"मराठी बिजनेस फोरम" एक बिजनेस नेटवर्किंग प्लेटफॉर्म महाराष्ट्र इंडस्ट्री डेवलपमेंट ...

मराठा समाजाला संघटित करून उद्योगप्रवण करणे या उद्देशाने मराठा बिझनेस फोरम सुरू करण्यात आला असून, या फोरमचे उद्‍घाटन नुकतेच परळ येथील ऍडव्होकेट श्री  शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजात उद्योगशीलतेची वृत्ती रुजविल्यास एक दिवस देशातील सर्वोच्च उद्योगपती म्हणून मराठा उद्योजक नाव कमावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, कारवार, इंदूर इत्यादी ठिकाणी वसलेले मराठा समाजातील उद्योजक यावेळी उपस्थित होते. हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे, निर्माण ग्रुपचे राजेंद्र सावंत, काटाळे शिपयार्डचे दिलिप बाईंग आदी मोठ्या उद्योजकांनीही यावेळी हजेरी लावली आणि फोरमला शुभेच्छा दिल्या. उद्‍घाटनानंतर केलेल्या भाषणात हावरे यांनी नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मराठा उद्योजक एकत्र येऊन काम करू इच्छितात ही मोलाची गोष्ट असल्याचे अॅड. पवार यांनी यावेळी म्हटले. फोरमची पहिली कार्यकारणी यावेळी नेमण्यात आली असून, त्यात अॅड. शशिकांत पवार अध्यक्ष, दिलिप बाईंग आणि राजेंद्र सावंत उपाध्यक्ष, पंकज घाग सरचिटणीस, राजेंद्र घाग संयुक्त सरचिटणीस, अजय सावंत खजिनदार आदी अनेकांचा यात समावेश आहे. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि www.mbf.org.in या वेबसाइटचेही उद्‍घाटन करण्यात आले. यामुळे उद्योजकांना कुठेही आणि केव्हाही या वेबसाइटवरील अद्ययावत माहिती घेता येणार आहे. फोरमविषयीच्या अधिक माहितीसाठी संपर्कः ९८२०४६९१२२.