पाककला

मराठा मंडळ मुलुंड,मुंबई – महीला आघाडी आयोजित पाककला स्पर्धा उपक्रम खूप छान पार पडला. या स्पर्धेसाठी करण्यात आलेले नियोजन अतिशय उत्तम होते. मंडळाची प्रशस्त जागा त्यामुळे टेबलांची सुंदर मांडणी केली होती. सर्वांना व्यवस्थित व प्रशस्त टेबल मिळाला तसेच प्रत्येक टेबलावर प्लेट,चमचा व टिश्यू मांडलेले होते. हाॅलमधे आल्यावरच एकदम प्रसन्न वाटले.

आयोजन आणि नियोजन अर्थातच नेहमीप्रमाणे मंडळाच्या परंपरेनुसार अत्यंत रेखीव आणि अर्थातच शिस्तबध्द. सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा खूप छान एन्जॉय केली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आणि नंतर अर्थातच पदार्थ हौसेने चाखण्यासाठी आलेल्या खवय्या मैत्रिणींची उपस्थिती खऱ्या अर्थाने मनाला आनंद देणारी होती. 

सौ.सोनालीचे सावंतचे सूत्रसंचालन, प्रमुख सौ.माधुरी तळेकर व मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे मनोगत,सौ. करुणा सावंत यांचे आभारप्रदर्शन उत्तम! 

स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध शेफ श्री. पराग जोगळेकर यांचे उत्तम परीक्षण आणि मार्गदर्शन खूप भावले. प्रत्येक पदार्थ चाखून पाहणे. त्याची पौष्टिकता तपासणे,त्याबद्दल प्रश्न विचारणे,सजावट निरखणे इ.गोष्टींचे परीक्षण अत्यंत शांतपणे परंतु शिस्तबध्द पद्धतीने, ते आणि त्यांची कन्या हसतखेळत करत होते.

करुणा आणि सोनल यांनी घातलेली,कार्यक्रमाला साजेशी रांगोळी आणि श्री.हेमंतजी भोगले यांची रंगमंचावरील सजावट सर्वच खूप सुंदर!!

मा.अध्यक्ष श्री. शिर्के काका यांची अनुपस्थिती जाणवली. तरी त्यांचे डोक्यावर असलेले आशीर्वाद आणि सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ सहकारी आणि मंडळाच्या सल्लागार सौ.चित्रा धुरी, सौ.माधुरी तळेकर आणि सौ. रश्मी राणे या माझ्या दोन्ही प्रमुख व निमंत्रक सौ.मनीषा साळवी तसेच सर्व मैत्रिणी आणि हितचिंतक यांचे प्रोत्साहन सतत मिळत असते. 

स्पर्धकांना सर्व सोयी मिळाल्या. महिला आघाडीच्या प्रमुख सौ.माधुरीताई तळेकर व त्यांच्या सहकारी टिमला खूप खूप धन्यवाद!! मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्याचे पण आभार.तसेच सर्व स्पर्धक मैत्रिणी व पाककला स्पर्धेला भेट देवून बनवलेल्या पदार्थांची चव चाखून दाद देणार्‍या सर्व खवय्यांचेही मनपूर्वक धन्यवाद!! आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!

*मराठा मंडळ  मुलुंड,मुंबई* *महिला आघाडी आयोजित* *पाककला स्पर्धा–२०२२*   

 निकाल खालीलप्रमाणे :

 *परीक्षक–प्रसिद्ध शेफ श्री. पराग जोगळेकर* 

 *प्रथम पारितोषिक–सौ. नयनतारा भालेराव*

 *पदार्थ–दुधी भोपळा व गाजराचा ढोकळा*

 *द्वितीय पारितोषिक–अनुपमा देशपांडे*

 *पदार्थ–झटपट पौष्टिक हांडवो*

 *तृतीय पारितोषिक–रसिका मेगले*

 *पदार्थ–गव्हाच्या सत्वापासून पौष्टिक पापडा*

 *उत्तेजनार्थ पारितोषिक–सौ.सुरेखा मुळीक*

 *पदार्थ–नाचणी शिरा*

 *उत्तम सजावट–सौ.ऐश्वर्या ब्रीद*

 *पदार्थ–फोडणीचे दही पोहे*