रांगोळी

मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक विभाग आयोजीत दुसऱ्या रांगोळी प्रशिक्षण शिबिराला २८ जानेवारी पासून सुरुवात झालेल्या ५ फेब्रुवारीला यशस्वी सांगता झाली.  सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, यात २५ जणांचीच बॅच झाली.


सर्वांनी शिबिराचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. सर्वांची रांगोळीची आवड आणि मेहनत दिसत होती. शिबिराची सुरुवात, मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.अरूणजी चव्हाण, कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वरजी भालेराव, श्री.अजयजी माने, सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.


सौ.करुणा सावंत यांनी आपल्या भारतीय परंपरेतील रांगोळीचे महत्त्व सांगितले. मा.अरूणजी चव्हाण, मा.महेशजी चव्हाण,सौ.माधुरी तळेकर,सौ.रश्मी राणे व सौ ऐश्वर्या ब्रीद यांनी आपले मनोगत मांडले. सौ. करूणा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.चहापानानंतर प्रशिक्षणाची सर्व सूत्रं सौ.ऐश्वर्या यांनी घेतली. त्यांना करुणा यांनी उत्तम साथ दिली. नाव नोंदणीची जबाबदारी सौ.मनीषा साळवी आणि सौ.मानसी म्हामुणकर यांनी उत्तमरित्या पार पाडली.


या शिबिरासाठी लागणारे ४० किलो रंग आणि ५० किलो सफेद रांगोळी बाजारातून आणण्यापासून ते सर्व सामान प्रत्येकी १ किलो पॅकिंग करण्यापासून सौ. ऐश्वर्या ब्रीद यांना गणेशभाऊ,परब मामा,भुवड मामा,राजेश भाऊ,पिल्ले मामा यांची खूप मदत झाली. प्रवेशद्वारावरील सुंदर रांगोळी सौ. करूणा सावंत यांनी घातली.


पहिल्या दिवशी उपाध्यक्ष मा.श्री. सुदामजी म्हामुणकर,कोषाध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी देसाई, सौ.मिनल सावंत, सौ.वृंदा शिर्के यांनी शिबिराला भेट दिली. 

अध्यक्ष मा.श्री.शिर्के काका यांचे मार्गदर्शन,सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ यांचे प्रोत्साहन आणि सर्व उपसमिती सदस्य यांचे सहकार्य यांमुळे आपले शिबिर यशस्वी होणारच.