मराठा मंडळ निबंध लेखन स्पर्धा २०२२ -
विषय : आधुनिक शिक्षण पद्धती २०२२

गट क्रमांक ३

विभावरी सतीश दामले 

पारितोषिक : व्दितीय क्रमांक 


"आधुनिक शिक्षण पद्धती-2022"


विद्यानाम नरस्य रुपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम् विद्या गुरुणाम् गुरु

अशा विचारांच्या संस्कारांमधून शाळेत प्रवेश घेतला. शाळाही अलौकिक प्रत्यक्ष जगन्नाथ शंकरशेट संस्थापित शिक्षकवर्ग भारावलेला.  माझे नव्हे माझ्या पिढीचे भाग्यही असे की लौकिकदृष्ट्या आधुनिक शिक्षणाच्या मांडवाखालून जाणाऱ्या पहिल्या संघाचे (बॅचचे) आम्ही विद्यार्थी  हो! 1966 कोठारी कमिशनने प्रस्तुत केलेल्या शैक्षणिक धोरणांच्या तरतूदींवर आधारित प्रत्यक्ष शिक्षण पद्धती आस्तित्वात आली 1975 साली.

मग त्यापूर्वीची शिक्षणपद्धती कशी बरं होती? भारतीय स्वातंत्र्यानंतर 1947 साली मौलाना अबुल कलम आझाद यांनी सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला. तथापि शिक्षणाची ध्येये/बीद सुनिश्चित झाले नव्हते. त्यामुळे काही शिक्षणसंस्था महात्मा गांधी प्रणित बुनियादी शिक्षणाचा स्वीकार करत. काही शिक्षणसंस्था बिवेकानंद यांची शैक्षणिक विचारप्रणाली मानत. तर रविंद्रनाथांचे खुले वातावरण काही शिक्षणसंस्थांना मानवले. 1948 साली भारत भर अनेक शिक्षणसंस्था उदयास आल्या. 'शीलं परं भूषणम्।' 'सा विद्या या विमुक्तये।' "विद्या तु सेवार्थम् ' 'विद्या गुरुणाम गुरु' अशी ब्रीदवाक्ये त्यांनी धारण केली होती. राधाकृष्ण कमिशन आदि काही प्रसंगोचित शिक्षण समित्यांनी शिक्षणपद्धतींना आकार आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला खरा! पण लॉर्ड मेकॉलेच्या मानसिकतेतून शिक्षणपद्धत बाहेर येऊ शकली नाही. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरच आणि भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरच शिक्षण कुणासाठी.. कशासाठी याचा परिप्रेक्ष स्पष्ट- हळूहळू का होईना - स्पष्ट होऊ लागला

1961 साली NCERT स्थापना झाली,IIT स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टपणे कास धरली. आधुनिकतेचे ठसे शिक्षणपद्धतीमध्ये उमटले जायला हवेत असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले. त्यानंतर शिक्षणक्षेत्रात ठोस भरीव असे धोरणात्मक परिणाम करणारे खरेखुरे आधुनिक, राष्ट्रीयत्वाचा झेंडा हाती घेतलेले शिक्षण कसे असावे यावर विचार विमर्ष सुरु होऊन पहिली आधुनिक शिक्षणपद्धती उदयास आली कोठारी कमिशन (1964-1966) हे त्याचे शिल्पकार.

आज सप्टेंबर 2022. सर्वत्र चर्चा आहे. NEP 2020  ची म्हणजे नवे आधुनिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. [New Education Policy 20201] अर्थात शिक्षणाच्या मांडवा खालून गेल्या 75 वर्षात 68% पेक्षा अधिक समाज गेल्यामुळे असे काही धोरण शैक्षणिक विचार-आचारांमागे असते याची जाणीव कुठेतरी समजते.  समजू शकते. प्रसारमाध्यमांचाही मोठ्ठा वाटा यामागे आहे. चर्चा / महाचर्चा/परिसंवाद / वृत्तपत्रांतील ठळक मथळे आणि पंतप्रधानांच्या छबीसह प्रसृत निवेदने यांचा प्रभाव जनमानसावर निश्चित पडतो.

1970 सालापर्यंत "साळंत जाऊन काय करायचे ?? बस घरीच बरायेस गड्या." अशी वाक्य घरोघरी सहज उमटायची निथून आज जवळजवळ प्रत्येकजण शिक्षणावर शिक्षणक्षेत्रावर...शिक्षणपद्धतींवर बिनधास्त मते देऊ लागला आहे असे चित्र आहे. जनसामान्य असो वा तथाकथित ग्यानी. सूर"बट्ट्याबोळ" राग आळवतो.

खरंच अशी शिक्षणपद्धती सदोष असते का? मूठभर लोक.शिक्षण आणि शिक्षणपद्धती जनसामान्यांवर लादतात का? शिक्षण विषयक GR हे फतवे स्वरूपाचे असतात का? कार्यवाही नेहमीच सदोष असते का? "बट्ट्याबोळ" असं का बरे वाटते ? शिक्षणविषय निर्णय तुघलघी  असतात का? कोण बरे होते हे निर्णय ?

आजमितीस 2022 साली भारतभर जी शिक्षणपद्धत अस्तित्वात आहे. प्रचलित आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चे फलित आहे. शिक्षणमहर्षी जे.पी.नाईक, के.सी. पंत यांच्यासारखे तज्ञ या समितीत होते. या समितीने प्रथमच शिक्षणाचा वैश्विक विचार (Global approach) स्थानिक गरजा (locat requirement) याचा समन्वय साधत अनेक अत्यंत उपयुक्त शिफारशी केल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही करताना त्यामध्ये काही चांगले बदल 1992 1996 साली करण्यात आले. 2000 चे शतक (मिलेनियम) ओलांडतांना आधुनिक शिक्षण हे आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करेल याकडे प्रकर्षाने लक्ष पुरविण्यात आले होते. मग बट्ट्याबोळ नेमका होतो कुठे आणि कसा?

बट्ट्याबोळ नेमका होतो कुठे आणि का? 1986 चे धोरण उत्तम आहे. त्यात आदिवासी उपेक्षित, वंचित, दिव्यांग स्त्रिया अशा सर्वांच्या एकात्मिक शिक्षणाचा विचार आहेनुसताच विचार नाही तर Fuluproof नियोजन आहे.

आश्रमशाळा, नवोदय विद्यालय, खडू-फळा मोहिमा लोकसहभाग शाळकरी गरजूंना माध्यान्ह भोजन यासाठी सुनिश्चित तरतूदी केल्या आहेत आणि आर्थिक तरतूदी आहेत. तिथे झिरपी आहे या शैक्षणिक धोरणाचे अध्वर्यू स्व. राजीव गांधी यांनी हीच झिरपीची थिअरी पंचायत राज योजनेच्या कार्यवाहीबाबत देखील मांडली होती. तसे होऊ नये म्हणून कळकळीने आवाहनही केले होते. पण राजीव गांधी यांची हत्या झाली; राजकीय उलथापालथी अनेकवार झाल्या, सत्तापालट झाले कैकयात 'शिक्षणक्षेत्र' दुर्लक्षित राहिले


Power Carrupts & Absolute power corrupts absolutely असे म्हटले जाते. 2K ने जागतिक स्पर्धेत भारताला नव्हे भारतीय मानसिकतेला उतरवले. स्पर्धा - स्पर्धा पळा पळा कोण पुढे पळे तो ….. यामुळे विजयी नव्हे  यशस्वी होण्याचीच अहमहमिका लागली आणि स्पर्धेने संघर्षाचे स्वरूप धारण केले.

दुसरे म्हणजे 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्य शिक्षण मंत्रालयाचे नावच बदलले. आता शिक्षण मंत्रालयाला नवे नाव मिळाले 'केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि संसाधने मंत्रालय' भले शेक्सपिअर बाबांनी म्हटले असेल की "नावात काय आहे ? " "You spelt a rose by any name, but it will smell a rose पण इथे तसं झालं नाही. शिक्षक हा संसाधन (Resource) बनला. शिक्षण म्हणजे राष्ट्रीय संसाधनांचा विकास (empowerment of the national resources) बस्स. शिक्षणातील आस आस्था ओढ  enlightenment संपून  एक रुक्षपणा त्यात आला. म्हणजे म्हणतात ना, तशी मुळांतली ओल सुकत चालली. कर्तव्यशुष्कता आली. शिक्षक हा केवळ साधन बनला हो ! शिक्षकांची गुरु म्हणूनची भारतीय संस्कृतीने ओळख पुसट होऊ लागली. शिक्षक विद्यार्थी आटू लागली.

कोण होता तुम्ही | काय झाला तुम्ही

अरे शिक्षकांनो: वाया गेला तुम्ही………

अरे विद्यार्थ्यांनो, वाया गेला तुम्ही………
अशी तू-तू-मैं-मैं..समाजात दिसू लागली. कर्तव्याहून उंच आवाज हक्कांनी लावला.

पण पायाभूत तत्वे उदात्त असल्याने अनेक चांगल्या निस्पृहणीय गोष्टी घडताहेत. चांगल्या फळे किडकी निघत नाहीत. 130 अब्ज लोकसंख्येचा आपला देश, किती स्तरावर वैविध्य आहे इथे || भाषिक, प्रांतिक, धार्मिक, स्थानिक, राजकीय विचार, आर्थिक स्तर…. एक माणूस दुसऱ्या सारखा नाही. सर्वांना सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा विचार करणे हेच अद्भुत आहे.

 

महाराष्ट्रातच बघा ना, मराठी मातृभाषेत शिक्षण द्यायचं झालं तर कोकणी मालवणी, कोल्हापूरची.. पुण्याची.. जळगावची.. धुळ्याची.. नागपूरची.. मराठवाड्याची निगडचिरोली प्रत्येक प्रांतातील बोली वेगळी. प्रमाणभाषेचा आग्रह म्हणूनच तर राजकीय पक्ष सुमार बुद्धीचे प्रदर्शन अरेरावीने करता त… त्यातून दंगेही घडवतात. हे मी एक साधस उदाहरण देतेय. प्रांतीय अस्मिता तर इतक्या टोकदार आहेत की टू म्हणता जाळपोळ सुरु 'असो.


असे सर्व असतानाही आज महाराष्ट्रान 98% मुले शाळेत प्रवेश घेतलेली आहेत असे अहवाल सांगतो. शाळाबाहय  मुलांना शाळेत आणणे. गळती रोखणे. शाळेत आनंददायी शिक्षण देण्यासाठी वातावरण निर्माण करणे हे शासनाने बंधनकारक केलेय. अर्थात अशा शासननिर्णयांविरुद्ध गळे काढणं ओघाने आलंच.

'आठवीपर्यंत सर्वांना उत्तीर्ण करण' हा असाच एक वादग्रस्त निर्णय - आत्मा समजून घेणं महत्वाचे. Right to Education 2009 मुळे मुलांना 6 ते 14 वर्षे शाळा शिकूणं अनिवार्य आहे. पण नापास झाल्यानंतर मुले विशेषतः मुली शाळा सोडतात. त्या माध्यान्ह भोजनाला मुकतात. कुपोषितपणा वाढतो. शाळा सोडलेल्या मुलींची लगेच लग्न लावले जाते. कुपोषित आणि अल्पवयीन मुलींचे लग्न ….. आणि सर्वांना शिकवता. … शिकता उत्तीर्ण करा' असा नियमच नाहीये. 'जन्माला येणारे प्रत्येक मूल स्वतःची एक उपजत समज घेऊन जन्माला येते. ती उपजत समंज फुलवा. समजून घ्या. मूल लिहित नसेल त्याला बोलते करा बोलत नसेल कृती करवून  घ्या.. कृती करत नसेल तर त्याला जे जमेल ते शिक्षकांनी समजून घ्या हलकेच व्यक्तिमत्व विकसन करा. मुलाचे सामाजिकीकरण करा असे आग्रहाचे प्रतिपादन शिक्षकांसाठी केलेले आहे यालाच म्हणतात अकारिक मूल्यमापन.

 

1986 च्या या शैक्षणिक धोरणाने गेल्या ३५ वर्षात अनेक यशस्वी बदल घडवले. भारताची महासत्ते कडे वाटचाल सुरु झाली ती याच कालखंडात.

या शैक्षणिक धोरणातील बऱ्यावाईट शिफारसींचा  परामर्ष घेऊन सिद्ध आहे नवे आधुनिक शैक्षणिक धोरण 2020.


'
भूतकाळाच्या पायावर उभे राहून वर्तमान नेहमी भविष्याचा वेध घेत असतो' असे म्हणतात. Destiny of nation is being carved in the 4 walls of the class' 
असे 1966 च्या शिक्षणपद्धतीने प्रतिपादले .


चार भिंतीतील शिक्षणाला 1986 च्या धोरणाने  भिंतींबाहेर आणून अधिक वैश्विक केले आहे. Digital education, दूरस्थ शिक्षण, बहिस्थ शिक्षण, मुक्त शिक्षण, Doorstep education. पहा ना, कोरोना काळात जगभर हाहा:कार माजला असतानाही आपल्या शिक्षकांनी कसकसे सारे नवे संदर्भ आत्मसात केले. मुलांना ऑनलाईन शिकवले. थोडेथोडके नाही तर तब्बल 2 वर्षे 'रणजित डिसले गुरुजी', खरेखुरे ग्लोबल टीचर म्हणून सन्मानित झाले. असे अनेक झळझळीत कार्य शिक्षकांनी केले. करताहेत. मुलांना self study ची जाण आलेय. येतेय. आता वेळ आहे 'भारत एक महासत्ता' हे सांगण्याची. आणि NEP 2020 याच आत्म्याचा पुनरुच्चार करत आहे.

NEP 2020
मध्ये भविष्यातील भारत कसा असेल कसा असावा याची स्वप्न साकारणारी तत्वे त्यात आहेत. सर्वांसाठी शिक्षण - सहजशिक्षण- आनंददायी शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण- उत्तरदायित्वाचे शिक्षण. मातृभाषेतून शिक्षण. समजणारे. भारताचे वैविध्य, परेपरा प्राचीन वारशाचा उद्गार जागणारे शिक्षण खास लक्षण, 5-3-3-4 स्वरुपाची ही आधुनिक शिक्षणपद्धती असेल हेही यांचे खास लक्षण आहे. वय वर्षे 3 ते 6 यामध्ये 
बालकाच्या मेंदूची वाढ होत असते. या वयात ज्ञानाचा परिषोष करणारे अंगणवाडीमधून शिक्षण.

 

तिसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे. शिक्षकाला सन्मान देणारे शिक्षण. शिक्षकाला बुद्धीमान म्हणून विशेष प्रशिक्षण देणारी शिक्षण पद्धती.भूतकाळाचा उज्ज्वल वारसा जपत जतन करत आधुनिकतेचा वसा सांभाळणारी जगाला मार्गदर्शन करणारी ही शिक्षणपद्धती भारताच्या या अमृतमहोत्सवी वर्षात अमृतजीवी संजीवनी ठरेल असा मला विश्वास वाटतो. जय हिंद