मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ विषय - परीक्षा नसती तर ....!

गट क्रमांक १

वेदांती  शैलेन्द्र कदम     

पारितोषिक : उत्तेजनार्थ 

 

परीक्षा नसती तर .....!



वाह ! काय कल्पना आहे. काहीच अभ्यास करायला नको.  नुसती मज्जाच मजा. साप्ताहिक परीक्षा, मासिक परीक्षा नाही. प्रथम चाचणी, प्रथम सत्रांत, द्वितीय चाचणीद्वितीय सत्रांत परीक्षा नाहीत. मौखिक परिक्षा पण नाही, मग काय पाठ करायला नको की आठवायला नको. खरचं या परीक्षांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात ताण आणला आहे एक झाली की दुसरी मग तिसरी हे चक्र चालूच राहते.

 

आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या आणि विज्ञानयुगाच्या जगात आजचा विद्यार्थी हा विद्यार्थी (विद्या + अर्थी: विद्या संपादन करणारा) परीक्षार्थी झाला आहे. मला एवढे गुण, एवढी श्रेणी मिळाली पाहिजे हाच उद्देश. भले विषयाचे आकलन होवो होवो. कधी कधीतर  स्मरणशक्तिचीच परीक्षा होत असल्यासारखे वाटते.

 

खरचं परीक्षा नसत्या तर? पुस्तकांचा जन्म तरी झाला असता हे सांगता येणार नाही. ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो त्यांना तर काय आनंदी आनंदच. पालकांचा शिकवणी, मार्गदर्शिका, अपेक्षित प्रश्नसंच यांवर खर्चच झाला नसता. कधीकधी उत्तरपत्रिका गहाळ होणे, प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटणे, प्रश्नपत्रिकेसाठी  परीक्षकांना लाच देणे, परीक्षेत विद्यार्थ्याने कॉपी घेऊन जाणे असे अनुचित /गैरप्रकार घडलेच नसते. शिक्षकांचे प्रश्नोत्तर, शंकानिरसन असे व्याप वाचले असते. बक्षीस समारंभच झाले नसते. 'सगळे विद्यार्थी एकसमान 1" सगळे विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलले गेले असते. परीक्षा नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासच करणे सोडून दिले असते.

 

परीक्षा नसती तर 'बाळा अभ्यासाला बस' असे सांगावे लागले नसते. आई-वडिलांचा मार खायचा वाचला असता. मुलांनी आपल्या आवडत्या छंद, कला यांमध्ये प्रावीण्य मिळवले असते. जसे संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, खेळ यामध्ये कोणाला ना कोणाला तरी  असतो. यांतूनच पुढे प्रसिद्ध खेळाडू जसे मा. सचिन तेंडूलकर, मा. विश्वनाथ आनंदमा. सायना नेहवाल, मा.गीत सेठी, मा. मेरी कोम . कलाकार जसे उस्ताद झाकीर हुसेन, पं. जसराज, मा. स्व. लता मंगेशकर, मा. आशा भोसले असे गायक, गायिका जन्माला आले असते.

 

अपेक्षित गुण /श्रेणी मिळवण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. आपली आवड, छंद, कला यांना बाजूला ठेऊन पुस्तकी किडा होतात. निकाल लागल्यावर जर मनासारखे गुण मिळाले तर वाहवा ! नाहीतर आई- बाबांची बोलणी खावी लागतात ते वेगळे. कधी कधी तर विद्यार्थी आपला आनंदच आत्मविश्वासच गमावून  बसतात.

 

जशा नाण्याला दोन बाजू आहेत: तशाच या परिस्थितीला पण दोन बाजू आहेत. परीक्षा नसतील तर विद्यार्थी आळशी होईल. संस्कृतमध्ये म्हटलेच आहे, अलस्य कुतो विद्या अविदयस्य कुतो धनम् । आळशी माणसाला कुठे विद्या ? आणि विद्यविहीन माणसाला कुठे कुठली धनप्राप्ती? थोडक्यात काय जीवनात अंधारच.

 

परीक्षा नसेल तर विद्याथ्र्यांनी काय ज्ञान मिळवले हे कळणार कसे? ज्ञानाची कसोटी घेण्याची परीक्षा हेच साधन आहे. परीक्षा नसेल तर कायमची सुट्टी असल्यासारखे वाटेल. मग सुट्टीचाही कंटाळा येईल. पुष्कळ अभ्यास  करून परीक्षा दिल्यावर मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद अवर्णनीय असतो. त्याशिवाय चांगले गुण मिळवून जी 'वाहवा' होते ती वेगळी.

 

मागील दोन वर्षी असलेल्या करोनाच्या संसर्ग संकटात परीक्षाच काही ठिकाणी घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण त्यांचे लिहावयाचे सराव पण गेले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. लिहण्याच्या सरावाने स्मरण शक्ती सुद्धा वाढते. करोनाकाळात झालेल्या परीक्षा झाल्याचे मुलांचे शैक्षणिक नुकसान हे याचे उत्तम उदाहरण आहे.

 

करोनाकाळात on-line (थेट - प्रक्षेपण ) पद्धतीने शिक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्या अडथळी झाल्या त्या लक्षात राहिलेल्या आहेत. शिक्षक- विद्यार्थी संवादाचा अभाव, शंकानिरसन होणे, लिहण्याचा सराव होणे, हे सर्वांनीच अनुभवलेले आहे. आजच्या  संगणयुगात जरी सर्व सहज उपलब्ध असेल तरी जीवनात यांत्रिकता नाही आली पाहिजे म्हणून परीक्षेचा आधार घ्यावा लागतो.


खरत तर शिक्षणपद्धतीत थोडे बदल घडावयास हवे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची गोडी लावली पाहिजे. 'Learning by doing' कृतींतून शिकणे या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या  सहभागाने आदान-प्रदान (देवाण - घेवाण) या पद्धतीने केले तर त्यांचे ज्ञान भक्कम होते. वर्गामध्ये छोट्या छोट्या कोडी, विनोद, प्रश्नमंजूषा, वाद-विवाद याने  विद्यार्थ्यांना अभ्यास हे ओझे वाटता,  अभ्यास हा जीवनाचा अविभाज्य घटक वाटेल. याने त्यांचे सामान्य ज्ञान पक्के तर होतेच पण संबंधित विषयाचे ज्ञान पण वाढते.

 

अशा प्रकारे विद्यार्थ्यांना परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे आवडेल. विद्यार्थ्यांना घोकंपट्टी हे स्थान कामा येऊ नये, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसो बत शंकानिरसन करून घ्यावे.

 

परीक्षेमुळे स्वावलंबन, स्वयंशिस्त यांची सवय लागते. कमी गुण मिळाले तर खचून जाता; आपण कुठे चुकलो, आपण स्वतःला कसे सुधरवू शकतो याचा विचार करायचा. छोट्या छोट्या चुकीमुळे शिकत माणूस बराच मोठा होतो. हे पुढच्या मोठ्या  परीक्षांमध्ये आयुष्यात उपयोगी येते. वेळेचे बंधन, वेळेचे नियोजन यांची पण सवय परीक्षेतून लागते.

 

विद्या ददाति विनय विनयाद याति पात्रताम् । पात्रत्वादनमाप्नोति धनादर्मं ततः सुखम् || विद्ये सोबत  विनय (नम्रता) येते, विनयसोबत  पात्रता (सृजनता) येते, पात्रतेने धनप्राप्ती होते, धनामुळे धर्म आणि धर्मामुळे सुखप्रप्ती होते.

 

थोडक्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जाऊन ज्ञान प्राप्त करून सुखकर व्हावे. म्हणून पालकांनी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन दयावे, याची गरज आहे.

 

";