणून पालकांनी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जाण्यासाठी
प्रोत्साहन दयावे, याची गरज आहे.
गट क्रमांक १
आर्य अनंत पार्टे
पारितोषिक : उत्तेजनार्थ
माझा आवडता सण / उत्सव : दिवाळी
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. या सणाला दिपावली असेही म्हणतात. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा सण हिंदूसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय लोकप्रिय असा सण आहे. दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा सण येतो. संपूर्ण भारत देशात आनंदाचे वातावरण पसरलेले असते.
दिवाळी या सणाच्या दिवशी प्रभु श्रीराम आपल्या १४ वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परत आले होते. अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले आणि हा आनंदोत्सव साजरा केला होता. आजही ही प्रथा कायम आहे. आजही आपण असत्यावर सत्याचाच विजय होतो या भावनेने हा सण आनंदाने साजरा करतो.
मुख्यतः दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे आहेत ते पाच दिवस. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. नरक चतुर्थीला श्रीकृष्ण यांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजन या दिवशी सकाळी लवकर उठून शरीराला उटण लावून अभ्यंग स्नान केल जात. नवीन – नवीन कपडे घातले जातात. लक्ष्मीची आणि गणपतीची पूजा-अर्चा केली जाते. गोवर्धन पूजा या दिवशी वासरासह गाईची पूजा केली जात. आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. आणि भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो. हा दिवस बहीण-भाऊ या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
दिवाळी सणाच्या दिवशी संपूर्ण घर खूप सुंदर रित्या सजवलेले असते. 'देव्हारा सजवला जातो. घरात – घराबाहेर फुलांची सजावट केली जाते. सुंदर तोरणे लावली जातात. घराच्या दारासमोर अतिशय सुंदर अश्या रांगोळ्या काढल्या, जातात. अशा प्रकारे संपूर्ण घर सजवले जाते. पण ही सर्व तयारी एक महिना अगोदर पासूनच सुरु केली जाते. नवीन कपडे खरेदी केले जातात. दिवे, तोरणे, आकाश कंदिल, रांगोळ्या व सजावटीचे साहित्य, भांडी इत्यादी वस्तु खरेदी केले जाते आणि दिवाळी या सणातील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे फटाके आणि फराळ.
दिवाळी या सणात विशेषत: शाळकरी मुलांची आणि सरकारी नोकरी करत असलेल्या अधिकाऱ्यांची खूप मजा असते. सर्व शाळांची, सरकारी कार्यालयांची साफ सफाई या दिवाळी सणाच्या वेळेस केली जाते. रंग-रंगोटी केली जाते. आणि शाळकरी मुलांना, सरकारी अधिकाऱ्यांना दिवळीची विशेष सुट्टी देखील दिली जाते. आम्ही मुले फार आनंदी असतो. घरात आईने तिच्या हाताने फराळ म्हणून चिवडा, चकल्या, लाडू, करंज्या केलेल्या असतात. गोड म्हणून पंचपक्वान देखील बनवलेले असतात. या सर्वांचा आस्वाद वर्षातून फक्त एकदाच घेता येतो. त्यामुळे सर्वांनी दिवाळी या सणाचा जेवढा आनंद लुटता येईल तेवढा आनंद लुटला पाहिजे.
गेली दोन वर्ष / अडीज़ वर्ष कोरोना विषाणूची महामारी संपूर्ण जगात सुरु होतो. या कोरोना विषाणूने अडीज वर्ष संपूर्ण जगभरात थैमान घातलं होते. करोडो जीवांचे बळी या प्राणघातक विषाणुने घेतले. २०१८ पासून ते २०२१-२२ पर्यंत ही महामारी टिकून राहिली. या कोरोना काळात कोणालाच काहीच करता येत नव्हतं, घरातून बाहेर पडता येत नव्हतं, कोणतेच सण / उत्सव पूर्वीच्या जल्लोषात, आनंदात, उत्साहात साजरे करता येत नव्हते. सरकारने दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश दिले. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे सांगितले. या कोरोना महामारीच्या काळात गरिबांचे प्रचंड हाल झाले. पूर्वी सर्व दुकाने दिवाळीच्या सजावटीच्या सामानाने फटाक्यांनी भरून जायचे. बाजारात भरपूर गर्दी व्हायची. पण कोरोना काळात सर्व दुकाने – उद्योग धंदे बंद असल्यामुळे गरिबांचे हाल झाले. दिवाळीत दिवे विकणारे, आकाशकंदिल विकणारे, रांगोळ्या. तोरणे विकणारे यांच्या प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
पण आता कोरोना विषाणू आटोक्यात आला आहे. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेत आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटत आहे. सर्वत्र पुन्हा आनंद पसरत आहे आणि
यंदा येणारा २०२२ चा दिवळी सण संपूर्ण जग पूर्वीच्याच उत्साहाने आनंदाने साजरा करणार आहे.
दिवाळी सण आला की सर्वत्र आनंद तर पसरतोत पण त्याच बरोबर एका गोष्टीमुळे होणार त्रास व त्याचा धोका देखील बळावतो. ती गोष्ट म्हणजे फटाके. मुलांना फटाके फोडायला खूप आवडतात. मुले फटाके इतक्या मोठ्या प्रमाणात फोडतात की त्याने वायू प्रदूषण तर होतेच पण त्याचा त्रास त्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही भोगावा लागतो. फटाक्यामध्ये प्राणघातक विषारी घटक असतात. त्यामुळे मुलांना व इतर नागरिकांनाही श्वसनाचा व फुफुसांचा त्रास होण्याची मोठी शक्यता असते. इतकेच नाही तर मुलांच्या सावधपणामुळे मजा ही सजा होऊन जाते. की कधी-कधी यामुळे होणारा अपघात हा इतका मोठा असतो की त्यामुळे मुलांना आपला जीव ही गमवावा लागतो. कधीकधी जखमी अवयव गमवावा लागतो. त्यामुळे फटाके जास्त न फोडता, वायप्रदूषण न करता आणि मृत्यूला आव्हान न देता आपण सर्वांनी दिवाळी हा सण आनंदान साजरा केला पाहिजे.
आले दाराशी सूख
निमित्त करून दिवाळीचे
मतभेद, भांडण सारे विसरून
रंग उधळूया प्रेमाचे ! ! !
तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे दिपावलीच्या मोरपंखी शुभेच्छा !!!
गट क्रमांक १
अक्षय दत्तात्रय कलंबेकर
पारितोषिक :उत्तेजनार्थ
असेच का अन तसेच का
प्रश्न पडले जर मनाला
अचूक उत्तर मिळेल तुम्हाला
प्रश्न विचारता विज्ञानाला
या ओळींप्रमाणे आज आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे आहे. म्हणून, तर असे म्हणतात की आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञानामुळे मानवाच्या जीवनातील दैनंदिन कामे सुलभ व अधिक सोपी झाली आहे. विज्ञानाच्या सहाय्यतेने मानवाने बरीच प्रगती केली आहे, अश्मयुगीन काळामध्ये विज्ञानाशिवाय मानवाचे जीवन अतिशय खडतर होते. परंतु माणवाने प्रगती केली शोध लावले आणि संथ गतीने का होईना त्याने विज्ञान युगात प्रवेश केला. विविध शास्त्रज्ञानी तयार केलेले आविष्कार, त्यांनी लावलेले शोध त्यांना आपण बघतो आणि त्यांचा वापर सुद्धा करतो.
सध्याचेच उदाहरण घ्यायच म्हंटले तर २०१९ मध्ये COVID -19 नावाच्या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासले होते. त्यामुळे अनेकांचा जीव सुदधा गेला परंतु आपण काही लोकांचे प्राण वाचवू देखील शकलो. या साथीच्या काळात यापासून संरक्षण व्हावे यासाठी वापरले जाणारे मास्क, सॅनिटाईझर, लस इत्यादी गोष्टी विज्ञानामुळेच आपल्या उपयोगात आल्या.
आजकालच्या आपल्या दैनंदिन वापरातल्या आपल्या आवडत्या गोष्टी म्हणजेच दुरदर्शन मोबाईल, वीज, गीजर इ. या सर्व गोष्टी विज्ञानामुळेच आपल्याला मिळाल्या आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोंन हा सुद्धा विज्ञानामुळेच आस्तित्वात आला.तसे स्मार्टफोनचे फायदे अनेक आहेत. तुम्ही कोणालाही आपतत्कालीन स्थितीत संदेश पाठवू शकता, व्हिडिओकॉल लावू शकता. विविध प्रकारची माहिती मिळवू शकता. एकांदरित पहायला गेले तर विज्ञानाने आपले जीवन बहुतांश सोपे केले आहे. त्यामुळे आपल्याला जी कामे करण्यास भरपूर वेळ लागत तीच कामे आता फक्त एका क्लिकवर होतात. उदा. पत्र पाठवणे, आता तर लोकं लग्नाची पत्रिका सुदधा मोबाईलवरच पाठवतात. विज्ञानाने आज ऐवढी प्रगती केली आहे ज्यामुळे आता असे कोणतेही क्षेत्र उरले नाही जेथे विज्ञानाचा वापर होत नसेल. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे 'शिक्षण' आपण सर्व विद्यार्थी आहोत . आपण शिक्षण घेतो बरोबर ना ! आपल्याला शिकवण्याची पदधत म्हणजे खडू, फळा डस्टर इत्यादी गोष्टी पण आता त्याचेच रूपांतर स्मार्ट क्लास पदधतीत झाले आहे. चित्र पाहून शिकल्यामुळे मुलांना आनंद मिळत आहे. विज्ञानाने आपल्याला कशी साथ दिली याचे म्हणजे कोरोनाच्या काळात शाळा बंद कराव्या लागल्या परंतु मुलांचे शिक्षण उदाहरण थांबू नये त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आली यामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. जी मुले काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नव्हती त्यांना याचा इंटरनेट, कम्प्युटर याचा खुप उपयोग आला. हे सर्व विज्ञानामुळे घडले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
आपला भारत कृषिप्रधान देश आहे. भारत ज्या क्षेत्रात प्रधान आहे त्या क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होणार नाही असे होणारच नाही. सर्व प्रथम शेती करण्याची जुनी पदधतीची जागा तंत्रज्ञानाने घेतली. यामुळे शेतकऱयांना नफा झाला. विविध शेती करण्याच्या पद्धती शोधल्या गेल्या. त्यामुळे पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. शेतात काम करण्यासाठी विविध यंत्रे तयार केली गेली त्यामुळे मनुष्य बळ वाचले.
आजकाल तर शेतातील तापमान व आर्द्रत मोजण्यासाठी सेन्सर वापरले जात आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ही विज्ञानाचीच देण आहे असे म्हणावे लागेल.
विज्ञान ठरले वरदान
अनेक जीव वाचवू शकलो
असाध्य रोगांवर
प्रतिबंध लावून जिंकलो.
मानवाला कधीतरी वैद्यकिय मदत लागतेच, वैद्यकिय क्षेत्रात तर विज्ञान वरदानच ठरले आहे. यामुळे आपण असाध्य रोगांवर प्रतिबंध लावून त्यांवर उपाय शोधू शकलो. पूर्वीच्या काळी अश्या गुंतागुंतीच्या आजारावर उपचार नसल्या कारणाने अनेक लोक मरण पावत असत. अगदी कोरोना महामारीमध्ये जशी स्थिती होती अगदी तशी परंतु विज्ञानाच्या मदतीने आपण त्यावर सुदधा लस शोधली आणि अभिमानास्पद बाब आहे की ही लस भारताने शोधली. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे) कर्करोगासारख्या भीषण आजारांवर सुदधा आज वैद्यकीय क्षेत्रात काही औषधे उपलब्ध आहेत. भले हा रोग पुर्णपणे बरा झालेला नसला तरी यावर वैज्ञानिक अतिशय मेहनत करित आहेत.
आपल्या दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या मोबाईल वस्तू विविध उपकरणे दुरदर्शन, इ. विज्ञानाने उपकरणाच्या क्षेत्रात देखील आपल पुरेपुर योगदान दिले आहे. यामुळे जगाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत संदेश पोहोचवणे हे काही सेकंदांचे काम आहे. कोणी परदेशात असला तरी तो आपल्याशी संवाद साधू शकतो. आपण आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल लावून त्यांना बोलू पाहू शकतो. आपल्या कुटुंबांशी दूर राहण्याची चिंता न करता आपली स्वप्न आपण पुर्ण करू शकतो.
अंधश्रद्धा निर्मुलन करु, ज्ञानाचा करू, ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासा वृत्ती धारण करु, विज्ञानाचे पर्व साजरे करू. आज भारत विज्ञानाच्या मार्गावर पुढे जरी जात असला तरी आजही भारताच्या काही खेडे गावांमध्ये लोकांच्या मनात अंधश्रद्धा रुजली आहे. त्यांच्या मनातून आपण जोपर्यंत अंधश्रदा मुळापासून काढून फेकून देत नाही तोपर्यंत घराघरात विज्ञानाचा दिवा पेटणार नाही. आपले पुर्वज आपल्याला सांगतात की डावीकडे पाय करून झोपू नये परंतु याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की डावीकडे पाय करुन झोपल्या मुळे आपल्याला हदयाला रक्तपुरवठा नीट होत नाही व त्यामुळे आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागते. त्याचप्रकारे उघड्या डोळ्यांनी सुर्यग्रहण पाहू नये परंतु याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की उघड्या डोळ्यांनी सुर्यग्रहण पाहील्यामुळे आपल्य डोळ्यांना इजा होऊ शकते व डोळ्यांचे आजार देखील होऊ शकतात. अशाप्रकारे प्रत्येक अंधश्रद्धेच्या खाली एक वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला असतो.
जुन्या काळात पुरेशी वाहतुक सुविधा नव्हती पुरेशी वाहने सुद्धा नव्हती, त्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी अनेक दिवस लागत असत, परंतु आज आपल्या प्रवासासाठी बस, ट्रेन, कार, मोटार बाईक, विमान इत्यादी सर्व वाहनांमुळे आपला प्रवास अधिक सोपा व मनोरंजक झाला आहे. विमानामुळे आपण जग फिक शकतो आणि भारत किंवा जगाच्य कोणत्याही कोपऱ्या मध्ये सुरक्षित प्रवास करू शकतो तेथील निसर्गसौंदर्य अनुभवू शकतो. विज्ञानामुळे आज अनेक वाहने तयार होत आहेत. हेच संशोधन पुढेही चालू राहिल याची मला खात्री आहे.विज्ञानाने आपल्याला सुखसोयी देण्यामध्ये कुठेही कसूर केला नाही उलट त्याने आपले जीवन सुखकर बनवले.
प्रत्येक देशासाठी आपली संरक्षण व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते कारण तीच त्या देशाला संरक्षण प्रदान करते. यामध्ये विविध शस्त्रास्त्रे बनवली जातात, विज्ञानाच्या सहाय्याने देखील विविध शस्त्रास्त्रे प्रत्येक देश बनवत आहे. DRDO ही सौरक्षण व्यवस्थेसोबत काम करणारी संस्था आहे. या संस्थेची ५२ प्रयोगशाळा DRIO ने टॉरपीडो वरणास्त्र ही दोन शस्त्र तयार केली आहेत, ती DRDO च्या प्रयोग शाखेत तयार केली गेली. ही शस्त्रे २०२० मध्ये नव दलाला प्रदान करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आज आकाशाएवढ उंची गाठली आहे. आकाशावरून आठवले, विज्ञानामुळे अवकाशातील म्हणजेच आंतराळातील विविध रहस्य आपल्या समोर आली आहेत. आंतराळावीषयी माहिती गोळा करण्यासाठी अवकाशयान अंतराळ्यान इत्यादी गोष्टी आंतराळात पाठवण्यात आले आहेत. मंगलयान, चंद्रयान- र, १०८ उपग्रह मिशन इत्यादी भारतीय आतंराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने मिळवलेले यश आहे. अंतराळाविषयी माहिती गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. विज्ञानाने आपल्याला खूप काही दिले. त्यामुळे जीवनामधील गुंतागुंती बरिचशी कमी झाली आहे. परंतु प्रश्न पडतो तो विज्ञानाचा उपयोग योग्य मार्गानेच करावा नाहीतर विज्ञान हा वरदान नाहीतर शाप सुद्धा ठरू शकतो. मी आपल्या देशातील सर्व पूजनीय शास्त्रज्ञाना वंदन करतो.
विज्ञानाने आपल्या जीवनात एक महत्त्वाची भुमीका नेहमीच बजावली आहे. माझ्या जीवनामध्ये विज्ञानाला माझा मित्रच मानला आणि विज्ञानाशी माझे घट्ट नाते पडले व विज्ञाना सोबत शिकत असतानाच वेळ कसा गेला हे मला कळलेच नाही. विज्ञानाचे सर्वांच्या जीवनात अनन्य साधारण
असे महत्त्व आहे. तुमचे माहित नाही पण मला पुढे पुढे जाऊन शास्त्रज्ञ व्हायला नक्कीच आवडेल.
गट क्रमांक २
ऋतुराज जोगेंद्र गावित
पारितोषिक : तृतीय क्रमांक (विभागून)
-: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
:-
किती हा आक्रोश झाला,
किती रक्ताचा नदया वाहल्या,
सडा पडल्या मृतदेहाचा,
तेव्हा स्वातंत्र्याचा उगम झाला ।
भारत हा देश विविध जाती-जमाती,
संस्कृती, भाषेचा देश आहे.
भारताला स्वतंत्र्य मिळाले ते केवळ फक्त स्वातंत्र्य विरांमुळे.
ज्या वेळी इंग्रज भारतावर
राज्य करत होते तेव्हा प्रत्येक नागरिक स्वातंत्र्याचे
स्वप्न पाहत होते. त्या सर्वांचे
स्वप्न केवळ त्या बलिदान दिलेल्या
वीरांमुळे साकार झाले.
ज्या वेळी स्वातंत्र्याचा मला विचार येतो तेव्हा
मला छत्रपती शिवाजी
महाराज, विरांना झाशीची राणी,
महाराणा आठवतात. पुढे मग स्वातंत्र्याची मशाल ज्यांनी महात्मा गांधी,
लोकमान्य टिळक, ज्योतीराव,
सावित्रीबाई फुले, विर सावरकार व अनेक अनाम वीर!
भारत हा देश वेगवेगळ्या संस्कृतीचा देश आहे आणि आपण २०२२ व्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताने सर्व प्रकारात विकास केला आहे. शैक्षणिक, उदयोग, क्रिडा, शेती, विज्ञान, सौंदर्य स्पर्धा व इतर काही. चला मग भारताने कुठे आणि कसे प्रगती केले ते बघुया.
भारताला स्वतंत्र्य मिळाले त्या वेळी सर्व देशांना वाटले की हा देश प्रगती करू शकणार नाही पण आम्ही कोणा पेक्षा कमी आहोत का! आम्ही केवळ प्रगती नव्हे तर खुप काही शिकवले सुद्धा आहे. विज्ञानाची प्रगती तर केवळ पृथ्वीवर नव्हे तर चंद्रावर व मगळावर प्रर्यंत केली आहे. भारत हा प्रथम देश बनला ज्याने प्रयत्नात मगळावर यशस्वी स्वारी केली. आम्ही चंद्रावर ही गेलो आणि अतंकराळात ही गेलो आणि तिथे सुध्दा भारताचा गौरव करून दाखवला. 'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा' असे शब्दात सर्व देशाना दाखवून दिले कि आम्ही तेच जे दिडशे वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होते. इंग्रज्यानी आम्हाला पिंजऱ्यात कैदी जरी केले पण त्यांनी आमच्या स्वप्नांना कैदी केले नाही. आम्ही कोणाशी कमी नाही हे दाखवून दिले. 'शून्य' हा अंक ही आम्हीच म्हणजे 'आर्यभट्टानी' शोधून जगाला दिले.
भारत हा देश कृषीप्रधान देश आहे हे सर्वाना माहित आहे. म्हणुनच जो व्यक्ती सर्वांचे पोट भरतो त्याला आम्ही देवता मानतो. भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवात जर शेतकप्याचे नाव न घेतले तर हे चुकीचे होईल. देशाच्या सिमेवर लढणारा सैनीक ज्या वेळी लढता लढता मरतो तेव्हा सुध्दा तो केवळ 'भारत माता की जय' असे बोलुन मरतो. भारताला स्वतंत्र्य भेटल्या नंतर सुद्धा अनेक देश आमच्यावर हल्ला करतात पण आमचा 'सैनीक दादा त्या प्रत्येक वाराचा, हल्ल्याचा बचाव करून आम्हाला व भारत माताला वाचवतो. 'जय जवान जय किसान' अश्या शब्दात आम्ही त्या सर्व सैनिकांचे व शेतकऱ्यांचे आभार मानतो.
भारताच्या अमृतमहोत्सव ज्यामुळे आपण साजरा करतोय ते म्हणजे
लाखो अनाम वीर.
झाशीच्या राणीने ज्या वेळेस
बोलले की 'मी माझी झाशी देणार नाही त्यावेळी त्या काळातील
प्रत्येक वीर सैनिक त्या विराना च्या मागे उभा राहिला.
“स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना ज्यानी केली,
टिळकांच्या शब्दांना सारी इंग्रज ही घाबरली
! लोकमान्य टिळक यानीच भारतात गणेश उत्सव ही आणला.
भारत हा देश या सर्व वीरांमुळे घडला. भारत देश केवळ शेती प्रधान
नाही तर तो देश उद्योगा मध्ये सुध्दा पुढे आहे.
आम्ही कित्येक तरी वस्तु दुसऱ्या देशाना पाठवतो.
आम्ही आर्थीक स्थितीत ५ व्या स्थानावर २०२२ आलो.
हे दाखवुन दिले ते सर्व त्या
उद्योजकांनी.
भारत हा देश क्रिडा मध्ये नवे-नवे विक्रम बनवत आहे भारताने केवळ क्रिकेट मध्येच प्रगती केली नाही.
आम्ही अॅथेलिटीक्स, बॅडमिंटन व अनेक क्रिडा प्रकारात प्रगती केली.
एम.सी. मेरी कॉम हीने दाखवून दिले की महीला केवळ स्वयंपाक
घरात काम करण्यासाठी नाही.
तिने बॉक्सींग मध्ये भारताला
अनेक पदके मिळवून दिले.
६ वेळा विश्वविजेती बनणारी ती संपूर्ण पृथ्वीवर एकमेव व्यक्ती आहे.
पि.व्ही सिंधु हीने ऑलिम्पिक
मध्ये भारताला २ पदके मिळवून दिले आहे.
२०१९ साली तीने विश्वविनाचे स्थान पटकावले.
२०२१ मध्ये झालेल्या
ऑलिम्पिक भारताने एकुण ७ पदके जिंकले.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुध्दा ६० पदकाच्या वर पदके भारताने जिंकले हे गौरव करणारी बाब आहे.
कब्बडी चे सर्व विश्वकप भारताने
जिकले आहे. हॉकी तर आमचा राष्ट्रीय खेळ तिथे सुध्दा
आम्ही मागे नाही.
भारताने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली.
क्रिडा, विज्ञान व तसेच सौदर्य स्पर्धेत सुध्दा भारताने अनेक किताबे पटकावली.
भारताने आता पर्यंत ६ मिस वर्ल्ड,
३ मिस युर्निवस असे क्रमांक
पटकावले आहे. भारतीय महिला यांनी प्रत्येकवेळी भारत देशाचे
नाव आतंरराष्ट्रीय स्थाळावर आणले आहे.
भारताने संपूर्ण जगाला दाखवुन दिले आहे की आम्ही कधीही कोणत्या ही देशावर प्रथम
आक्रमण केलेला नाही हा पण जर कुणी आमच्या वर हल्ला केला तर आम्ही त्याला सोडले नाही.
आम्ही प्रत्येक वेळी शांतता प्रधान
करतो. भारतात मानवता,
एकता व बंधुतता नांदते. आम्ही
प्रत्येक माणसाला माणसासारखी वागणुक देतो.
आम्ही एकताचे शक्ती दाखवुन देतो.
दोन वेगळ्या धर्माचे लोक केवळ भारतात
राहत नाही तर अनेक धर्माचे लोक एकत्र राहतो.
भारत देश ही संतांची पवित्र भुमी आहे.
इथे जन्मलेले सर्व संतानी केवळ एकच मार्ग दाखवला तो म्हणजे मदतीचा,
मानवतेचा. प्रत्येक प्राण्यांवर प्रेम करा असे वीचार आमच्या
मध्ये आहे. भारतात अनेक बोली भाषेचे लोक राहतात.
त्या सर्व बोली अतिशय साखरे सारखे गोड आहे.
भारताच्या स्वतंत्र्य काळात असे अनेक साहित्यीक होते ज्यांनी देशासाठी
तुरुंगवास सुध्दा सहन केला.
ज्या वेळेस इंग्रज
आमच्या वर राज्य करत होते तेव्हा अनेक विरानी स्वताचे
बलिदान दिले. केवळ मोठी माणसे नव्हे तर लहान मुलांनी
सुध्दा स्वातंत्र्य लढयात योगदान दिले.
नंदुरबार जिल्हयातील ‘शिरीषकुमार'
या लहान मुलाचे बलिदान
सुध्दा भारत विसरणार
नाही. भारताचा ध्वज घेऊन
'भारता माता की जय'
बोलताना इंग्रजांनी त्याच्या वर गोळीबार केला.
आम्ही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी 'हर घर तिरंगा'
ही मोहीम अतिशय चांगल्या रितीने पार पाडली.
काही लोकांकडे घर नाही पण भारताचा ध्वज फडकवण्यासाठी हात
आहे हे दाखवून दिले.
ज्या वेळी संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त होते तेव्हा आमच्या वैज्ञानिकांनी अनेक औषधी संपूर्ण जगाला
दिले. आम्ही क्रिडा,
विज्ञान व अनेक क्षेत्रात देशाचे नाव गौरव
करत आहे.
गट क्रमांक १
गौरी तुषार तावडे
पारितोषिक : प्रथम क्रमांक
विज्ञानातूनी जन्म आमुचा
अन् रस्ता रहस्यांचा
मार्ग तो प्रगतीचा
आनंददायी चमत्काराचा.
अशी ही विज्ञानाची महती आहे.
आजचे हे विज्ञानाचे
युग म्हणजे रहस्यांचे, शोधांचे व चमत्कारांचे युग आहे.
आज विज्ञानाने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात
क्रांती घडवली आहे. पृथ्वीवरील मानवाला मिळालेले
खरे वरदान म्हणजे
विज्ञानच.
विज्ञानाने केलेल्या
क्रांती अद्भुत व विलक्षण आहेत.
त्यामुळेच या युगाला ' विज्ञान युग'
असेही म्हटले जाते. आपली जीवनशैली विज्ञानामुळे सुखकर व
आरामदायी झाली आहे. आपण विज्ञानाशिवाय
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.
विज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे.
संस्कृत भाषेत एक सुंदर सुभाषित आहे.
ते आहे कि विज्ञान हा मानवाचा प्रभावी डोळा आहे, एखादा माणूस जर त्याचा वापर करत नसेल,
तर तो खऱ्या अर्थान
आंधळा आहे.
पूर्वीच्या काळी,
माणूस रानटी जीवन जगायचा.
गुहेत राहायचा. कच्चे मांस खायचा
. अंग झाकण्यासाठी पानांचा वापर करायचा.
त्यानंतर तो हळू हळू शिकू लागला व प्रगती करू लागला.
त्याने आगीचा, चाकाचा व वीजेचा शोध लावला.
वीजेचा शोध
ही विज्ञानातील खूप भरारी आहे. हि भरारी ज्या संशोधकाने सर्वात पहिल्यांदा घेतली तो म्हणजे थॉमस एडिसन!
त्याच्या मते कोणताही शोध लावण्यासाठी १%
बुद्धिमत्ता व ९९%
चिकाटीची गरज असते. 'अनुमान,
निष्कर्ष, व पुन्हा पुन्हा प्रयोग
' हे त्याच्या वीजेच्या
शोधाच्या यशामागचे रहस्य होते. विजेमुळेच पंखा फिरतो , प्रकाश
मिळतो
व आपले जेवण बनते.
विजेच्या शक्तीवर अनेक कारखाने चालतात.
कमीत कमी वेळात जास्त काम करणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे.
विज्ञानात असंख्य लोकांना रुची असते.
दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाने स्पर्श
केला नाही.
सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळ करण्यासाठी गीझरचे गरम पाणी लागते. संध्याकाळी बाबा कचेरीतून दुमून - भागून आल्यावर लावला जाणारा पंखा किंवा ए.सी.. रात्रीचा काळोख नष्ट करण्यासाठी लागणारे दिवे- हे सर्व विज्ञानच तर आहे ! पूर्वीच्या काळी, जर एखादया माणसाचा मृत्यू झाला तर ती बातमी कळवायला कित्येक दिवस लागायचे, पण आज आपण ते काही सेकंदातच कळवू शकतो. पूर्वी, लोकांना पायी प्रवास करावा लागायचा. आज आपण ट्रक, ट्रेन, जहाज, विमान यांच्या मदतीने लांबचे अंतर थोडक्या वेळात गाठू शकतो. त्यामुळे गैरसोयही होत नाही. व्यवसायातही विज्ञानाचा मोठा वाटा आहे. आपण हवामान व नैसर्गिक आपत्तीची माहिती विज्ञानामुळे मिळवू
शकतो. आपल्या देशातील अनेक घडामोडी आपल्याला विज्ञानामुळेच काही सेकंदात कळतात!
टीव्ही, चित्रपट व रेडिओ यांच्या शोधामुळे आपले मनोरंजनही होते व ज्ञानही प्राप्त करता
येते. अंधश्रद्धेची खरी रूपे ओळखता येऊ शकतात. दूरदर्शनमुळे देश-विदेशातील दृश्य पाहता येऊ शकतात.
वैद्यकीय क्षेत्रातही विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. पूर्वी, लोक डेंग्यू, मलेरिया, प्लेग, कॉलरा अशा आजारांमुळे मृत्युमुखी पडायचे. पण विज्ञानामुळे त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. एक्सरे द्वारे शरीराच्या आतील भाग पाहता येतात. त्यामुळे आजाराचे निदान लवकर होऊन गंभीर रोगांपासून बचावता येते. एक्सरे, सिटी
स्कॅन, एमआरआय, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी अशा आधुनिक पद्धतीमुळे आजाराचे निदान होऊन योग्य उपचार करता येतात. रोगांवर रामबाण औषधांमुळे मात करता येते. याचे उत्तम म्हणजे कोरोना विषाणूवर तयार केलेली लस. विज्ञानामुळे शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी कृषी साधने म्हणजेच कापणीचे यंत्र, नांगरणी यंत्र, ट्रैक्टर अशा यंत्रांची निर्मिती होऊ लागली. यांचा उपयोग करून शेतकरी आपला पैसा व वेळ वाचवतो. उत्पादनाची क्षमता वाढते. ओसाड जमिनीवर नंदनवन फुलते.
अत्याधुनिक यंत्रांमुळे ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या आहेत. सातासमुद्रापलिकडील लोक जवळ आले आहेत. विचारांची देवाणघेवाण साधू होऊन प्रगती होऊ लागली आहे. संगणकाच्या २१ व्या शतकात दळणवळण व माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे. विज्ञानाचा आणखी एक चमत्कार म्हणजे संगणक ! संगणकाने लोकांना जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे. इंटरनेट व संगणक ही माणसाला मिळालेली देणगीच आहे ! आपण ई-मेल पाठवून जगातील कुठल्याही माणसाशी संपर्क शकतो. आपण बाजारात न जाता घरबसल्या खरेदी करू शकतो.
वीजेचे बील, पाण्याचे बील, बँकेची कामे आपण घरबसल्या करू शकतो. रेल्वेचे तिकीटही काढू शकतो. अशा प्रकारे संगणक आपला सेवकच ठरला. कोरोनाच्या काळात, विद्यार्थी व नोकरदारांसाठी तो देवदूतच ठरला! अबालवृदघांचे मनोरंजनही त्याने केले. मोबाईल ही संदेशवहनाची खाणच आहे! संदेशवहन होऊन खूप प्रगती झाली. बोटाच्या एका क्लिकवर आपण माहिती प्राप्त करू शकतो.
'आकाशापासून पाताळापर्यंतचे अंतर आपण विज्ञानाच्या मदतीने मापू शकतो. मानवाने भूमीसारखेच सांगर व अंतराळावरही वर्चस्व मिळवले आहे. अथांग सागराचा तळ हे आधी गूढ होते पण पाणबुड्यांनी तळाला पिंजून काढले. अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडून मानवाने अंतराळातही वर्चस्व गाजवले आहे. चंद्रावर पाऊल ठेऊन तो गप्प न बसता विविध ग्रहांवर गमनाचा प्रयन्त करतोय. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक हत्यारे तयार केली जात आहेत. सुईपासून अगदी विशाल जहाज, विमान, रॉकेटपर्यंत ! शिक्षण क्षेत्रातही विज्ञानाचा मोठा वाटाआहे. छपाईयंत्राची निर्मिती हि शिक्षण
क्षेत्रात केलेली
मोठी क्रांती आहे. ज्ञान प्रसार व प्रचाराचे काम यामुळे झाले. छपाईयंत्रातून लाखो प्रती छापून वितरणासाठी पाठवल्या जातात.
विज्ञानाने औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी कामगिरी बजावली आहे. ज्ञान प्रसार व प्रचार विज्ञानामुळे झाला. विज्ञानामुळे आपले जीवन आरामदायी झाले आहे. विज्ञानाने अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाचा उजेड सर्वत्र पसरवला व आपल्या जीवनाला गती दिली.
गट क्रमांक १
उज्वल मारुती नेवसे
पारितोषिक : तृतीय क्रमांक
माझा आवडता छद: वाचन
वाचन हा छंद महान
माणसाची भागवतो ज्ञान तहान
मिळते आपल्याला ज्ञान दान
माणसाचे अज्ञान होते लहान
अशी वाचनाची ख्याती सांगितली जाते. ज्याप्रमणे ज्वालामुखी दरम्यान पृथ्वीच्या उदरातुन तप्त ज्वालारस बाहेर पडत असतो त्याप्रमाणे माणसाने ऐखादी गोष्ट करावी असे त्याला मनापासून वाटते ती गोष्ट म्हणजे माणसाचा छंद होय: असा माझा आवडता छंद वाचन आहे. वाचनाने आपल्याला अमर्याद ज्ञान, अद्वितीय मनोरंजन,थोर पुरुषांची चरित्रे, विश्वभ्रंतीचे बारकावे,बालसाहित्यातील अभूतपूर्व जादू, मनाला विरंगुळा मिळतो वाचनामुळे आपण यशशिखरावर पोहोचू शकतो.
भारतीय राज्यघटनेचा आराखडा बनवणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसातील अधिक काळ वाचनात घालवी. मिसाईलमॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न यांनी म्हणजेच डॉ. ए.
पी. जे. अब्दुल कलाम यांनी 'वाचाल तर वाचाल' हा संदेश जगाला दिला. जगातील सर्वात श्रीमंत उदयोजक एलॉन मस्क यांनी कोणतीही अंतराळाविषयीची औपचारक पदवी नसताना फक्त वाचनाच्या बळावर स्पेस एक्स ही उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. रस्केन म्हणतो पुस्तक म्हणजे 'राजाचा खजिना' आहे. तो राजाचा खजिना उनमोत्तम विचारांचा आहे. अमेरीकेत व्याख्यान देताना 'माझे प्रिय अमेरीकन बधू- भगिनींनो' असे उच्चार करणारे स्वामी विवेकानंद हे वाचनामुळे ज्ञानक्षेत्रात अव्वल स्थानी आहेत.
ज्ञान हे पसरलेल्या असे अफाट सागरासारखे आहे. या सागरातील पाणी गोळा करण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन होय. वाचनाच्या तालमीत तयार झालेला पैलवान जगाच्या पाठीवर कोठेही सूर्यप्रमाणे तेज पसरवत असतो. फक्त ज्ञानदेवता गणपतीच्या आजूबाजूला राहून ज्ञानदेवता प्रसन्न होत नाही, तर वाचन करून ज्ञान ग्रहण केलेल्या भक्तावर ज्ञानदेवता प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे भुंगा फुलातील मकरंदाचा आस्वाद घेतो त्याप्रमाणे मी बालपणाचा आस्वाद घेतलेला आहे तरी त्यावेळीच्या समस्यां मला फारशा आठवत नाहीत परंतु बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या लेखनाने त्यांनी त्या समस्या मांडल्या आहेत.
विदयानामनरस्य रूपम् अधिकम, प्रच्छन्नगुप्त धनम्
विदया भोगकरी यश: सुखकरी, विदया गुरुणा गुरु
विदया बन्धुजनो विदेशगमने, विद्या परंम देवतम्
विदया राजसू पुज्यते न तु धनम्, विद्याविहीनः पशुः ॥
अशी विद्येची महत्ती सांगितली जाते. ज्ञान हे खरच दैवत आहे. वाचनाने मी माझ्या तलावरूपी ज्ञानात तुषाररूपी ज्ञानाचे भर पाडत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सागररूपी ज्ञानात वाचनाच्या थेंबांचा सिंहाचा वाटा आहे. वाचनाने आपण आपल्या बुद्धीच्या तलवारीला धार लावतो. वाचन हा ज्ञानग्रहणाचा एक प्रभावी व सोपा असा महामार्ग आहे. प्रभाती जेव्हा भरकाळोखात सूर्याची किरणे प्रकाश पसरवीत असता तेव्हा काळोखावर उजेडाचा विजय होत असतो. जसेकी जीवनाच्या अज्ञानावर वाचनाच्या ज्ञानाच्या प्रभावामुळे अज्ञानावर विजय होतो. जर आपण जीवनाला युद्ध मानले तर वाचनाला युद्धापूर्वीची पूर्वतयारी म्हणता येईल. युद्धापूर्वी जो जितका घाम गाळतो म्हणजे जो जितके वाचन करतो त्याला युध्दात तितकेच कमी रक्त सांडावे लागते म्हणजे जीवनात कमी धक्के खावे लागतात.
वाचनाने आपल्याला कधी मनोरंजन मिळते तर दु:खाच्या प्रसंगी हसवायला पात्र सापडते कधी वाचनाने ज्ञानाचा सरोवर सापडतो देशभक्तो करू पाहणाऱ्या मनाला देशभक्तो करण्याची दिशा मिळते, व्यक्त होऊ पाहणारे मन लेखक होते, आयुष्यात एखादी गोष्ट करू पाहणारे मन त्या क्षेत्रातील तज्ञ होते. वामन म्हटले की आपल्यासमोर बुटका असा माणूस येतो आणि तसेच बटाट्याची चाळ हे पुस्तक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विनोद येतो. वाचनाने मनोरंजन मिळू शकते हे मला 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक वाचल्यानंतर कळाले.
वाचाल तर वाचाल
नाहीतर जीवनात खचाल
वाचनामुळे मोठे ग्रंथ रचाल
वाचनाने तुम्ही ज्ञानी व्हाल
वाचनाचे जीवनात असंख्य फायदे आहेत.
वाळवंटात तहानलेल्या व्यक्तीची तहान पाण्याने भागते तर ज्ञानासाठी तहानलेल्या व्यक्तीची तहान वाचनाने भागते. मूर्तिकाराला अतुलनीय मूर्ती निर्माण करण्यासाठी अनेक दगडावर अनेक घाव करावे लागतात तसेच एका अतुलनीय बुद्धीच्या निर्मितीसाठी अनेक पुस्तकांचे वाचन करावे लागते. अनेक पुस्तके हे फक्त मनोरंजनासाठी असतात ते असे की माणसाने फक्त गोड पदार्थ खावे. माणसाला सुदृड बनवण्यासाठी चौकस आहाराची आवश्यकता असते तसेच उत्तम बुद्धीसाठी विचार करायला लावणारे लेखाचे वाचन, इतिहासातील युद्धांचे वाचन यांची ही गरज असते.
आधी मी अमावस्येच्या रात्री चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे असणाऱ्या घाणेरीला नाटकातील पात्राने चुकीची वेशभूषा केली आहे असे समजत, परंतु दुर्गा भागवत यांच्या घाणेरी विषयीच्या लेखाचे वाचन केल्यावर घाणेरी विषयीचे मते माझी पूर्णपणे बदलली. वाचन ज्या व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य घटक होतो त्या व्यक्तीच्या ज्ञानात सतत वाढ होत असते. वाचनाने आपल्या अणु - परमाणु पासून ब्रम्हाडापर्यंतचे ज्ञान मिळते.
अफाट पसरलेल्या विश्वाला कोठे सामावायच असेल तर ते सहज शक्य होणार नाही तरी प्रयत्न केल्यास तो पुस्तकात सामावेल व अशा पुस्तकांच्या वाचनाने आपल्याला अनेक क्षेत्रांमधले बारकावे कळतात. जगातील सर्व देश फिरवणे हे एक दिव्यच आहे, परंतु पुस्तकांच्या वाचनाने हे घरबसल्या सहज शक्य होईल. वाचनाने माणसाचा दुष्टीकोन बदलतो व तो सत्य मार्गावर चालायला लागतो.
स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांनी देखील त्यांच्या शालेय जिवनात अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यांनी फासीवर जाण्याआधी देखील पुस्तक वाचून संपवले व
व मग ते फासावर गेले. पुस्तकांच्या वाचनाने अनेक हिरे घडले आहेत. ज्ञानाच्या बळावर अगदी खालच्या वर्गात असलेल्या दीनदुबळ्या माणसांमध्ये वाढलेल्या माणसाला भारतरत्न मिळू शकते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले. ज्ञानाच्या बळावर माणूस चिखलातल्या कमळाप्रमाणे तलावाची शोभा वाढवतात. जगातील प्रत्येक माणूस विदयसमोर नतमस्तक होते. हे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळते. वाचनामुळे माणूस डबक्यातील ब्रेडूक म्हणून राहत नाही तर समुद्रातल्या देवमाशाप्रमाणे जगतो.
जसा गरुड पंखांच्या बळावर गरुडझेप घेतो. तसेच माणूस ज्ञानाच्या बळावर भरारी घेतो. गरुडाच्या पंखांना बळ त्यांच्या पोषक आहारामुळे मिळतो. तसेच ज्ञानाला पोषक आहार वाचनामुळे मिळते. बगळा शांततेच्या बळावर त्याला असणारा छोटा मोठा मासा पकडतो तसेच मी माझ्या आवडणाऱ्या छंदामुळे अनेक छोटी मोठी बक्षीसे मिळवूली आहेत. मोर त्याच्या पिसाऱ्यामुळे शोभून दिसतो तसा माणूस त्याच्या ज्ञानामुळे शोभून दिसतो.
जर एखादया माणसाने हा छंद स्वतःच्या अंगी बाळगला व तो मध्येच सोडला नाही तर तो नक्कीच यशशिखरावर पोहोचेल. मी आजवर माझ्या ज्ञानाच्या बळावर माझ्या कुंपनापर्यंतच्या यशापर्यंत पोहचलो आहे. जर मी माझा हा छंद असाच जोपासला तर मी यशस्वी व्यक्ती बनेल अशी मी आशा करतो.
वाचनाने प्रगती होते,
वाचनाने ज्ञान हाती येते,
वाचनाने जीवन सुलभपणे जगता येते
वाचनाने जगही जिकंता येते.
गट क्रमांक २
नेहा राजाराम पारकर
पारितोषिक : व्दितीय क्रमांक
कोरोनाने काय शिकवले ?
अजाण, पाहुणा असा भारतात आलेला विषाणू म्हणजे
'कोरोना' ज्याने
अवघ्या जगात संकरित आजार पसरवण्याचे कार्य केले.
या विषाणूला मायक्रोस्कोप मधून पाहिल्यावर
'मुकूट’ (crown) सारखी आकृती दिसते आणि त्या कारणाने लर्टिन
भाषेतून कोरोना हे नाव देण्यात आहे.
मागील दोन वर्षापूर्वी
कोरोनाची साथ आली आणि त्यामुळे
संपूर्ण जगात लाकडाउन
लागला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळ काही बंद झाल होत. कोणाकडेही जायचं नाही,
यायच नाही, कुणीही हात मिळवायचा
नाही, थोडक्यात काय तर स्वतःला घरातं
बंदिस्त करून घ्यायच. अवघ जग स्तब्ध झाल्यासारखा वाटतं होत.
कोरोना काळात प्रत्येकाला बरे वाईट अनुभव आले. लोकांनी या काळात एकत्र कुंटूंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून आनंदी तणावमुक्त जीवन जगण्याचा अनुभव घेतला. लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटूंबातील व्यक्तिंनी कोणत्याही परिस्थित एकत्र असावे याची जाणीव झाली आणि त्यामुळे नात्यातील दूरावा दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. कोरोनाने काळा गोरा, गरीब-श्रीमत,असा कोणताही भेदभाव न करना प्रत्येकालाच स्वच्छता व निरोगी जीवन कसे जगायचे ते शिकवले.
कोरानाने जगाला आणि प्रत्येकाला सर्वात मोठा संदेश दिला तो म्हणजे " शोशल डिस्टनसिंग” समाजातील कोणत्याही व्यक्निशी संवाद साधताना सुरक्षित अंतर राखूनच साधावा, सुरक्षितता राखणे स्वावलंबी होणे अशा अनेक बाबी आपण या कोरोनाकाळात शिकलो. किनाही जवळचे नातेवाईक असले, तरीही त्यांना' हस्तांदोलन' न करता आपली जुनी नमस्कार" ही परंपरा रूजवण्यास भाग पाडले. बचतीचे महत्त्व पटवून दिले. बचत म्हणून कंजूषपणा नव्हे, तर भविष्यासाठी केलेली तरतूदच होय' त्यामुळे दिलेल ती वस्तू विकत घेणे, वायफळ खर्च करणे यासारखे अनेक खर्च बंद करण्यास भरीस पाडले. कधी नवीन सिनेमा पाहायला जाणारे आपण हे तर तेव्हा स्वप्नवन झाले होते. आपल्याच सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये साधा क्रिकेटही खेळता येत नव्हता. ना नवीन सिनेमा ना नवीन नाटके येत होती. आपल्या जीवनातून मनोरंजन ह द्दपार झाले होते. दर शुक्रवारी 'फर्स्ट डे फर्स्ट शो' तर दूरच राहिला, फार तर घरी बसून टिव्ही पाहणे, पत्ते खेळणे, कॅरम खेळणे अथवा सापशिडीचा डाव मांडणे या व्यतिरीक्त आपण कसलाही मौज उरली नव्हती. आपल्या नातेवाईकांना भेटणे, पार्टी करणे, फॅमिली सोबन फिरायला जाणे हे सुद्धा आपण करू शकलो नाही. इतकेच नाही तर रोजच्या भाजीवाल्यांशी केली जाणारी घासाघीस, कामवाल्या मावशीबरोबर मारणाच्या गप्पा हे सगळे देखील आपल्या आयुष्यातून गायब झाले होते. ऑफिसचे काम घरीच बसून करावे लागल्याने काम करण्यास उत्साह येत नव्हता. एकमेकांच्या मदतीने, मिळून मिसळून काम करता येत नव्हते. पूर्वी कोणत्या हॉटेलात जेवायला जायचे, कोणत्या मौल मधून शॉपिंग करायची हे आपल्या हाती होते पण ऑनलाईनच्या जगात हे सगळे हट्ट घरबसल्या पूर्ण होत होते. ऑनलाईनच्या या जगात भाज्या व धान्य हे सुद्धा ऑनलाईन मागवणे
आपल्या नशिबी आले होते.
कोरोना काळा पूर्वी आपल्याला बाहेर कुठेही व कधीही फिरण्याची मुभा होती परंतु या कोरानाकाळात पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यांसारखी आपली अवस्था झाली होती. आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेतले होते. एखादया नातेवाईकाचे निधन झाले तरीही त्यांच्या अत्यंविधीसाठी सामील होता येत नव्हते. इतक्यात त्या व्यक्तिस कोरोना असल्यास त्यांचे अंत्यविधी देखील करण्याची परवानगी नव्हती. या काळात माणसांना आपल्या माणसांची किंमत कळली.
कुठे आहे तुमची संपत्नी ?
कुठे आहे तो आयुष्यभर कमावलेला पैसा ?
कुठे आहेत ती नाती ?
मरण इतक पोरक आणि बेवारस असेल,
नर जगतानां माज कशासाठी ?
खरच, आपले आयुष्य आपल्या हाती नाही, त्यामुळे येईल त्या दिवसाचे दु: ख बाजूला सारून दिवस सुखकर करून जगावा हा विचार कोरोनाने दिला.
पैसा झाडाला लागत नाही या म्हणीचा अर्थ या कोरोना काळातच उलगडला. नोकरी व धंदयाची पुरी वाट लागली होती,| अनेकांना तर आपले व्यवस्थाय बंद करून घरात बसावे लागले होते, या काळात नोकरी व आयुष्यभर जगण्यासाठी लागणारा पुरेपूर पैसा किती महत्वाचा आहे याची जाणीव झाली. ' फर्स्ट एड ' म्हणजेच '' आजीबाईचा बटवा ' हा शब्द या काळात खूफ महत्त्वाचा ठरला.
ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणखी दणकट होण्यास मदत झाली. मानवाचे शरीर स्वच्छ असावेच पण त्याचप्रमाणे मनही निरोगी राहावे हे महत्त्वाचे आहे हे कोरोनाने पटवून दिले. त्याचप्रमाणे कोणत्याही, आजार कमी लेखून त्याकडे दुर्लक्ष करू नये व ही बाब किती गंभीर असून त्याचे आपल्या स्वास्थावर काय परिणाम होऊ शकतात, याचे पूरेपूर उदाहरण दिले. कठीण समय येता व अशा अनेक साथींचे आजार येता सरकारी दवाखानाच कामास येतो या बाबी यावेळी जनतेने अनुभवल्या. दवाखाने, डॉक्टर, परिचारिका, औषधे, इंजेक्शन यांचा पुरेपुर तुटवडा देखील कोरोनाने उघड पाडला. या अशुभ काळात काही चांगल्या सवयी अंगिकारल्या गेल्या, सार्वजनिक ठिकाणी मुखपटट्या वापरणे, वारंवार हात धुणे, शिंकण्या- थुंकण्या- खोकण्याच्या योग्य सवयी या सवयीं मुले एक फायदाच झाला म्हणायचा. कोरानामुळे मानसिक आरोग्याच्या सेवा किती तोकड्या आहेत त्याचप्रमाणे मानसोपचारतज्ज यांची उणीव या साथीने दाखवून दिली. याच काळात मानसोपचारांची मनुष्याला किती गरज आहे हे उमगले.
जुन्या काळापासूनच साथरोगशास्त्र असे एक वेगळे शास्त्र आहे. पण त्याला वलय नाही. आवडीने या क्षेत्राकडे कुणीही वळत नाही. हि भावना किती चुकीची आहे हे या साथीने लक्षात आणून दिली. घरात सतत असल्यामुळे किती वेळ वाया जातो आणि कुठे जातो हे कळले आणि त्यामुळे वेळेच नीट व्यवस्थीत नियोजन केल तर सार काही शक्य आहे हे लक्षात आले. संयम, सहनशीलता, माणुसकी, स्वच्छता यांसारख्या अनेक गोष्टींचे नियोजन आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टी ठेवून करणं किती महत्त्वाचे आहे याची कोरोनाने जाणीव करून दिली. साधारणतः लोक बाहेरचे खाणे पसंत करतात पण बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच पण त्याचबरोबर आरोग्याची हानी असे दुहेरी नुकसान होते याची तीव्रतेने जाणीव झाली. कोरोनाने शेजारधर्म कसा सांभाळायचा हे शिकवले, केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. अडी-अडचणीत नातेवाईकांशी शेजारी पाजारी पहिले धावून येतात, त्यामुळे त्यांच्याशी छोट्या छोट्या कारणावरून न भांडता
एकमेकांना समजून घेऊन आनंदाने शेजारधर्म सांगाळण किती महत्वाचे आहे पटवून दिले. शहरात बंदी असल्यामुळे माणसे आपल्या मातीत राहावयास गेले आणि त्यामुळे शेतीत रस घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. तात्पुरती व चोख राहणाऱ्यांनासुद्धा शेती करता येते ते समजले. शिवाय भविष्यात नोकरी नाहीच मिळाली तर शेती तर करू शकतो याबाबत आत्मविश्वास वाढला. शेतकरी शेतात किती कष्ट करून आपले व अवघ्या जगाचे पोट भरतात याची प्रचिती आली. शाळा सुद्धा बंद होत्या, त्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय लागत नव्हती, ज्ञानाचा धडा मिळत नव्हता, हा झरा अखंड वाहणे फार महत्वाचे आहे. याची जाणीव कोरोनाने करून दिली.
कोरोनाने जगण्याचा नवा मंत्र दिला तो म्हणजे कितीही मोठी समोर उभी ठाकली तरी त्या संकटांना न घाबरता धाडस दिले. मुंबईत जगण्यासाठी लागणारे कौशल्य कोरोनाने दाखवून दिले. कोरोनाने मुखपट्ट्या वापरणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. एक गोष्ट माहित पडली. नोकरी आज आहे, उदया नाही त्यामुळे नोकरी अथवा अन्य कोणत्याही बाबीवरून अहंकार न बाळगता आपल्या पदावरून दुसऱ्याला कमी लेखू नये आजपर्यंत आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले नव्हते पण मात्र या कोरोनाच्या काळात आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर अधिक भर दिला. कोरोनाने लहान- मोठा, गरीब- श्रीमंत हे भेदभाव संपवले आपण मनुष्य आहोत हे बिंबवले. थोड तंत्रज्ञान काय अवगत केलं स्वतःला पृथ्वीचे बादशाह समजू लागलो. पण निसर्गा समोर आपण शुल्लक आहोत . डोळ्यांना न दिसणारा एक विषाणु अवघ्या मानवजातीचा विध्वंस करू शकतो. आपल्या दृष्टीने हा एक विषाणू असू शकतो पण निसर्गाच्या दृष्टीने हा विषाणू म्हणजे धरतीवरचा कचरा साफ करण्यासाठी पाठवलेला अधिकारी होता. कोरानातून शिकण्यासारख खूप काही होत, त्यातील प्रमुख म्हणजे कठीण परिस्थितीत जिद्दीने सामोरे जाणे. आयुष्यात पळत राहण्यापेक्षा थोड थांबून सुख कसं शोधायचं हे कोरोनाने शिकवले. निसर्गाचा आदर कसा करायचा. त्याचबरोबर समतोल राखणे फार महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून दिले. केवळ चिंता, विचार व्यक्त न करता ते प्रत्यक्षात आणण्यास भाग पाडले.
कोरानामुळे पैसा महत्वाचा नसून माणुसकीही तितकीच महत्त्वाची आहे हे पटवून दिले. आपले छंद पूर्ण करण्यास वेळ मिळाला. नवीन छंद जोपासले गेले. कामाच्या तणावापासून दूर असल्याने आराम व योग्य झोप मिळाल्याने दवाखान्यातील गर्दी ओसरली गेली. आरोग्य, संपन्न व सुदृढ राहण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. ती राखली अशा अनेक आजारांना आळा बसतो याचा अनुभव घेतला. दरवर्षी हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला ठरलेला नियमा पण या काळात घेतलेल्या खबरदारीमुळे व दक्षतेमुळे आरोग्याच्या बाबतीतआपण अधिक सजग झालो आहोत.
थोडक्यात कोरोगाने आपल्याला आत्मनिर्भर बनवले. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय मोडीस काढली. स्वावलंबी होण्यास शिकवले. अनिश्चित भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे, बचत करणे अशा बाबींकडे गांभियाने पाहण्यास शिकवले. आपले स्वास्थ्य आपल्या हाती आहे ही मुख्य शिकवण दिली. खरंच कोरोनाने “ न भूतो न भविष्यती" अशी अनुभूती दिली.
गट क्रमांक ३
शुभांगी पोटफोडे
पारितोषिक : प्रथम क्रमांक
श्री छत्रपती शिवाजी महाराज - व्यवस्थापन महागुरु
श्री छत्रपती शिवाजी महाराज ! एक व्यक्तिमत्व नव्हे तर एक अखंड संस्थाच असं म्हणावं लागले. 'शिवाजी ' या नावातच 'शिवा " ची " 'जीवा' शी गाठ घातली गेली आहे. ज्या जीवात 'शिव' सामावलं गेलंय ते सर्वच मराठी जनांच, भारतीयांचं आणि जगातल्या इतर देशांचंही आराध्य असणारच ह्यात नवल ते काय ? 'महाराज ! राजाधिराज ! ही उपाधी ज्या राजाला परीपूर्णर्तने शोभते हे असं दैवत. राजेपण हे 'गादी' वर असे राजेपण अबलंबून नसतं. ते मनालाच असावं लागत आणि असं राजेपण श्री छत्रपतींच्या प्रत्येक वागणुकीतून , जीवनातील विविध प्रसंगामधून नेहमीच आपल्याला ठळकपणे दिसून येते. उपभोग घेतो तो राजा नसतो. तर इतरांचे भोग संपवतो तो खरा राजा! आणि महाराज त्या अर्थाने राजांचे राजा होते.
आपल्या लेखाच्या विषयात' महागुरु' हा शब्द देखील सामावलेला आहे. गुरु = गु + रु. | गु- गुहय गूढ रूप तर रु = प्रकाश, जो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची अंधारातून तर वाट दाखवितो त्याला 'गुरु' म्हणलं जाते. शिवाजी महाराजांच्या जन्मकाळापूर्वी ३५० वर्षे महाराष्ट्राने अंधार अक्षरशः भोगला.
कित्येक पिढ्यांमधील आया बहिणींनी तो अनुभवला. पुरुषार्थ जवळ जवळ संपुष्टात आला असताना शिवाजी महाराजांच्या रूपाने ''महामेरू" चा जन्म झाला. 'निश्वयाचा महामेरू' असे महाराजांना म्हणले जातं. निश्चय जो शेवटापर्यंत नेतो, आपला पण पूर्ण करतो तोच महामेरू बनू शकतो.
आपण विचारात घेऊन या की महाराज या महामेरू होण्यापर्यंत कसे पोहोचले ? तर त्याला केवळ एकच उत्तर ' व्यवस्थापन ! आणि व्यवस्थापनच!' व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मूर्त आणि अमूर्त, सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारांच्या साधन सामग्रीचा मितव्यय करून अधिकाधिक परिणाम निर्माण करण कि ज्यातून सकारात्मक काही घडेल अशा संपूर्ण प्रक्रियेला व्यवस्थापन म्हणता येतं. शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टींचं व्यवस्थापन केलं. वेळ, धन, शक्ती, मनुष्यबळ, गोधन, अशा कित्येक गोष्टींचे त्यांनी अतिशय सुंदररित्या व्यवस्थापन केलं.
वयाच्या अवघ्या १३-१४ वर्षात रोहिडेश्वरची प्रतिज्ञा घेतली. आयुष्यातील उपलब्ध वेळेचे व्यवस्थापनच आहे हे. जेव्हा सर्व साधारण मनुष्य किशोरावस्थेत गोष्टी जगातील विविध गोष्टी समजून घेऊ लागतो त्या मिसरूड न फुटलेल्या वयात आपल्याच वयाच्या मावळ्यांचा चमू जमवून पर्वतराजी मधल्या खांदे कपारित शंकराच्या पिंडीवर रक्ताची
धार धरून 'हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा' केवढे मोठं शिवधनुष्य ! पण पेलेल. अगदी व्यवस्थित पेलल आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण स्वतःला कणाकणांत शिजवत स्वराज्य उभ देखील केले. संपूर्ण महाराष्ट्रात काय चालले आहे हे बघायला तेव्हा ना गुगल बाबा होता, ना विकी पिडीया ! फक्त चौफेर नजर ही नजर फक्त मनालाच असते, डोळ्यांना असते ती दृष्टी पण मनाला असते ती नजर ! या नजरेने सर्व भवतालचं विश्व जाणून घेतल त्या प्रमाणे सर्व हालचालाना सुरवात केली.
त्या वेळी वाटमारी करून उपजीविका करणारे पेंढारी, ठग हे त्यांनी 'हेरले. पण त्यांना महाराजांनी 'मारले' नाही. त्यांच्या त्या शक्तीचं योग्य व्यवस्थापन केलं. त्यांनी त्यांना लांडग्यांच्या शेपट्या' आणायला सांगितले. त्यावेळी मावळ खोऱ्यात लांडग्यांचा प्रचंड उपद्र्व होत होता. जवान, ताकदीचे वीर लांडण्यांच्या उपद्रवाला बळी पडत होते. त्यांना मारण्यासाठी या जीगरबाजांची नियुकी करणं हे फक्त केवळ राजेच करू शकतात. हे व्यवस्थापन त्यांच्या बळाच ! निधडया वृत्तीच | आणि त्यांना राज्याच्या मावळ सैनिकांमध्ये सामील करून घेतले. नकारात्मक शक्तीचा पुरेपूर वापर करून तिला सकारात्मक रूप दयावे केवळ महाराजांनीच. शक्तीच व्यवस्थापन, मनुष्य बळाचं हे एका अर्थाने व्यस्थपनच.
प्रत्येक मोहिम महाराजांनी आखली ती अतिशय काटेकोर . व्यवस्थापन करूनच. पहिला किल्ला तोरणा' स्वराज्यात दाखल करताना मिळालेले धन फक्त स्वराज्याच्याच कामी वापरले, आणि तटबंदी
अधिक मजबूत केली. गडाच्या बुरुजांची बांधणी केली कारण केवळ तोरणांच्या बुरुजावर
स्वराज्यावर घारीची नजर ठेवता येणार होती हे महाराज पक्के जाणून होते. राजे' पण
हे मनात असत. जर 'गादि वर बसेलला राजा झाले असते तर 'धनाची' रवानगी स्व-खजिन्यात करते झाले असते पण महाराजांनी तो खजीना सुराज्यात दाखल केला गंमतीने कौतुकान म्हणावंस वाटतं, की महाराजांच्या स्वराज्याच्या कामी यावं यासाठी त्या धनाचं नियतीनेच' व्यवस्थापन' केलं होते जणू गड, किल्ले जिंकत जिंकत दुर्गाच्या बांधणी पर्यंत स्वराज्याची सीमा पोहचवंत दर्याला देखील गवसणी घातला गेली ती केवळ सु-व्यवस्थापनातूनच.
तिथेही सिद्धी, डच, पोर्तुगीज यांच्या हालचालीवर अत्यंत बारकाईने नजर ठेवता यावी यासाठीच सारी व्यवस्था केली. त्यामुळेच तर टोपीकरांना महाराजांनी तंबी दिली. 'व्यापारी म्हणून आला आहात तर फक्त व्यापार करा. स्वराज्यात ढवळा ढवळ खपवून घेतली जाणार नाही! 'फिरंगी काय करू शकतात? हे महाराजांनी आधीच जाणण हा व्यवस्थापनातील आणखी एक महत्वाचा गुण. भूतकाळात डोकावून झालेल्या चूकांची पुनरावृत्ती न होऊ देता, वर्तमानात कृती करायची आणि उज्ज्वल भविष्य काळ घडविण्याचा सुबक प्रयत्न करायचा हे व्यवस्थापन नाहीतर काय !
'सुरतेवर छापा घालण्याआधी, सुरत शहराच्या महाद्वारापाशी दोन महिने एक चांभार पादत्राणं शिवत बसलेला असे. त्याने नजर ठेवली. केव्हा चीजवस्तू येतात, केव्हा धन येतं, केव्हा व्यापारी शहरात येतात, केव्हा व्यापार करण्यासाठी शहराच्या बाहेर जातात सारी बित्तंबातमी आधी गोळा केली आणि छापा. पूर्ण चोख व्यवस्थापन ! त्या लुटीच्या गदारोळात सुरतेमधील आया बहिणी बालकांच्या सुरक्षिततेचही चोख व्यवस्थापन' किती बारीक लक्ष! जो छोट्या गोष्टींचं महत्व जाणतो. तोच मोठ्या गोष्टींची महती समजू शकतो. आणि प्रत्येक गोष्टीतलं मर्म ओळखून पुढे पावलं टाकणं केवळ शकय होतं ते चोख व्यवस्थापनातूनच.
अफजलखान वधाच्या वेळी तर महाराजांना परत जीवंत येऊ किंवा नाही याची शाखतीच नव्हती. पण 'राजा' गेला तरी 'राज्य' मरणार नाही याचं पुरेपूर व्यवस्थापन करूनच जीजाऊंच्या हाती कारभार सोपवून महाराज प्रतापगडावर गेले. जो कधीच 'मरण' विसरत नाही, तोच यशस्वी जगू शकतो . मरणाची ' आठवण' जीवनाला आकार देते. मग
मानव प्रत्येक क्षण डोळसपणे जगू शकतो. जीवन-मृत्यू या दोन श्वासामधल्या अंतराचं ते सोपवून व्यवस्थापनच होतं.
'जाणता राजा' एकच ! जो आपल्या मावळ्यांना सर्व युद्धनीती शिकवतो, 'गनिमा कावा' शिकवतो, हल्ला करण्याची अचूक वेळ सांगतो तोच कर्तव्य कठोर राजा प्रसंगी मावळ्यांची 'आई' होतो. रात्री झोपताना छावणीतले दिवे विझवून झोपा, जर उंदरांनी पेटती वात तोंडात धरून नेली तर छावणीला आग लागेल
ही काळजीची सूचना देताना त्यांच्यातलं आपल्या मावळ्यांविषयीच मातृत्व जाग होत.
भावनांचे व्यवस्थापन यापेक्षा वेगळं काय असत ? कल्याणचा
खजिना लुटताना बरोबर आपलेली सौंदर्याची खाण सुभेदाराची सून पाहून ज्यांना त्या सौंदर्या पेक्षा आपल्या मातेची आठवण येते हे देखीन मनुष्य जन्माला येऊन भावभावनांचं केलेलं सुंदर व्यवस्थापनच. म्हणूनच व्यवस्थापन केवळ वेळ, धन यांचच नसून ते कोणत्या वेळी कोणत्या भावाना
किती महत्व द्यायचं याचंही असायला लागत. तरच मानवाचा ' महामानव' होतो. अन्यथा व्हायला एक क्षण भावभावनांची घसरण होऊन मानवाचा पुरेसा 'दानव' व्हायला एक क्षण पुरेसा असतो.
प्रत्येक मोहिमेत एकेक वीर गमावला जो राजांनी जीवापाड प्रेम केलेला होता. त्यामुळे राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाधिष्टीत होताना त्यांनी सात पायरांची व्यवस्था केली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुर्जर अशासारख्या खंद्या वीरांमुळे आपण ही प्रत्येक पायरी चढून सिंहासनावर आसनस्थ होऊ शकतोय हे 'राजा' कधीही विसरला नाही. म्हणूनच आपण म्हणतोय मनाचा राजा.
मनाचं राजेपण कधीही विसरले नाहीत महाराज. संपूर्ण राज्याभिषेकाचं त्यावेळी चितारलेलं चित्रे आजही अजरामर आहे. " यावच्चंद्र दिवाकरौ.
ते अबाधितच राहिल. प्रचंड मोठ्या सोहळ्याचं आयोजन ही उत्तम व्यवस्थापनाचे जातीवंत उदाहरण. गागाभट, आठवा हेन्री, मावळ प्रांतातील जनता हे सारसार केवळ डोळे मिटून क्षणात नजरेसमोर येते. अगदी प्रत्यक्ष सोहन या डोळ्यांनी न अनुभवता देखील.
महाराजांच्या अनेक मोहिमा, प्रसंग हे सारे उत्तम व्यवस्थापनाचे सर्वोत्तम नमूने. आज आपण सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये
व्यवस्थापन शाखेचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमधून
'व्यवस्थापक, आयोजक' घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण महाराज कधी कोणत्या जाऊन " एम्. बी. ए. झाले होते झाले होते. त्यांचे जीवन महाविद्यालय एकच! त्यांची जननी हीच त्यांची महागुरू ! या गुरूंनी जे दाखविलं, जी जाण दिली आणि शिवाजी महाराजांनी ती आपल्या धमन्यांमधून सतत चेतवत ठेवली. त्यामुळेच आपल हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज व्यवस्थापन "महागुरू' म्हणून पहातोय.
सतत दहा वर्ष चाललेल्या इराक-इराण युध्दान 'इस्त्रायल सारखा एक छोटासा देश खेचला गेला. या देशाचं क्षेत्रफळ किती ? तर असे म्हणले जाते की आपल्या मुंबई शहरा इतकं पण तिथली युद्ध परिस्थिती तिथल्या राज्य कर्त्यांनी इतकी चोखपणे हाताळली की तिथे कमीत कमी वित्त हानी आणि शून्य मनुष्य हानी झाली. बॉम्बगोळ्यांचा वर्षाव झाला तर कसे तोंड दयायचे हयाचे धडे तिथल्या जनतेला आधीच दिले जातात. युध्दात त्यांची मन:स्थिती खचत नाही: ध्येय जराही ढळत नाही. इतकेच काय शाळकरी मुलं देखील परिस्थिला सहज सामोरी जातात. त्या युद्ध काळात
त्यांच्या देशात प्रत्येक आस्थापनेच्या इमारतीखाली सुरक्षित बंकर्सची रचना केलेले होती. जर बॉम्ब बर्षाव झाला तर चोरवाटेने ताबडतोब खाली बंकर्स मध्ये जाऊन आपले काम जणू काही घडलंच नाही अशा थाटात पुढे सुरू करायच, अगदी शालेय शिक्षण देखील याला अपवाद नव्हतं. विविध प्रसृतीगृहामध्ये बालकापासून माता पर्यत, तिथल्या सर्व कर्मचारी वर्गाला श्वास कोंडू नये आणि बॉम्बस्फोटातून निर्माण झालेल्या विषारी वायुंचा उपद्रव होऊ नये यासाठी मुखवटे (मास्क) तयार केले होते. हे
सर्व इथे मांडण्याचं एक अतिशय सशक्त कारण आहे. जेव्हा इस्त्रायलच्या प्रमुख प्रतिनिधीना विचारलं गेलं की 'तुम्हाला हे एवढं सर्व कसे काय शक्य त्यावेळी त्यांनी एकच उत्तर दिले, ' शिवाजी महाराजांची आणि नीती "
आपले महाराज आपल्याला सापडावेत ते दुसरया देशातील व्यवस्थापनात. ही जितकी अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. तितकीच ती "अंतर्मनात डोकावून पहाण्याची देखील गोष्ट आहे.
महाराजांनी कधीच स्वत:चा उदो उदो केला नाही. आई जगदंबेला आणि जननी जीजाऊंना, छातीवर वार झेलणाऱ्या मावळ्यांनाच त्यांनी श्रेय दिलं. स्वतःला जराही यश चिकटू न देणं आणि पाय जमिनीवर राखणं हे अत्यंत गरजेच असते. तरच व्यक्ती रेखीव व्यवस्थापन करू शकते.
आजमितीला सर्वच जगात विविध देशात पुतळे कोणत्या राज्यकर्त्यांचे आहेत यावर एक पाहणी सर्व देशांत केली गेली आणि अत्यंत जाज्वल्य अभिमान जागृत व्हावा अशी अशी माहिती समोर आली. सर्वात जास्त पुतळे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. जे पुतळ तिकडे उभारले गेले त्या मागची कारण मिमांसा देखील शोधली गेली आणि आणखी एक मार्मिक सत्य समोर आलं की शिवाजी महाराजांच्या युध्दामध्ये अवलंबिल्या गेलेल्या व्यवस्थापननीती साठी त्यांना आदर्श राजा मानलं जातं. त्यांच्या जीवनाचा संपूर्ण पट जाणून घेताना त्यांच्या लक्षात आले की महाराज जीवनात अधिकाधिक वेळ स्वराज्य 'वर्धिष्ण' करण्याच्या कामगिरीत गढलेले असताना देखील त्यांचं स्वराज्या अबाधितपणे, अतिशय सुरक्षितपणे राखलं गेले. ज्यावेळी कोणतीही साधन सामुग्री, दळण वळणाची सोय, संपर्क व्यवस्था यांची पूर्ण पणे वानवा होती त्या काळात जे व्यवस्थापन महाराज आणि स्वराज्याच्या मुशीत तयार झालेले त्यांचे पाईक यांनी राखल ते सारं आजही इतकं अजब वाटतं की अत्याधुनिक काळात सर्व तंत्रज्ञान हाताशी असतानाही कित्येक व्यवस्था आपण आणीबाणीच्या काळात ढासळताना पहातो. याचं कारण आहे आपण तंत्रज्ञानाने संपर्क साधू शकलो पण इतरांशी संपर्क साधताना आपण आपल्याशी किती संपर्कात राहिलो. आपल्या त्रुटी, आपल्या क्षमता यांचा आम्ही कधी सखोल अभ्यास केला.? आपल्यातल्या त्रुटी दूर सारून, क्षमता वाढवत नेणे म्हणजे व्यक्तिमत्वाला योग्य आकार देणं: आजच्या काळची ही गरज आहे. जर प्रत्येक व्यक्तिमत असं घडत गेलं तर मानवी शक्तीचं सुव्यवस्थापन होईल.
मन मनाशी जोडलं जाईल. महाराजांचा प्रत्येक मावळा स्वराज्याशी मनाने जोडला गेला होता आणि म्हणून केवळ तो फक्त फक्त स्वराज्याचाच विचार सतत करत होता. स्वराज्याचा ध्यास हाच त्याचा वास होता. आज आपणही त्याच नजरेने चाललो तर १९४७ मध्ये पूर्वजांनी बहाल केलेल्या स्वराज्याचे' 'सुराज्य' 'होईल. माणसांनी माणसांशी मनाने जोडलं जाण्याचे व्यवस्थापन गरजेचं आहे. मग इथे भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, शिक्षणात होणारे गैरव्यवहार, साधन संपत्तीचे अपहार, इ. अनेक गोष्टी सहज संपुष्टात येतील. महाराजांच्या काळात बाह्य शत्रू होते. अंतस्थ शत्रूचा बंदोबस्त
महाराजांनी केलेला होता. पण स्वराज्यातील प्रत्येक मावळा सुरक्षित होता. याला कारण महाराजांच्या नजरेनी घेतलेली गरुडप.. आज आपल्या तरुणाईत ही निर्माण व्हायला हवी आहे. सामुग्री, साधने यांची उपलब्धता आहे. गरज आहे ती फक्त सुव्यवस्थापनाची. त्यासाठी महाराजांना अंतःस्थ चक्षूंनी पहायला हवं. त्यांचं व्यवस्थापन जपायला हवं. 'निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारु !" कालातीत सत्य आहे.
जयहिंद ! जय महाराष्ट्र...
गट क्रमांक ३
विभावरी सतीश दामले
पारितोषिक : व्दितीय क्रमांक
"आधुनिक शिक्षण पद्धती-2022"
विद्यानाम नरस्य रुपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम् । विद्या गुरुणाम् गुरु ॥
अशा विचारांच्या संस्कारांमधून शाळेत प्रवेश घेतला. शाळाही अलौकिक प्रत्यक्ष जगन्नाथ शंकरशेट संस्थापित शिक्षकवर्ग भारावलेला. माझे नव्हे माझ्या पिढीचे भाग्यही असे की लौकिकदृष्ट्या आधुनिक शिक्षणाच्या मांडवाखालून जाणाऱ्या पहिल्या संघाचे (बॅचचे) आम्ही विद्यार्थी
हो! 1966 कोठारी कमिशनने प्रस्तुत केलेल्या शैक्षणिक धोरणांच्या तरतूदींवर आधारित प्रत्यक्ष शिक्षण पद्धती आस्तित्वात आली 1975 साली.
मग त्यापूर्वीची शिक्षणपद्धती कशी बरं होती? भारतीय स्वातंत्र्यानंतर 1947 साली मौलाना अबुल कलम आझाद यांनी सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला. तथापि शिक्षणाची ध्येये/बीद सुनिश्चित झाले नव्हते. त्यामुळे काही शिक्षणसंस्था महात्मा गांधी
प्रणित बुनियादी शिक्षणाचा स्वीकार करत. काही शिक्षणसंस्था बिवेकानंद यांची शैक्षणिक विचारप्रणाली
मानत. तर रविंद्रनाथांचे
खुले वातावरण काही शिक्षणसंस्थांना मानवले. 1948 साली भारत
भर अनेक शिक्षणसंस्था उदयास आल्या. 'शीलं परं भूषणम्।' 'सा विद्या या विमुक्तये।' "विद्या तु सेवार्थम् ।' 'विद्या गुरुणाम गुरु' अशी ब्रीदवाक्ये त्यांनी धारण केली होती. राधाकृष्ण कमिशन आदि काही प्रसंगोचित शिक्षण समित्यांनी शिक्षणपद्धतींना आकार व आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला खरा! पण लॉर्ड मेकॉलेच्या मानसिकतेतून शिक्षणपद्धत बाहेर येऊ शकली नाही. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरच आणि भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरच शिक्षण कुणासाठी.. कशासाठी याचा परिप्रेक्ष स्पष्ट- हळूहळू का होईना - स्पष्ट होऊ लागला.
1961 साली NCERT स्थापना झाली,IIT स्थापना झाली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टपणे कास धरली. आधुनिकतेचे ठसे शिक्षणपद्धतीमध्ये उमटले जायला हवेत असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले. त्यानंतर शिक्षणक्षेत्रात ठोस भरीव असे धोरणात्मक परिणाम करणारे खरेखुरे आधुनिक, राष्ट्रीयत्वाचा झेंडा हाती घेतलेले शिक्षण कसे असावे यावर विचार विमर्ष सुरु होऊन पहिली आधुनिक शिक्षणपद्धती उदयास आली कोठारी कमिशन (1964-1966) हे त्याचे शिल्पकार.
आज सप्टेंबर 2022. सर्वत्र चर्चा आहे. NEP 2020
ची म्हणजे नवे आधुनिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. [New Education Policy 20201] अर्थात शिक्षणाच्या मांडवा खालून गेल्या 75 वर्षात 68% पेक्षा अधिक समाज गेल्यामुळे
असे काही धोरण शैक्षणिक विचार-आचारांमागे असते याची जाणीव कुठेतरी समजते. समजू शकते. प्रसारमाध्यमांचाही मोठ्ठा
वाटा यामागे आहे. चर्चा / महाचर्चा/परिसंवाद / वृत्तपत्रांतील ठळक मथळे आणि पंतप्रधानांच्या छबीसह प्रसृत निवेदने
यांचा प्रभाव जनमानसावर निश्चित पडतो.
1970 सालापर्यंत "साळंत जाऊन काय करायचे ?? बस घरीच
बरायेस गड्या." अशी वाक्य घरोघरी सहज उमटायची निथून आज जवळजवळ प्रत्येकजण
शिक्षणावर शिक्षणक्षेत्रावर...शिक्षणपद्धतींवर बिनधास्त मते देऊ लागला आहे
असे चित्र आहे. जनसामान्य असो वा तथाकथित ग्यानी.
सूर"बट्ट्याबोळ" राग आळवतो.
खरंच अशी शिक्षणपद्धती सदोष असते का? मूठभर लोक.शिक्षण आणि शिक्षणपद्धती जनसामान्यांवर लादतात का? शिक्षण विषयक GR हे फतवे स्वरूपाचे असतात का? कार्यवाही नेहमीच सदोष असते का? "बट्ट्याबोळ" असं का बरे वाटते ? शिक्षणविषय निर्णय तुघलघी असतात का? कोण बरे होते हे निर्णय ?
आजमितीस 2022 साली भारतभर जी शिक्षणपद्धत अस्तित्वात आहे. प्रचलित आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चे फलित आहे. शिक्षणमहर्षी जे.पी.नाईक, के.सी. पंत यांच्यासारखे तज्ञ या समितीत होते. या समितीने प्रथमच शिक्षणाचा वैश्विक विचार (Global approach) व स्थानिक गरजा (locat requirement) याचा समन्वय साधत अनेक अत्यंत उपयुक्त शिफारशी केल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही करताना त्यामध्ये काही चांगले बदल 1992 1996 साली करण्यात आले. 2000 चे शतक (मिलेनियम) ओलांडतांना आधुनिक शिक्षण हे आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करेल याकडे प्रकर्षाने लक्ष पुरविण्यात आले होते. मग बट्ट्याबोळ नेमका होतो कुठे आणि कसा?
बट्ट्याबोळ नेमका होतो कुठे आणि का? 1986 चे धोरण उत्तम आहे. त्यात आदिवासी
उपेक्षित, वंचित, दिव्यांग स्त्रिया अशा सर्वांच्या एकात्मिक शिक्षणाचा विचार आहे. नुसताच विचार नाही तर Fuluproof नियोजन आहे.
आश्रमशाळा, नवोदय विद्यालय, खडू-फळा मोहिमा लोकसहभाग शाळकरी गरजूंना माध्यान्ह भोजन यासाठी सुनिश्चित तरतूदी केल्या आहेत आणि आर्थिक तरतूदी आहेत. तिथे झिरपी आहे या शैक्षणिक धोरणाचे अध्वर्यू स्व. राजीव गांधी यांनी हीच झिरपीची थिअरी पंचायत राज योजनेच्या कार्यवाहीबाबत देखील मांडली होती. तसे होऊ नये म्हणून कळकळीने आवाहनही केले होते. पण राजीव गांधी यांची हत्या झाली; राजकीय उलथापालथी अनेकवार झाल्या, सत्तापालट झाले कैक…यात 'शिक्षणक्षेत्र' दुर्लक्षित राहिले.
Power Carrupts & Absolute
power corrupts absolutely असे म्हटले जाते. 2K ने जागतिक स्पर्धेत भारताला नव्हे भारतीय मानसिकतेला उतरवले. स्पर्धा - स्पर्धा पळा पळा कोण पुढे पळे तो ….. यामुळे विजयी नव्हे यशस्वी होण्याचीच अहमहमिका लागली आणि स्पर्धेने संघर्षाचे स्वरूप धारण केले.
दुसरे म्हणजे 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्य शिक्षण मंत्रालयाचे नावच बदलले. आता शिक्षण मंत्रालयाला नवे नाव मिळाले 'केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि संसाधने मंत्रालय' भले शेक्सपिअर बाबांनी म्हटले असेल की "नावात काय आहे ? " "You spelt a rose by any name,
but it will smell a rose पण इथे तसं झालं नाही. शिक्षक हा संसाधन (Resource) बनला. शिक्षण म्हणजे राष्ट्रीय संसाधनांचा विकास (empowerment of the
national resources) बस्स. शिक्षणातील आस आस्था ओढ enlightenment संपून एक रुक्षपणा त्यात आला. म्हणजे म्हणतात ना, तशी मुळांतली ओल सुकत चालली. कर्तव्यशुष्कता आली. शिक्षक हा केवळ साधन बनला हो ! शिक्षकांची गुरु म्हणूनची भारतीय संस्कृतीने ओळख पुसट होऊ लागली. शिक्षक विद्यार्थी आटू लागली.
कोण होता तुम्ही | काय झाला तुम्ही ॥
अरे शिक्षकांनो: वाया गेला तुम्ही………
अरे विद्यार्थ्यांनो, वाया गेला तुम्ही………
अशी तू-तू-मैं-मैं..समाजात दिसू लागली. कर्तव्याहून उंच आवाज हक्कांनी लावला.
पण पायाभूत तत्वे उदात्त असल्याने अनेक चांगल्या निस्पृहणीय गोष्टी घडताहेत. चांगल्या फळे किडकी निघत नाहीत. 130 अब्ज लोकसंख्येचा आपला देश, किती स्तरावर वैविध्य आहे इथे || भाषिक, प्रांतिक, धार्मिक, स्थानिक, राजकीय विचार, आर्थिक स्तर…. एक माणूस दुसऱ्या सारखा नाही. सर्वांना सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा विचार करणे हेच अद्भुत आहे.
महाराष्ट्रातच बघा ना, मराठी मातृभाषेत शिक्षण द्यायचं झालं तर कोकणी मालवणी, कोल्हापूरची.. पुण्याची.. जळगावची.. धुळ्याची.. नागपूरची.. मराठवाड्याची निगडचिरोली प्रत्येक प्रांतातील बोली वेगळी. प्रमाणभाषेचा आग्रह म्हणूनच तर राजकीय पक्ष सुमार बुद्धीचे प्रदर्शन अरेरावीने करता त… त्यातून दंगेही घडवतात. हे मी एक साधस उदाहरण देतेय. प्रांतीय अस्मिता तर इतक्या टोकदार आहेत की टू म्हणता जाळपोळ सुरु 'असो.
असे सर्व असतानाही आज महाराष्ट्रान 98% मुले शाळेत प्रवेश घेतलेली आहेत असे अहवाल सांगतो. शाळाबाहय मुलांना शाळेत आणणे. गळती रोखणे. शाळेत आनंददायी शिक्षण देण्यासाठी वातावरण निर्माण करणे हे शासनाने बंधनकारक केलेय. अर्थात अशा शासननिर्णयांविरुद्ध गळे काढणं ओघाने आलंच.
'आठवीपर्यंत सर्वांना उत्तीर्ण करण' हा असाच एक वादग्रस्त निर्णय - आत्मा समजून घेणं महत्वाचे. Right to Education 2009 मुळे मुलांना 6 ते 14 वर्षे शाळा शिकूणं अनिवार्य आहे. पण नापास झाल्यानंतर मुले विशेषतः मुली शाळा सोडतात. त्या माध्यान्ह भोजनाला मुकतात. कुपोषितपणा वाढतो. शाळा सोडलेल्या मुलींची लगेच लग्न लावले जाते. कुपोषित आणि अल्पवयीन मुलींचे लग्न ….. आणि सर्वांना न शिकवता. …न शिकता उत्तीर्ण करा' असा नियमच नाहीये. 'जन्माला येणारे प्रत्येक मूल स्वतःची एक उपजत समज घेऊन जन्माला येते. ती उपजत समंज फुलवा. समजून घ्या. मूल लिहित नसेल त्याला बोलते करा बोलत नसेल कृती करवून घ्या.. कृती करत नसेल तर त्याला जे जमेल ते शिक्षकांनी समजून घ्या हलकेच व्यक्तिमत्व विकसन करा. मुलाचे सामाजिकीकरण करा असे आग्रहाचे प्रतिपादन शिक्षकांसाठी केलेले आहे यालाच म्हणतात अकारिक मूल्यमापन.
1986 च्या या शैक्षणिक धोरणाने गेल्या ३५ वर्षात अनेक यशस्वी बदल घडवले. भारताची महासत्ते कडे वाटचाल सुरु झाली ती याच कालखंडात.
या शैक्षणिक धोरणातील बऱ्यावाईट शिफारसींचा परामर्ष घेऊन सिद्ध आहे नवे आधुनिक शैक्षणिक धोरण 2020.
'भूतकाळाच्या पायावर उभे राहून वर्तमान नेहमी भविष्याचा वेध घेत असतो' असे म्हणतात. Destiny of nation is being carved in the 4 walls of the
class' असे 1966 च्या शिक्षणपद्धतीने प्रतिपादले .
चार भिंतीतील शिक्षणाला 1986 च्या धोरणाने भिंतींबाहेर आणून अधिक वैश्विक केले आहे. Digital
education, दूरस्थ शिक्षण, बहिस्थ शिक्षण, मुक्त शिक्षण, Doorstep education. पहा ना, कोरोना काळात जगभर हाहा:कार माजला असतानाही आपल्या शिक्षकांनी कसकसे सारे नवे संदर्भ आत्मसात केले. मुलांना ऑनलाईन शिकवले. थोडेथोडके नाही तर तब्बल 2 वर्षे 'रणजित डिसले गुरुजी', खरेखुरे ग्लोबल टीचर म्हणून सन्मानित झाले. असे अनेक झळझळीत कार्य शिक्षकांनी केले. करताहेत. मुलांना self study ची जाण आलेय. येतेय. आता वेळ आहे 'भारत एक महासत्ता' हे सांगण्याची. आणि NEP 2020 याच आत्म्याचा पुनरुच्चार करत आहे.
NEP 2020 मध्ये भविष्यातील भारत कसा असेल कसा असावा याची स्वप्न साकारणारी तत्वे त्यात आहेत. सर्वांसाठी शिक्षण - सहजशिक्षण- आनंददायी शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण- उत्तरदायित्वाचे शिक्षण. मातृभाषेतून शिक्षण. समजणारे. भारताचे वैविध्य, परेपरा प्राचीन वारशाचा उद्गार जागणारे शिक्षण खास लक्षण, 5-3-3-4 स्वरुपाची ही आधुनिक शिक्षणपद्धती असेल हेही यांचे खास लक्षण आहे. वय वर्षे 3 ते 6 यामध्ये बालकाच्या मेंदूची वाढ होत असते. या वयात ज्ञानाचा परिषोष करणारे अंगणवाडीमधून शिक्षण.
तिसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे. शिक्षकाला सन्मान देणारे शिक्षण. शिक्षकाला बुद्धीमान म्हणून विशेष प्रशिक्षण देणारी शिक्षण पद्धती.भूतकाळाचा उज्ज्वल वारसा जपत जतन करत आधुनिकतेचा वसा सांभाळणारी व जगाला मार्गदर्शन करणारी ही शिक्षणपद्धती भारताच्या या अमृतमहोत्सवी वर्षात अमृतजीवी संजीवनी ठरेल असा मला विश्वास वाटतो. जय हिंद
भू-अलंकरण दिवस २२'एप्रिल.
*भू-अलंकरण:रांगोळी*
*आनंदाचा सण*
*दिवाळी दिवाळी*
*रंगरंगांची उधळण*
*अशी ही*
*रांगोळी रांगोळी...*
आनंद, चैतन्य, उत्साह, जल्लोष, आतिषबाजी व रोषणाई यांचा मेळ घालणारा सण म्हणजे दिवाळी!! आजूबाजूचा परिसर दिव्यांच्या आणि रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघत असताना सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ती लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रत्येक दारासमोर घातलेली रंगांत रंगलेली आकर्षक रांगोळी!
रांगोळी म्हणजे भू-अलंकरण!
जमिनीवर केलेले सुशोभन! संस्कृतमध्ये रांगोळीला रंगवल्ली म्हणतात म्हणजे रंगांच्या रेखाटलेल्या ओळी! विविध साहित्यांचा वापर करून जमिनीवर काढलेली चित्रे, आकृत्या म्हणजे रांगोळी! रांगोळी म्हणजे बोटांच्या चिमटीतून, पांढरे शुभ्र चूर्ण जमिनीवर सोडून,त्यात आकर्षक रंग भरून चितारलेली नयनरम्य आकृती!
रांगोळी ही मांगल्याचे, पावित्र्याचे, प्रसन्नतेचं प्रतीक! "घराची कळा अंगण सांगे" या उक्तीप्रमाणे, घराच्या अंगणात सडासंमार्जन करून सारवलेल्या जमिनीवर घातलेल्या रांगोळीवरून त्या घराची शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, ऐश्वर्य, समृद्धी आणि घरातील महालक्ष्मीचा वास प्रकट होतो. प्रत्येक स्त्री ही आपल्या उपजत गुणांनुसार रांगोळीत आपले कलाविष्कार साकारत असते. रांगोळी घालणारी स्त्री म्हणजे साक्षात महालक्ष्मी!! रांगोळी घालतांना तिच्यात अध्यात्मिक प्रसन्नता निर्माण होत असते.
रांगोळी ही चौसष्ट कलांपैकी एक. मूर्तिकला, चित्रकलेपेक्षाही प्राचीन. रांगोळीचा उल्लेख वेदांमध्ये आढळतो. आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच पारशी धर्मातही रांगोळी शुभसूचक मानली जाते. रांगोळीला अल्पना असेही म्हणतात. अल्पना म्हणजे आलेपन-लेप करणे. प्राचीन काळी असा विश्वास होता की कलात्मक चित्रे घरात काढली की घर,धनधान्य सुरक्षित राहते. रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून , रांगोळीतून येणाऱ्या सात्विक लहरींनी सकारात्मक वातावरण तयार होत असते. अंगणात, उंबरठयावर, देवघरात, तुळशीवृंदावना समोर रोज रांगोळ्या घातल्या जातात. तसेच लग्नसमारंभ, सण-उत्सव, कुळाचार प्रसंगी मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात.
रांगोळी ही आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान प्रकारात घातली जाते. आकृतीप्रधान रांगोळीमध्ये भौमितिक आकृत्या काढल्या जातात तर वल्लरीप्रधान मध्ये पाने, फुले, कुंदन इ. चा वापर केला जातो. रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, भाताची फोलपटे, संगमरवर-गारगोटी- डोलेमाईट दगडाचे चूर्ण, धान्य, पाने-फुले, विटांची पूड, हळद-कुंकू, वाळू, गुलाल इ.चा वापर करून प्रतिकात्मक आकृत्या काढल्या जातात. येणाऱ्या नवीन वर्षात घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण या विशेष रांगोळी प्रकारात मांगल्यसुचक शुभचिन्हे, सूर्य-चंद्र-तारे, विविध देवता, आयुधे, पाळणा, गोपद्म इ.प्रतीके अध्यात्मिक अनुभूती देतात. आशयसंपन्न प्रतिकांतून विचारांचे व भावभावनांचे सौंदर्य अधोरेखित करणे हाच रांगोळीचा मुख्य हेतू!
महाराष्ट्रात ठिपक्यांची रांगोळी या पारंपरिक प्रकारासोबतच आता संस्कारभारतीचीही रांगोळी खूप प्रसिद्ध आहे. चाळणीच्या सहाय्याने रंग भरून, त्यावर पाच बोटांच्या सहाय्याने सफेद रांगोळीने आकृत्या काढल्या जातात. पाण्यावरची रांगोळी हा अजून एक लक्षवेधक प्रकार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. ताटाभोवती फुलांची महिरप काढली जाते. पोर्टेट रांगोळीत प्रसिद्ध व्यक्तींची अगदी हुबेहुन रांगोळीचित्रे साकारली जातात.ताटाभोवती, उंबरठ्यावर, यज्ञाच्या वेदीभोवती बॉर्डर रांगोळी घातली जाते. फेव्हीकॉल मध्ये रंग मिसळून तसेच तेलाच्या रंगाने दारात कायमस्वरूपी रांगोळी घालता येते.
रांगोळी आकृत्या काढण्यासाठी हल्ली बाजारात छाप,पेन इ. साधने उपलब्ध आहेत. महिलांसोबत आता पुरुषही रांगोळीप्रकारात पारंगत आहेत. रांगोळीकलाकार म्हणून व्यवसाय करत आहेत. विविध स्पर्धा,प्रदर्शन यांतून रांगोळी कलाकारांना उत्तेजन देऊन सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न होत आहे. प्रदर्शनामध्ये वास्तवदर्शी व्यक्तिचित्रे, पर्यावरण, सामाजिक विषयांवर आधारित मुक्तहस्त रांगोळ्या चितारल्या जातात.
इतर कलांच्या तुलनेत रांगोळी ही लोककला काळाप्रमाणे बदलत असून अजून समृध्द होत आहे. घरच्या दारातली रांगोळी आता सातासमुद्रापार पोहचली आहे.
हा रांगोळीचा महिमा पुर्वापार चालत आलेला आहे. असे हे..
*रांगोळीच्या कलेचे वैभव*
*असेच सर्वत्र जगभर पसरावे..*
*हिंदू संस्कृतीच्या पताकेने*
*चहू दिशांत उंच उंच फडकावे..*
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक विभाग आयोजीत दुसऱ्या रांगोळी प्रशिक्षण शिबिराला २८ जानेवारी पासून सुरुवात झालेल्या ५ फेब्रुवारीला यशस्वी सांगता झाली. सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, यात २५ जणांचीच बॅच झाली.
सर्वांनी शिबिराचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. सर्वांची रांगोळीची आवड आणि मेहनत दिसत होती. शिबिराची सुरुवात, मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.अरूणजी चव्हाण, कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वरजी भालेराव, श्री.अजयजी माने, सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
सौ.करुणा सावंत यांनी आपल्या भारतीय परंपरेतील रांगोळीचे महत्त्व सांगितले. मा.अरूणजी चव्हाण, मा.महेशजी चव्हाण,सौ.माधुरी तळेकर,सौ.रश्मी राणे व सौ ऐश्वर्या ब्रीद यांनी आपले मनोगत मांडले. सौ. करूणा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.चहापानानंतर प्रशिक्षणाची सर्व सूत्रं सौ.ऐश्वर्या यांनी घेतली. त्यांना करुणा यांनी उत्तम साथ दिली. नाव नोंदणीची जबाबदारी सौ.मनीषा साळवी आणि सौ.मानसी म्हामुणकर यांनी उत्तमरित्या पार पाडली.
या शिबिरासाठी लागणारे ४० किलो रंग आणि ५० किलो सफेद रांगोळी बाजारातून आणण्यापासून ते सर्व सामान प्रत्येकी १ किलो पॅकिंग करण्यापासून सौ. ऐश्वर्या ब्रीद यांना गणेशभाऊ,परब मामा,भुवड मामा,राजेश भाऊ,पिल्ले मामा यांची खूप मदत झाली. प्रवेशद्वारावरील सुंदर रांगोळी सौ. करूणा सावंत यांनी घातली.
पहिल्या दिवशी उपाध्यक्ष मा.श्री. सुदामजी म्हामुणकर,कोषाध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी देसाई, सौ.मिनल सावंत, सौ.वृंदा शिर्के यांनी शिबिराला भेट दिली.
अध्यक्ष मा.श्री.शिर्के काका यांचे मार्गदर्शन,सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ यांचे प्रोत्साहन आणि सर्व उपसमिती सदस्य यांचे सहकार्य यांमुळे आपले शिबिर यशस्वी होणारच.
*श्री स्वामी समर्थ मठ,पळसदरी* *॥ एक अनुभूती II*
आज अचानक गणेश जयंतीच्या निमित्ताने पळसदरीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा योग जुळून आला. गेल्या दोन दिवसांपासून माझ्या मनात मठाला भेट देण्याचे विचारचक्र सुरू होते. नामस्मरण करतानाही तोच विचार. मी इच्छा प्रकट केल्यावर यजमानही लगेच जाऊया म्हणाले. फक्त मला जमेल का, हे महत्त्वाचे! कारण माझी तब्बेत हल्ली थोडी बरी नसते. जमेल की नाही ही शंका कुठेतरी मनात यायची. पण काल रात्री स्वामीं समोर प्रार्थना करताना म्हटले, स्वामी तुमच्या दर्शनाला येण्याची मनापासून खूप इच्छा आहे. मला सुखरूप तिथे जाऊन, घरी सुखरूप परत आणण्याची तुमचीच जबाबदारी आहे. कारण तिकडचे काहीच माहित नव्हते. माझी मैत्रिण एकदा मला म्हणाली होती, खोपोली गाडीने पळसदरीला जायचे. तिथून रिक्षा असतात.
पळसदरीला जायला मुलुंडवरून सकाळी ८.०६ वा.च्या खोपोली लोकलने आम्ही उभयता निघालो. साधारण १० वाजता पळसदरी स्टेशनवर उतरलो. परंतु पुढे जायचे कसे काहीच कळत नव्हते. उतरलेले २-३ लोक पटापट प्लॅटफॉर्मवरून उड्या मारून निघून गेले. विचारायलाही कुणी दिसत नव्हते. प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला गावातील ३-४ बायका बसल्या होत्या. त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या, इथे रिक्षा वगैरे काही नाहीत ताई. तुम्हाला या पायवाटेनेच जावे लागेल. १५-२० मिनिटे लागतील. रस्ता तसा खडकाळ आणि अरुंदच होता. मला चालणे अवघडच होते. स्वामींचे नाव घेऊन सुरुवात केली तोच, तिथे बाईकवर बसलेला एक मुलगा दिसला. त्याला विनंती केली. बोलत असताना दुसरे एक गृहस्थ बाईक वरून तिथे आले. कुठे जायचेय, त्यांनी विचारले. परिस्थिती कळल्यावर ते ही तयार झाले. त्या दोघांनी आम्हाला बाईक वरुन व्यवस्थित मठा पर्यंत सोडले. तिथून पुढे जाऊन लगेच मठ आहे. हातपाय धुऊन मठात प्रवेश केला. हा मठ श्री. दरेकर यांनी बांधलेला आहे. "श्री स्वामी समर्थांनी २२ दिवस येथे वास्तव्य केले होते. तिथेच २२ दिवसात हा मठ बांधून पूर्ण केलाय."
मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवार डोळ्यांत भरते. समोरच स्टेजवर गणपतीची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे. गाभाऱ्यात उजव्या बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती असून डाव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे. आतमध्ये गाभाऱ्यात स्वामींचा फोटो, अन पायाशी स्वामींचा मुखवटा आहे.
मठाच्या खाली तळघर म्हणजे स्वामींचे 'ध्यान मंदिर' आहे. तेथे काळोख होता. मूर्तीच्या आजूबाजूला जेवढा दिव्याचा प्रकाश होता तेवढाच! त्या प्रकाशात स्वामींचे कारुण्याने भरलेले डोळे मात्र आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत असे भासते. ध्यानमंदिरातून वर आल्यावर पुन्हा डोळे भरून स्वामींचे दर्शन घेतले. नामस्मरण केले. आता परत घरी जाण्याचा मार्ग धरायचा होता. तिथल्या सेवकांनाच जाण्यासाठी काय सोय आहे, हे विचारल्यावर त्यांनी सांगितले चालत चालत १० मिनिटांवर हायवे लागेल. तिथून टमटम किंवा रिक्षा मिळेल कर्जतला जाण्यासाठी. दुपारचे १२ वाजत आले होते. काय करावे या विचारात असतानाच, एका भक्ताने कुठे जायचे विचारले. तेही स्वामी दर्शनाला सहकुटुंब लोणावळ्याहून आले होते. वयस्करच होती मंडळी. सोबत त्यांचा मुलगाही होता. लगेच म्हणाला, मी तुम्हाला हायवे पर्यंत सोडतो. गाडीत बसा. आणि काय आश्चर्य !! त्यांनी आम्हाला सरळ कर्जत पर्यंत सोडले. त्यांचे खूप खूप आभार मानले. स्टेशनला आल्यावर लगेच लोकल लागली!
खरोखरच, स्वामींनीच आमचा हा प्रवास अतिशय सुसह्य करून दिला होता. स्वामींची लिला अगाध आहे याची प्रचिती पुन्हा आली.
*"अशक्य ही शक्य करतील स्वामी !!"*
सौ. प्राची पालव.
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई.
पर्यटन म्हणजे प्रामुख्याने करमणूक आणि हेतूंसाठी प्रवास करणे आहे.पर्यटन हे अनेक प्रकारचे असू शकते. घरगुती पर्यटनामध्ये त्याच देशातील रहिवासी त्यांच्या स्वत: च्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात. जेव्हा दुसर्या देशातील रहिवासी आपल्या देशात येतात त्याला अंतर्देशीय किंवा इन बाउंड पर्यटन म्हटले जाते. परदेशी पर्यटन जेव्हा आपल्या देशातील रहिवासी दुसर्या देशात जातात तेव्हा.ते परदेशी पर्यटन किंवा आऊट बाउंड पर्यटन म्हटले जाते.
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई – महीला आघाडी आयोजित पाककला स्पर्धा उपक्रम खूप छान पार पडला. या स्पर्धेसाठी करण्यात आलेले नियोजन अतिशय उत्तम होते. मंडळाची प्रशस्त जागा त्यामुळे टेबलांची सुंदर मांडणी केली होती. सर्वांना व्यवस्थित व प्रशस्त टेबल मिळाला तसेच प्रत्येक टेबलावर प्लेट,चमचा व टिश्यू मांडलेले होते. हाॅलमधे आल्यावरच एकदम प्रसन्न वाटले.
आयोजन आणि नियोजन अर्थातच नेहमीप्रमाणे मंडळाच्या परंपरेनुसार अत्यंत रेखीव आणि अर्थातच शिस्तबध्द. सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा खूप छान एन्जॉय केली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आणि नंतर अर्थातच पदार्थ हौसेने चाखण्यासाठी आलेल्या खवय्या मैत्रिणींची उपस्थिती खऱ्या अर्थाने मनाला आनंद देणारी होती.
सौ.सोनालीचे सावंतचे सूत्रसंचालन, प्रमुख सौ.माधुरी तळेकर व मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे मनोगत,सौ. करुणा सावंत यांचे आभारप्रदर्शन उत्तम!
स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध शेफ श्री. पराग जोगळेकर यांचे उत्तम परीक्षण आणि मार्गदर्शन खूप भावले. प्रत्येक पदार्थ चाखून पाहणे. त्याची पौष्टिकता तपासणे,त्याबद्दल प्रश्न विचारणे,सजावट निरखणे इ.गोष्टींचे परीक्षण अत्यंत शांतपणे परंतु शिस्तबध्द पद्धतीने, ते आणि त्यांची कन्या हसतखेळत करत होते.
करुणा आणि सोनल यांनी घातलेली,कार्यक्रमाला साजेशी रांगोळी आणि श्री.हेमंतजी भोगले यांची रंगमंचावरील सजावट सर्वच खूप सुंदर!!
मा.अध्यक्ष श्री. शिर्के काका यांची अनुपस्थिती जाणवली. तरी त्यांचे डोक्यावर असलेले आशीर्वाद आणि सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ सहकारी आणि मंडळाच्या सल्लागार सौ.चित्रा धुरी, सौ.माधुरी तळेकर आणि सौ. रश्मी राणे या माझ्या दोन्ही प्रमुख व निमंत्रक सौ.मनीषा साळवी तसेच सर्व मैत्रिणी आणि हितचिंतक यांचे प्रोत्साहन सतत मिळत असते.
स्पर्धकांना सर्व सोयी मिळाल्या. महिला आघाडीच्या प्रमुख सौ.माधुरीताई तळेकर व त्यांच्या सहकारी टिमला खूप खूप धन्यवाद!! मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्याचे पण आभार.तसेच सर्व स्पर्धक मैत्रिणी व पाककला स्पर्धेला भेट देवून बनवलेल्या पदार्थांची चव चाखून दाद देणार्या सर्व खवय्यांचेही मनपूर्वक धन्यवाद!! आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
*मराठा मंडळ मुलुंड,मुंबई* *महिला आघाडी आयोजित* *पाककला स्पर्धा–२०२२*
निकाल खालीलप्रमाणे :
*परीक्षक–प्रसिद्ध शेफ श्री. पराग जोगळेकर*
*प्रथम पारितोषिक–सौ. नयनतारा भालेराव*
*पदार्थ–दुधी भोपळा व गाजराचा ढोकळा*
*द्वितीय पारितोषिक–अनुपमा देशपांडे*
*पदार्थ–झटपट पौष्टिक हांडवो*
*तृतीय पारितोषिक–रसिका मेगले*
*पदार्थ–गव्हाच्या सत्वापासून पौष्टिक पापडा*
*उत्तेजनार्थ पारितोषिक–सौ.सुरेखा मुळीक*
*पदार्थ–नाचणी शिरा*
*उत्तम सजावट–सौ.ऐश्वर्या ब्रीद*
*पदार्थ–फोडणीचे दही पोहे*
‘नृत्य’ ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन ह्या ललितकला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात.
सर्वच कला श्रेष्ठ आहेत आणि एकमेकांना पूरकही. पण आपण जेव्हा ‘नृत्य’ ह्या कलेच्या वेगळेपणाचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ‘नृत्य’ ही एकमेव कला आहे, ज्यामध्ये इतर सर्व ललितकलांचा अंतर्भाव होतो. शिल्प, चित्र, नाट्य, साहित्य आणि गायन ह्या कला वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी तत्त्वे घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नृत्यकलेतून प्रतिबिंबित होतात.
सर्व कलांच्या मुळाशी असणारी स्थल, काल आणि ऊर्जा ही तत्त्वे, तसंच निसर्गात आढळणाऱ्या ऋतुचक्र, दिवस-रात्र ह्यातून म्हणजे पुनरावृत्तीच्या संकल्पनेतून निर्माण होणारे ‘लयतत्त्व’ हे अन्य कलांच्या मानाने गायन, वादन आणि नर्तनात प्रामुख्याने दिसते.
नृत्यकलेमध्ये ‘गायन’कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायन आणि वादन हे नृत्यकलेचे अविभाज्य घटक आहेत.
शास्त्रीय नृत्य ह्या कलेचे नृत्त आणि नृत्य हे दोन भाग आहेत. त्यापैकी नृत्त म्हणजे शुद्ध नर्तन. गृहीत अशा स्थलावकाशात मानवी देहाचे शुद्ध नर्तनातून होणारे संचलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. ऊर्जा खेळविली जाते आणि त्याला जोड मिळते ती रेषासौंदर्याची आकार, पवित्रे आणि अमूर्त भावाची.
नृत्यात साहित्याचा नुसता आधार घेऊन, शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ पोहचविला जातो. आणि कधी कधी साधा आणि ठोस अर्थ वाटणाऱ्या साहित्याला नकळतपणे घनता प्राप्त होते. संगीताच्या बाबतीत ‘गायन’कलेतून प्रकट होणाऱ्या अमूर्त भावाला नृत्यकला मूर्त करते. आणि श्राव्य सुरांना दृश्यरूपात आकारून तयार होणारी मानवी देहाची शिल्पाकृती एक वेगळीच अनुभूती देते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नृत्यकलेत अन्य सर्व ललितकलांचा अंतर्भाव असूनही कुठलीही कला स्वतंत्रपणे डोकावत नाही, तर ह्या सर्व कला नृत्यकलेचंच एक अंग बनून जातात; सगळ्या कला सामावूनसुद्धा ‘स्वतंत्र अस्तित्व’ दाखविणारी अशी नृत्यकला म्हणूनच अतिशय संपन्न, समृद्ध आणि इतर कलांपेक्षा वेगळी ठरते. ‘शरीर’ हे साधन आणि ‘रेषा आणि आकार’ हे माध्यम असलेली नृत्यकला अन्य कलांच्या तुलनेत विविध मितींनी, विविध पैलूंनी सजली आहे ह्यात शंका नाही.
मराठा मंडळ सन्मानीय सभासद श्री. राजेश सावंत
या गोड गळ्याच्या गुणी गायकाच्या गाण्याचा आस्वाद घ्या.....!
सुर निरागस हो,,, संगीत गुनगूनू लागले तर
नवजात बालकाचा जेव्हा जन्म होता तेव्हा जन्मताच त्याच्या तोंडातुंन कुई कुई आवाज बाहेर पडतो तेव्हा त्या काळजाचा ठाव घेणारा आवाज देखील एक सुखद आणि आनंदाचा ध्वनि निर्माण करतो म्हणजेच जन्मजात सुर आपल्या साथिला असतात. ते संगीत आपल्यासोबतच जन्म घेतं. संगीताविना एखादी व्यक्ति जगु शकन अशक्यच आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला खुप मोठी प्राचीन परंपरा आहे. संगीत ही अतिप्राचीन कला आहे. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांना मिळून संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे. कारण संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते.
संगीत म्हणजे काय?
संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. ‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. यामध्ये विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ सुगम संगीत, नाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते ,शास्त्रीय संगीत, संगीतातील राग, संगीतविषयक ग्रंथ इत्यादी…
चला तर मग जाणून घेऊयात संगीतातील महत्वाच्या संकल्पना……
आशय, माध्यम आणि अभिव्यक्तिप्रकार यांनुसार चित्रांचे अनेक प्रकार मानले जातात. तैलचित्र, जलरंगचित्र, मेणरंगचित्र, रंगशलाकाचित्र, चिक्कणितचित्र असे माध्यमांनुसार प्रकार होतात. तंत्ररीती आणि व्यावहारिक उपयोजन यांनुसार भित्तिचित्र, लघुचित्र, अलंकृतपट्ट असे प्रकार होतात.
चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले.
हॅशटॅग Momos आणि Li's Wok
मुलुंड पश्चिम येथे मोमोमिया फ्रँचायझी त्यांच्याकडे तिबेटी, जपानी, चायनीज, भुतानी आणि कोरियन खास पदार्थ आहेत. अद्वितीय आणि चवीने परिपूर्ण!
मुलुंड पश्चिमेतील हे एक छोटेसे जेवणाचे ठिकाण असले तरी, लहान मुले किंवा पालकही आरामात बसू शकतात आणि त्यांच्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात.
विविध प्रकारचे मोमोज, थुपका (तिबेटी नूडल सूप), रामेन - जपानी नूडल डिश ( भरपूर भाज्या, चिकन आणि नूडल्सने भरलेले), दातशी (भुतानीज डिश), सूप, भात, नूडल्स यासारखे उत्कृष्ट पदार्थ. स्वादिष्ट भोजन, सेवा, अतिशय लक्षपूर्वक, छान वातावरण. शिवाय हे सर्व किमतीत आहे.
सर्वांना नक्कीच आवडेल
छंद म्हणजे स्वत:ची लय. छंद म्हणजे स्वत:चा शोध. छंद म्हणजे स्वत:चा आणि इतरांचाही आनंद. खरंच,आपल्या आवडीनिवडींना,आंतरिक ऊर्मीना आयुष्यात जागा द्यायलाच हवी. या तरुण वयात एक तरी छंद जोपासावा, कारण तीच आपली खरी ओळख असते. त्यातूनच आपल्याला खरंखुरं समाधान मिळत असतं.
आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात छंद आपल्याला आनंद मिळवून देतात. छंद असणं हे वेगळंच रसायन असतं. काहींना वेगवेगळे छंद असतात. एकच छंद जोपासणे ही एका अर्थाने अवघड कला असते. छंद म्हणजे काय, असं विचारलं तर लोक म्हणतात की ही फावल्या वेळी करायची गोष्ट, रिकाम्या वेळेचा विरंगुळा. मला मात्र हे पटत नाही. मला वाटतं, छंद हीच तर आयुष्यात करायची मुख्य गोष्ट आहे. पुढे मग पोट भरण्यासाठी नोकरी, शिक्षण वगरे वगरे करावं लागतंच. पण आपल्याला खरी ओळख मिळते, जगण्याचा अर्थ मिळतो आणि समाधानही मिळतं ते अशा छंदांमधून.
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! कोणी टपाल तिकिटं जमवतं, कोणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतं, कोणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो तर एखादा शक्य तितके गड-किल्ले सर करतो. एकसमान छंद जोपासणारे अनेक जण एकत्र येऊन एखादा समूह स्थापन करतात आणि असे कित्येक गट मिळून आपला छंद जोपासताना दिसत आहेत.
रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालविण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो, ते सर्व छंदात मोडते. छंदांनी व्यक्तिमत्त्वाला नवनवीन पैलू व परिमाणे प्राप्त होतात. छंद माणसाला दु:ख विसरायला लावतातच; पण छंदामुळे स्वत:मधली क्रिएटिव्हिटीही वाढते, म्हणून देखील छंद जोपासण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढलाय. छंद अनेक प्रकारचे असले तरी त्या प्रत्येकातून आनंद मात्र हमखास मिळतो.
अनेक विद्यार्थ्यांना छंद म्हणजे काय हे देखील कळत नाही. नवीन माहिती मिळवणे, धिंगाणा करणे, ओळखी करणे, हसवणे, सकाळी फिरायला जाणे असे छंद असल्याचे काही जण सांगतात. काही व्यक्ती कुठला छंद जोपासतात हे पाहणंही नवलाईचं आहे. नाणी जमवणे, पोस्टाची तिकिटे किंवा विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचे हस्ताक्षर जमवण्याचा छंद.
त्याच त्याच क्षेत्रातल्या त्याच त्याच कामातला तोचतोचपणा आणि धावपळीच्या दिनचय्रेमुळे मनाला मळभ येतं. हे मळभ दूर करण्यासाठीच एक विरंगुळा म्हणून काहीसे छंद जोपासणं महत्त्वाचं आहे. ड्रॉईंग, ट्रेकिंग, पॅरासेलिंग, वॉटर राफ्टिंग, भटकंती, गायन आणि वाचन हे छंद जोपासण्यासाठी गांभीर्यानं लक्ष द्यावे लागते. हे छंद एक प्रकारचे पॅशन असते. विरंगुळ्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेच धावपळीच्या करिअरचा ताण भासत नाही.
रोजची धावपळ, कामाचा ताण, तिथली टेन्शन्स, जगण्यातले वादविवाद.. घडयाळाच्या काटयावर क्षण न् क्षण अवलंबून असणा-या आयुष्यात जोपासलेला छंद
औषधासारखं काम करतो. छंद जोपासणे हा मानवी गुण आहे. मात्र काही आगळावेगळा छंद जोपासल्यास जीवनात आनंद मिळू शकतो. जसा साप पकडणे हा सर्पमित्रांचा पिढीजात छंद आहे. छंद हे मानवी जीवनाचे अभिनव अंग आहे. प्रत्येकास काहीना काही आवड असते व त्याचे छंदात रूपांतर होते. छंदामुळे तुमच्या वेळेचा उत्तम वापर होतो.
छंदांनी माणसाला ओळख मिळते. माणसालाच छंद असतात. छंद माणूसपण टिकवतात. माणूसपण वाढवतात. माणसाला स्वत:ला शोधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देतात. जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. मन रमवतात.
जीवनाचा, निर्सगाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवतात. स्वत:चे छंद, समाजोपयोगी काम करणं यातून स्वत:ची ओळखही गवसते आणि जगण्याची नवी दृष्टीही लाभते. जीवनात स्वत:लाच आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एकतरी छंद
जोपासलाच पाहिजे. तुम्हाला कोणत्याही कलेची खरी आवड असेल तर त्यासाठी वेळ आपोआप निघतो आणि नवनिर्मितीतून मिळणारा आनंदच तुमच्या छंदाला जागृत ठेवू शकतो. तेव्हा आपले जे काही छंद असतील त्यांना न्याय द्यायला आत्ताच सुरुवात करा. तहान-भूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जिवाला पिसे लावून जाते हे कळत नाही.
मराठा समाजाला संघटित करून उद्योगप्रवण करणे या उद्देशाने मराठा बिझनेस फोरम सुरू करण्यात आला असून, या फोरमचे उद्घाटन नुकतेच परळ येथील ऍडव्होकेट श्री शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजात उद्योगशीलतेची वृत्ती रुजविल्यास एक दिवस देशातील सर्वोच्च उद्योगपती म्हणून मराठा उद्योजक नाव कमावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, कारवार, इंदूर इत्यादी ठिकाणी वसलेले मराठा समाजातील उद्योजक यावेळी उपस्थित होते. हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे, निर्माण ग्रुपचे राजेंद्र सावंत, काटाळे शिपयार्डचे दिलिप बाईंग आदी मोठ्या उद्योजकांनीही यावेळी हजेरी लावली आणि फोरमला शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात हावरे यांनी नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मराठा उद्योजक एकत्र येऊन काम करू इच्छितात ही मोलाची गोष्ट असल्याचे अॅड. पवार यांनी यावेळी म्हटले. फोरमची पहिली कार्यकारणी यावेळी नेमण्यात आली असून, त्यात अॅड. शशिकांत पवार अध्यक्ष, दिलिप बाईंग आणि राजेंद्र सावंत उपाध्यक्ष, पंकज घाग सरचिटणीस, राजेंद्र घाग संयुक्त सरचिटणीस, अजय सावंत खजिनदार आदी अनेकांचा यात समावेश आहे. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि www.mbf.org.in या वेबसाइटचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे उद्योजकांना कुठेही आणि केव्हाही या वेबसाइटवरील अद्ययावत माहिती घेता येणार आहे. फोरमविषयीच्या अधिक माहितीसाठी संपर्कः ९८२०४६९१२२.
१. रोकड सुलभता/ तरलता – एखादी गुंतवणूक विकायला किती सहज आहे याचा मापदंड म्हणजे रोकड सुलभता अथवा तरलता होय.
२. जोखीम – गुंतवणुकीतून परतावे आणि मुद्दल दोघांची खात्री म्हणजे सुरक्षितता. यातील कोणतीही गोष्ट जर नक्की नाही तर तिथे जोखीम लक्षात येते. साधारण गुंतवणूकदार फक्त मागील परतावे बघून जोखमीचा अंदाज बांधतो. परंतु महागाई, बदलणारे व्याजदर, बदलणारं हवामान, राजनैतिक घटना – अशा प्रकारची जोखीम लक्षात येत नाही.
३. परतावे – प्रत्येक गुंतवणुकीची परतावे देण्याची एक क्षमता असते. एकाच प्रकारचे गुंतवणूक पर्याय हे थोड्याफार फरकाने जवळपास सारखेच परतावे देतात. परंतु एखादा गुंतवणूक पर्याय त्याच्या श्रेणीतील इतरांपेक्षा जर वेगळेच परतावे देतोय तर तिथे जरा नीट लक्ष देणं हे आलंच. यासाठी मुळात गुंतवणूक पर्यायांचं वर्गीकरण आणि त्यांच्याकडून मिळणारे सरासरी परतावे हे सर्वात आधी बघावं. याचं सर्वात सोप्पं उदाहरण म्हणजे – बँकेतील ठेवी. सरकारी बँकेतील ठेवींवर मिळणारं व्याज हे खासगी क्षेत्रातील आणि सहकारी बँकेतील ठेवींपेक्षा कमी असतं. परंतु त्याची तुलना ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्सबरोबर करून चालणार नाही.
४. कर कार्यक्षमता – निरनिराळ्या गुंतवणूक पर्यायांचं कर आकलनासाठी वेगळं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. शिवाय प्रत्येक करदाता वेगवेळ्या ‘टॅक्स ब्रॅकेट’मध्ये बसतो. अजून पुढे बघितलं तर एकाच गुंतवणूकदाराचं प्रत्येक वर्षी ‘टॅक्स ब्रॅकेट’ / कराधीनता बदलते. नवीन कर प्रणाली व जुनी कर प्रणाली या बाबतीतसुद्धा नीट विचार करून निर्णय घ्यावा लागतो. उदाहरण घ्यायचं तर बँकेतील मुदत ठेव ही त्याच गुंतवणूकदारांसाठी कर कार्यक्षम आहे जो खूप कमी कर भरतो किंवा अजिबात भरत नाही. त्यांच्यासाठी संपूर्ण व्याज हाच परतावा. परंतु ३० टक्के दराने कर भरणाऱ्या व्यक्तीला ६ टक्के व्याज उत्पन्नातून १.८ टक्के कर भरल्यानंतर हातात ४.८ टक्के इतकाच परतावा मिळतो. शिवाय प्रत्येक वर्षी टीडीएस कापला जातो, भले कर भरायची गरज असेल किंवा नसेल. या उलट डेट फंडातील गुंतणुकीतून परतावे निश्चित नाहीत, परंतु जेव्हा गुंतवणूक विकणार त्या वर्षीच त्यावर कर भरावा लागतो.
कोष्टकातून वाचकांना वरील सर्व मापदंड सोप्या पद्धतीने कळतील:
वरील कोष्टकामध्ये अतिशय ढोबळपणे माहिती दिली गेलेली आहे. प्रत्येक गुंतवणूक पर्याय निवडताना जर या गोष्टींचा पुरेपूर विचार केला तर चुकीची निवड नक्कीच टाळता येईल.
सर्वसाधारणपणे आपण आपल्या पोर्टफोलिओचे ४-५ भाग करतो – नियमित खर्चांची तरतूद, आपत्कालीन निधी, नजीकच्या मोठ्या खर्चाची तरतूद, निवृत्ती निधी आणि इतर मोठी आर्थिक ध्येय. आपले पर्याय निवडताना आपण खालीलप्रमाणे पोर्टफोलिओ तयार करू शकतो:
१. नियमित खर्चांसाठी – बँकेतील, पोस्टातील मुदत ठेव, चांगल्या रेटिंगचे डिबेंचर/बॉण्ड्स, घर किंवा दुकानातून मिळणारे भाडे, म्युच्युअल फंडातील एसडब्ल्यूपी (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन.)
२. आपत्कालीन निधी – बँकेतील बचत खाते व मुदत ठेव, ओव्हरनाइट, लिक्विड आणि लो ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड.
३. नजीकच्या गरजेसाठी – बँकेतील मुदत ठेव, इक्विटी आर्बिट्राज फंड, लो ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड.
४. निवृत्ती निधी – इक्विटी म्युच्युअल फंड, शेअर्स, स्थावर मालमत्ता, सोने व चांदीतील गुंतवणूक, पीएमएस, एआयएफ, अनलिस्टेड बॉण्ड्स/शेअर्स.
५. इतर मोठी ध्येये – ध्येय पाच वर्षांच्या पलीकडे असल्यास निवृत्ती निधीसाठी वापरलेले सगळे पर्याय योग्य आहेत. परंतु ध्येय तीन वर्षांच्या आतल्या टप्प्यात आल्यावर त्यातील जोखीम कमी करून सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे तोवर जमा पैसा वळविणे योग्य राहील.
तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार/trupti_vrane@yahoo.com
*ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात तिखट रस बळावतो*
(संदर्भ - अष्टाङ्गसंग्रह १.४.६)
शरीराचे पोषण होते आहाराने आणि आहार तयार झालेला आहे सहा रसांपासुन.औषधे सुद्धा ज्या विविध नैसर्गिक पदार्थांपासुन तयार होतात,त्यांना सुद्धा स्वतःचा असा रस असतो. गोड,आंबट,खारट,तिखट, कडू व तुरट हे ते सहा रस ,ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये ‘चव’ म्हणतो.
आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे,जे प्रत्येक ऋतुमध्ये निसर्गामध्ये आणि साहजिकच यच्चयावत सजीव पदार्थांमध्ये कोणत्या रसाचा (चवीचा) प्रभाव असतो व त्याचा शरीरावर-आरोग्यावर काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो याचा अभ्यास करते. इतकंच नाही तर त्या-त्या रसाचा शरीरावर संभवणारा विपरीत परिणाम कमीतकमी व्हावा,यासाठी त्याच्या विरोधात त्या-त्या विशिष्ट ऋतुमध्ये कोणत्या रसाचे सेवन आधिक्याने करावे, याचेही मार्गदर्शन करते. जसे की शरद ऋतुमध्ये (ऑक्टोबर हीट च्या दिवसांमध्ये) खारट रसाचा प्रभाव वाढतो,म्हणून त्याच्या विरोधात गोड रसाचे सेवन करण्याचा सल्ला, अर्थात यामध्ये तारतम्य महत्त्वाचे.
ग्रीष्म ऋतुमध्ये (एप्रिल-मध्य ते जून-मध्य या कालावधीतल्या उन्हाळ्यात) निसर्गतः तिखट रस बळावतो.हे घडते नैऋत्येकडून वाहून येणार्या तिखट चवीच्या वार्यांमुळे (वारे कोणत्या चवीचे असतात,हे आपल्या पूर्वजांना कसं समजत होतं किंवा आजही आपण ते कसं ओळखू शकतो हा मोठा प्रश्नच आहे)
ग्रीष्मऋतु मधील हे वारे पाण्यावरुन वाहून येताना पाण्यामध्ये तिखट चवीचा प्रभाव वाढवतात.ते तिखट चवीचे पाणी वनस्पतींच्या मुळांकडून शोषले जाते,त्यामुळे वनस्पतीमध्ये सुद्धा तिखटपणा वाढतो.त्या वनस्पतींचे सेवन करणार्या प्राणिपक्ष्यांमध्ये सुद्धा तिखट रसाचा प्रभाव वाढतो आणि अंतिमतः त्या तिखट पाण्याचे प्राशन करणार्या व तिखट रसावर पोसलेल्या वनस्पती व प्राणीपक्ष्यांचे सेवन करणार्या मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा तिखट रस प्रबळ होतो.
ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात मानवी शरीरामध्ये होणार्या विविध बदलांमागे अनेक कारण असली तरी निसर्गात आणि पर्यायाने शरीरामध्ये वाढणार्या तिखट रसाचा प्रभाव हे सुद्धा त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे हा आयुर्वेदाचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यासला गेला पाहिजे.
ग्रीष्मातल्या या उन्हाळ्यात निसर्गतःच जर शरीरात तिखट रसाचा प्रभाव वाढत असेल तर त्यात पुन्हा तिखट खाल्ल्याने शरीरावर काय विपरीत परिणाम होतील याचा अंदाज तुम्हीं सूज्ञ वाचक करु शकता आणि "या कडक उन्हाळयात तिखट टाळा किंवा तारतम्याने खा" हा सल्ला आयुर्वेदाने का दिला हे सुद्धा समजू शकता.
( *ऋतुचर्या* या आयुर्वेद शास्त्राने मानवजातीला केलेल्या महत्त्वाच्या विषयाचे सर्वांगीण मार्गदर्शन करणाऱ्या वैद्य अश्विन सावंत लिखित *ऋतुसंहिता* या आगामी पुस्तकामधून)
*उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम होते का आणि ते का?*
तुमच्या घरात किंवा कार्यालयात सोबतच्या स्त्रिया "किती उकडतंय, किती गरम होतंय, पंख्याचा वारा लागतच नाही, एसी लावा, एसी चे तापमान कमी करा..." वगैरे तक्रारी करत असतील तर त्यांमागे तथ्य आहे, स्त्रिया उगाच तसं बोलत नसतात.
सभोवतालच्या उष्ण तापमानाचा आरोग्यावर होणारा बरा- वाईट परिणाम अभ्यासताना असे दिसून येते की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री-शरीरावर उष्ण तापमान अधिक विपरित परिणाम करते.स्त्रियांवर उच्च तापमानाचा अधिक वाईट परिणाम का होतो,त्याचे स्पष्टीकरण देताना जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो असा.
पुरुष आणि स्त्रियांच्या पेहरावामध्ये-कपड्यामध्ये असणारा फ़रक हे स्त्रियांच्या शरीरावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातही भारतासारख्या ज्या देशांमध्ये स्त्री-शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे घालण्याचा रिवाज आहे, तिथल्या स्त्रियांनी एकावर एक घातलेले अंगावरचे कपडे,(त्यात पुन्हा आधुनिक काळात हवेचे अजिबात आवान गमन (व्हेंटीलेशन) होऊ न देणारी जीन्स) आणि त्याखालील अन्तर्वस्त्रे यांमुळे शरीरा ला वारा लागत नाही आणि आतली उष्णता आतल्या आतच वाढत जाते.संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यांमुळे बाह्य त्वचेला घाम निर्माण करून शरीराला थंड करण्याचा उपाय सुद्धा करता येत नाही (जिन्स मुळे तर अधिकच) त्यात पुन्हा स्वयंपाकघरात उष्णतेजवळ सरासरी दोन ते चार तास काम केल्यामुळे वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्त्रियांचे शरीर अधिकच उष्ण होत जाते, जे विविध उष्णता जन्य विकारांना बळी पडू शकते.
उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते, यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे.शास्त्रीय कारणाचा विचार करता स्त्रियांच्या शरीरामध्ये त्वचेखाली असणारी अधिकची चरबी त्याला जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्वचेखाली अधिक मात्रेमध्ये असणार्या चरबीमुळे स्त्री-शरीराला सौष्ठव व सौंदर्य प्राप्त होते.हीच चरबी स्त्रियांच्या शरीराला अधिक ऊब देते. ऊब देण्याचा चरबीचा हा गुण हिवाळ्यात उपकारक सिद्ध होत असला तरी उन्हाळ्यात मात्र शरीराला सहजी थंड होऊ देत नाही व स्त्री-शरीर उन्हाळ्यामध्ये तुलनेने अधिक गरम राहते.
एकंदरच उन्हाळ्याचा आणि उष्ण तापमानाचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम होत असेल, याची पुरुषांना कल्पना सुद्धा करता येणार नाही.मात्र त्याची कल्पना करुन, त्यामागील कारणे ओळखून त्यामध्ये बदल व्हायला हवा.
संस्कृतीला धक्का न लावता स्त्रियांना हवेशीर कपडे कसे मिळतील याची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातली उष्णता कशी वाहून जाईल व स्वयंपाकघर कसे हवेशीर होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे.महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी घरातल्या प्रत्येक सदस्याने उचलायला हवी.घरातल्या सर्वांच्या उदरभरणासाठी अन्न तयार करणे, ही काही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही.
स्त्रियांनी सुद्धा पाणी व अन्य द्रवपदार्थ (चहा, कॉफी, मद्य वगळून) पित राहावं. केवळ दहा बारा ग्लास पाणी पिऊन चालत नाही, शरीरातून घटलेले क्षार व उर्जा मिळायला हवी. दिवसातून निदान एक शहाळ्याचे पाणी प्यावे. पाणी व थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करावे, जसे केळं, कलिंगड, काकडी, टरबूज, द्राक्ष,पेरू, वगैरे. दिवसातून एक तरी फळांचा रस प्यावा.
वैद्य अश्विन सावंत
Shashwat Ayurvedic Clinic
Mulund.
*‘ काठपदर ‘ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.* *मळलेली वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण केलेले सुप्रसिद्ध अनुभवी नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांनी फ्रेंच लेखक जॅा झने यांच्या ‘द मेड’ या नाटकाचे केलेले मराठी भाषांतर म्हणजे ‘काठपदर‘ हे नाटक.शेक्सपियरसह अनेक युरोपियन नाटककारांच्या नाट्यकृतींचे भाषांतर करून प्रा. श्री दिलीप जगताप यांनी मराठी रंगसाहित्यामधे अर्थवाही भर घातली आहे. नाट्यजाणीवांची समृध्दी, सामजीक विसंगतीचे आकलन व ते मांडण्याचे समाजभान. पिडीतांच्या वेदनेने ठसठसणारी लेखनी व प्रगल्भ शब्दसंभाराने लगडलेले बुध्दीवैभव. हि जगताप यांची गुणवैशिष्टे त्यांची नाटके वाचताना, बघताना सहजच नजरेस येतात.*
*काठपदर बघताना यांसह सामजीक पाय-यांमधील वर्गभेदावर बोट ठेवलेले दिसते. शोषक आणि शोषित, भोगणारेच, पण एक दु:ख व दुसरा सुख भोगणारा.या दर्शनी संघर्षाबरोबरच बबी आणि छबी यांच्यात असलेली आपसातील असुया, आत ऐक व बाहेर ऐक.सार्वत्रिक स्वार्थी वृत्ती. मत्सर-जिवलगत्व जेंव्हा मला हवे ते घेते तेंव्हा मत्सर निर्माण होतो. अशा तिहेरी पदरांसह मानवी स्वभावांचे विविध रंग असलेल्या या दोधी लेखकाच्या रचनेचा परमोच्च बिंदु आहेत. सत्यात नाही तर कल्पनेच्याखेळात सर्व काही मिळवायचे. त्यातच जगायचे आणि…. मरायचे. स्वतःला हरवून टाकायचे. असा मानविय अंत:संघर्ष संपुर्ण नाटकभर धगधगत राहतो. यातून एक गडद हिंसक नाट्य लेखकाने अंत: प्रवाहीत केले आहे. जे दिग्दर्शकाने व कलाकारांनी बरोबर पकडून ताकदीने ऊभे केले आहे जे अंगावर येते.त्याच बरोबर शक्यतांचे, आशयाचे शेकडो माग लेखकाने नाटकात सोडले आहेत जे श्री. जगताप यांच्या इतर नाटकांतही दिसतात.*
*श्री.राजीव वेंगुर्लेकर यांनी आशयाच्या नव्या परिघांना स्पर्श करु पहाणारा हा प्रयोग दिग्दर्शीत केला आहे.लेखनातील घनगर्द अनंतार्थांच्या पारंब्या वेंगुर्लेकरांनी घट्ट पकडून त्यावर आपल्या सर्व कलाकार तंत्रज्ञांना हवे तसे वर-वर चढवत यशोवृक्षाचे शिखर गाठले आहे. त्यांनी वापरलेली चित्रभाषा, चित्रचौकटी मनमोहक व नाट्य पुरक होत्या. रंगावकाशाच भान आणि वस्तुपयोगीत्व विचार ऊल्लेखनीयच. श्री.दिलीप जगताप यांच्या लेखनातील अवघड वळण वाटांचा हा प्रवास वेंगुर्लेकर स्वत: ड्रायव्हिंग सिटवर बसून प्रेक्षकांसाठी आनंददायी करतात. *असे नाटक दिग्दर्शकासाठी प्रचंड आव्हान असते. पकडलेले बोट हातातून सुटून अर्थविहीन अंधारात भरकटण्याचा धोका असतो. मात्र वेंगुर्लेकर या घोड्यावर ठाम मांड ठोकून बसले व आपल्याला हव्या असलेल्या इप्सीत स्थळी प्रेक्षकांना घेऊन गेले.एक अतुलनीय नाट्यानुभुती देते झाले. **
*तीनही कलावतींच्या उत्कृष्ट अभिनयाने नाटकाला उंचीवर नेले.बबी आणि छबी झालेल्या दर्शना रसाळ व सोनाली मगर या दोघींनी तर आपल्या बोलक्या चेह-याने, डोळ्यांनी , शारीरभाषा व मुद्राभिनयाने दोन तास गारूड केले होते. या दोघींच्याही अभिनयाचा पोत वेगळा आहे. वाचीक अभिनयात वैविध्य आहे.एकच पात्र दोघी वेगवेगळ्या वेळी जगतात मात्र पोहचवणं ऐकीपेक्षा दुसरीचे भिन्न होते. एकीची सावली दुसरी-बहीण/वैरी.मात्र तरीही भिन्न कि अभिन्न .हि स्वतंत्र अस्तित्व रेषा व एकमेकींत विरघळणे या दोन अभिनेत्रींनी आपल्या अभिनय सामर्थ्याने स्पष्टपणे दाखवले आहे. त्यांच्यात तुलना करणे दोघींवरही अन्याय करणे होईल.या दोघींनी आपल्या रसपरिपोषक अष्टावधानी अभिनय गुणांनी नाटकाचे काठपदरच नव्हे तर संपुर्ण महावस्त्रच स्वर्णीम केलेय. बाईसाहेब झालेली मानसी तावडे-सावंत कमी कालावधीत आपले असणे नाटकभर पेरते.बबी आणि छबीच्या ठसठशीत व्यक्तीरेखाटनासमोर व जुगलबंदी समोर ठाम अस्तित्व दाखवते आणि हा सामुहीक अभिनयोत्सव पुर्ण होतो. दिग्दर्शकाने हाती दिलेल्या पारंब्यांवर कलाकार मन:पुत सुर-पारंब्या खेळलेत. विशेषत: बबी आणि छबीचे प्रेक्षकांना आपल्या सोबत या खेळात सातत्याने खालीवर- वरखाली घेऊन जाणे-येणे,परत आनणे. नंतर प्रेक्षकच त्यांची अंगुली धरून घेतात शेवट पर्यंत सोडत नाहीत. रौप्य पदक यापेक्षा छोटेच असावे.*
*नाटक हा सामुहीक अविष्कार आहे. बबीचे बसल्या बसल्या मरणे,ऋदय बंद पडणे हि कल्पना व पार्श्वसंगिताचे थांबणे कल्पक होते. प्रकाश योजना प्रसंगी स्वत:च बोलत होती. यात सारे आले. काठपदरचे वेगळी वाट चोखाळणारे ध्वनीसंकेत- प्रकाश- नेपथ्य- रंगभुषा- वेषभुषा या सर्वांगाने रंगलेला अभिनय संपंन्न प्रयोग काल बघायला मिळाला. सर्व संघाचे मन:पुर्वक अभिनंदन ! हे नाटक कथावस्तु शोधण्याचे नाटक नाही.निबीडातुन वेगळया पायवाटा शोधणारे नव्या युगाचे सांगाती असलेले हे नाटक आहे. हे अनुभवण्याचे नाटक आहे. ‘काठपदर’च्या या नाट्य प्रयोगाने हि सायंकाळ रंगप्रवासातील एक आनंददायी सायंकाळ म्हणून स्मृतीत मोहरबंद केली आहे.*
✍️ *राजेश टाकेकर*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*शेवटपर्यंत गुढतेचा अनुभव देणारे शब्दबंबाळ नाटक - काठपदर*
राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात गौरवले गेलेले, उत्कृष्ट प्रकाश योजनेचे पारितोषिक पटकावलेले *काठपदर* हे प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करणारे विलक्षण असे दोन अंकी नाटक आज मराठा मंडळाच्या रंगमंचावर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. पहिला अंक अक्षरशः डोक्यावरून गेला.परंतु दुसऱ्या अंकात पहिल्या अंकात पडलेल्या प्रश्नांची उकल होत गेली. छबी आणि बबी यांचा अंगावर येणारा अभिनय थक्क करणारा होता. तिन्ही स्त्री कलाकारांनी आपापल्या भुमिका ताकदीने निभावल्या. दोन वेळा लाईट गेल्यामुळे अडथळा निर्माण झाला तरी या कलाकारांनी आपले बेअरिंग अजिबात सोडले नाही. तिघींच्याही भूमिका कसदार होत्या.त्यांचा संपूर्ण रंगमंचावरचा वावर कधी गूढ,कधी भय,कधी विनोद, मत्सर, प्रेम, वैर,कधी हिंसक, अवघड संवाद...सर्व सर्व भन्नाट. विशेष भावली ती छबी....बहिणीचे केस सोडवून अंबाडे घालताना, लिपस्टिक,गजरे आवरताना, साडीची घडी घालताना, नेसवताना..... हाताने कृती करताना सराईतपणे अवघड संवादफेक कौतुकास्पद????
वेगळी वाट शोधायला भाग पाडणारी प्रा .दिलीप जगताप यांची विलक्षण कथा, दिग्दर्शक राजीव वेंगुर्लेकर यांचे अवघड कथा स्वतः समजून घेऊन आपल्या कलाकारांकडून जातीचा अभिनय करवून घेणारे नेटके दिग्दर्शन, सर्व कलाकारांचे भन्नाट अभिनय,अनोखे असे शिर्षकाला साजेसे... काठपदरी साड्यांचे आगळे वेगळे नेपथ्य, काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा समय,गोठविणारी थंडी दाखवताना केलेला धुराचा वापर, गूढता निर्माण करणारे पार्श्वसंगीत आणि संपूर्ण प्रयोगाला अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवणारी, मोलाचा वाटा असणारी प्रकाशयोजना यामुळे अत्यंत परिणामकारक असा वेगळी वाट चोखाळणारा दर्जेदार नाट्याविष्कार सादर झाला!
सौ. ऐश्वर्या ब्रीद
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी मराठा मंडळ मुलुंड, मुंबई येथे " लक्ष्मण झुला " थिएटर्स निर्मित * काठ पदर* या प़ा. दिलीप जगताप लिखित व श्री. राजीव वेंगुर्लेकर दिग्दर्शित नाटकाचा अत्यंत देखणा प़योग पाहण्याचा योग आला. राज्य नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावणारा हा नाटय प़योग पहाताना मुलुंडकर नाट्य रसिक खरोखरच मंत्रमुग्ध झाले होते. या प़योगाला नाट्य रसिकांची प़चंड उपस्थिती लाभली होती. प़ामुख्याने या नाटकातील तीनही महिला कलाकारांच्या भूमिका अत्यंत लाजवाब होत्या. या नाटकातील छबी, बबी,आणि बाईसाहेब या तीनही कलाकारांच्या भूमिका अप्रतिम!! व्यावसायिक कलाकारांपेक्षाही काकणभर सरस अभिनय, पाठांतर, मुद्राभिनय, अचूक टायमिंग या सर्वच बाबतीत हे तीन महिला कलाकार उत्तमच!! नाट्य दिग्दर्शक श्री. राजीव वेंगुर्लेकर यांचे सुरेख, सर्वोत्तम दिग्दर्शन ही या प़योगाची जमेची बाजू होती. शाम चव्हाण यांची प़काशयोजना म्हणजे जणू चौथा कलाकारच असल्याचे जाणवले. संगीतही तितकेच प़भावी व श्रवणीय होते. नेपथ्य सुद्धां फारच प़संगोचित व छानच होते.
मराठा मंडळाच्या रंगमंचावर एक आगळा - वेगळा परंतु देखणा नाट्य प़योग सादर केल्याबद्दल लक्ष्मण झुला थिएटर्स आणि श्री. राजीव वेंगुर्लेकर यांना मराठा मंडळाच्या विद्यमाने मन:पूर्वक धन्यवाद! प़योगाच्या शेवटी रसिकांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी निर्मात्यांनी उपलब्ध करून दिली होती. श्री. सुनील नाईक यांनी या प़योगासाठी सहकार्य करणारे मराठा मंडळ मुलुंड, मुंबई, श्री. अरविंद राणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुलुंड शाखा, श्री. कुमार सोहनी इ. चे आभार व्यक्त केले.
मराठा मंडळ मुलुंड मुंबई अध्यक्ष आदरणीय श्री. रमेशजी शिर्के
नृत्य, नाट्य, चित्रपट यांसारख्या प्रयोगीय कलांमध्ये नटाने आशयप्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय.
भरताने अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत : आहार्य, आंगिक, वाचिक, व सात्त्विक. या चार प्रकारांच्या विश्लेषणाने अभिनयकलेची अंगे स्पष्ट होतात : आहार्य अभिनयात नटाची कृती नसते. भूमिकेची ओळख पटण्यासाठी केलेली रंगभूषा, वेशभूषा व अलंकरण म्हणजेच आहार्य अभिनय होय. वस्तुतः ती नटाच्या भूमिकेच्या बाह्यांगाची सजावट होय. श्रीगणेश, दशानन यांसारख्या पात्रांसाठी मुखवट्यांचा उपयोग करीत. आंगिक अभिनय हाच भूमिकाप्रकटनाचा खराखुरा पाया आहे. हालचाली, अंगविक्षेप, हावभाव आणि चेहऱ्यावरील विकारदर्शन हे आंगिक अभिनयाचे मुख्य प्रकार. त्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी कित्येक वेळा त्यांस उपकरणाची जोड देणे आवश्यक असते. आंगिक अभिनयातील लय आणि ताल यांची स्वाभाविक परिणामकारकता प्रतीत करून देण्याऱ्यासाठी नर्तिकेने पायात बांधलेले घुंगरू अथवा घेतलेली ओढणी यांसारख्या उपकरणांचाही आंगिक अभिनयातच अंतर्भाव करावा लागेल. भूमिकेच्या अभिव्यक्तीसाठी आंगिक अभिनयाला शब्दांची जोड देणे क्रमप्राप्त असते.
नटाने उच्चारलेला सार्थ किंवा ध्वनित शब्द म्हणजे वाचिक अभिनय. रंगाविष्कारकलेला काव्याची जोड मिळाल्यानंतर वाचिक अभिनयास अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूमिकचे प्रकटन करण्यासाठी नट कोणत्यातरी आदर्शाची नक्कल करीत असला, तरी ती नक्कल मूळ आदर्शाचे केवळ बाह्यदर्शन घडवावे या हेतून केलेली नसते. त्या आदर्शाचे सत्त्व व वैशिष्ट्य यांचे नटाला जे दर्शन घडले असेल, त्याचा प्रत्यय प्रेक्षकाला देऊन आपली अनुभूती परिपूर्ण करावी आणि प्रेक्षकाला आपल्या अनुभूतीत सहभागी करावे, असे सर्जनशील प्रयोजन त्याला अभिनयाद्वारे साध्य करावयाचे असते. यामुळे त्याला झालेले मूळ आदर्शाचे सम्यक ज्ञान हेच त्याच्या निर्मितीचे खरेखुरे स्वारस्य असते. अशा प्रकारच्या स्वारस्यमूलक भूमिकानिर्मितीच्या प्रयत्नाला ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा आहे. रामाची भूमिका करणाऱ्या नटाने रामाचे बाह्य रूप अथवा त्याचें शब्द यांच्याच द्वारा प्रेक्षकांना केवळ रामाच्या भूमिकेचा परिचय व त्याच्या कृतीचे व उक्तीचे संवाहन करण्यात समाधान न मानता, रामाचे व्यक्तिमत्त्व स्वतः समजून, ते पाहणाऱ्याला समजेल व उमजेल अशा रीतीने अभिव्यक्त करणे व त्याची प्रेक्षकांना प्रतीती देणे, हा सात्त्विक अभिनय होय. अभिनयाचा वापर प्रयोगीय कलांमध्ये होत असला, तरी प्रत्येक कलाप्रकाराच्या गरजा व मर्यादा यांनुसार त्या त्या कलाप्रकारातील अभिनयस्वरूपात फरक पडणे अटळ आहे.