मराठा मंडळ मुलुंड - निबंध स्पर्धा २०२२ विषय : विज्ञानाचे महत्व

गट क्रमांक

क्षितिजा चंद्रकांत मोरे

पारितोषिक : व्दितीय क्रमांक

 

* विज्ञानाचे महत्त्व *

 

पृथ्वीतलावरील मानवाला प्राप्त झालेले अदभुत यश वरदान म्हणजे विज्ञान होय. विज्ञानाच्या मदतीने मानवाने पृथ्वीवर लावलेले अदभुत शोध हे अद्वितीय आहेत. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची ताकद व शक्ती ही विज्ञानात आहे.

 

'सूर्यजालमरीचिस्थं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः । तस्य षष्ठतमो भाग: परमाणुः स उच्यते ||


विज्ञानातील अणू (atom) या घटकाचाच म्हणजे सगळ्यात छोटा. निश्वयव असा सहावा भाग म्हणजे परमाणु होय. कणाद ऋषींनी परमाणुची व्याख्या या संस्कृत श्लोकात नमूद करून ठेवली आहे. विज्ञानाच्या भाषेत परमाणुलाच sub-atom असे म्हणतात. यावरून हे समजते की प्राचीन काळी आपले विज्ञान प्रगत होते.

 

आपल्या पृथ्वीवर कदाकाळी महाकाय असे प्राणी होऊन गेले. त्यांचेच काही गुणधर्म असणारी प्राणी पक्षी आज पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत', असे आपल्याला कोणामुळे समजले विज्ञानामुळेच.

 

'विज्ञानामुळे आज' आपण आरामदायी सुखद असे जीवन जगू शकत आहोत. मानवाच्या दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. सकाळी उठल्यावर दात स्वच्छ करण्यासाठी लागणारा टूथब्रश, संध्याकाळी ऑफिसमधून दमून भागून आल्यावर बाबांना लागणारा. थंड हवा देणारा पंखा, 'रात्रीचा किट्ट काळोख नष्ट करण्यासाठी लागणारा दिवा. आईला जेवण बनवण्यासाठी लागणारा गैस अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात पाहतो.

 

अद्भुत असा गुरुत्वाकर्षणाचा शोध 'न्यूटन' यांनी विज्ञानाच्या मदतीने लावला.  या शोधामुळे आपल्याला भरती ओहोटी का होते ? हे समजले. विज्ञानाच्या मदतीने Edmond Bequerel यांनी  सौरऊर्जेचा शोध लावला. हा शोध/ संपूर्ण मानवजातीसाठी   तसाच हा वसुंधरेसाठीही महत्त्वपूर्ण ठरला. विज्ञानामुळे लागलेला विजेचा शोध हा आजच्या युगात 'अमृततुल्य ठरला आहे. त्यांच्या या शोधामुळे आज आपण अनेक उपकरणांचा वापर करू शकत आहोत. त्यांच्या या शोधामुळे आज आपले जीवन सुखद बनले आहे.  आपण  सदैवच अप्रत्यक्षरित्या त्यांचे ऋणी राहू.

 

आपल्या वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या सोबतीने घडून आणलेला सगळ्यात अद्भुत असा आविष्कार म्हणजे संगणक. जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विचार थोडक्यातच संपूर्ण जगालाच एकत्र आणण्याचे या संगणकाने केलेले आहे. या विज्ञान युगात प्रगतीचा खरा मंत्र म्हणजे संगणकाविषयीचे ज्ञान असणे असा बनला आहे.

 

मोबाईल, टॅब हे तर संगणकाचेच भाऊबंध. बिजेचे बील असो वा दूरध्वनीचे बील असो किंवा रेल्वे, विमान यांचे तिकिट काढण्याचे काम असो, विज्ञानाचे आविष्कार संगणक त्यांचे भाऊबंधत्व आपले मदतगार ठरले आहेत.

 

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण, नोकरदारांचे व वर्क फ्रॉम होम अबालवृद्धांचे मनोरंजन या सर्वांसाठीच विज्ञानाचे हे आविष्कार देवदूत उरले.


ज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी विज्ञानाने लावलेला छपाई यंत्राचा शोध हा अदभूत आहे. या छपाईयंत्राच्या शोधामुळे आपल्याला घरबसल्या अनेक बातम्या, माहिती, जगात घडणाऱ्या घडामोडी या वर्तमानपत्रे, मासिके नियतकालिके यांच्या माध्यमाने समजतात. लेखकांच्या आवृत्या, त्यांचे लेख हजारोंच्या संख्येत या छपाई यंत्राच्या माध्यमाने छापून निघतात.

 

विज्ञानाने भूमीवर विलक्षण असे चमत्कार घडवून आणले आहेत. विज्ञानाने ओसाडी वाळवंटी प्रदेश नंदनवनांनी, फुलापाखरां नी पशुपक्षांनी फुलून जायला निघालीत. कृषी क्षेत्रात विज्ञानाने प्रगती घडवून आणली. नानाप्रकारांच्या बियांवर मानव विज्ञानाच्या तंत्राच्या मदतीने प्रयोग करू लागला. अनेक विविध यंत्र तयार होऊ लागली. विज्ञानाने मानवाप्रमाणेच चालणारा, बोलणारा रोबी मानव बनवला.

 

विज्ञानाप्रमाणेच मानवही विज्ञानाचा सोबती बनला. त्यांनी भूमीप्रमाणेच वसुंधरेप्रमाणेच सागरावरही विजय मिळवला. अथांग सागरातील अनेक गुपिते. सागराच्या आतील भूरचना, वनस्पतीसृष्टी, तेथील जीवसृष्टी यांचा अभ्यास मानव विज्ञानाच्या मदतीने करू लागला. सागरातील 'मरियाना गर्ता ' समजून घेणे हे ध्येय वैज्ञानिकांनी ठेवले आहे.

 

विज्ञानाच्या मदतीने निर्मित केलेली कृत्रिम उपग्रहे अवकाशात सोडून विज्ञान अमर्याद अवकाशावर संशोधन करू लागला आहे. डॉ.  स्टेपल हॉलिंग' यांच्या मते, “विज्ञान अंतराळातील अनेक गुपिते जाणून घेईल. त्याचे मूळ त्याचा इतिहास त्याचा विनाशही विज्ञान समजून घेईल." असा डॉ. स्टेपन हॉकिंगचा विश्वास विज्ञान सत्यात उतरवू पाहत आहे. आपल्या अंतराळात असलेल्या असंख्य आकाश- गंगा'. त्या आकाशगंगांतील अनेक सूर्यमाला. त्या सूर्यमालेतील अनेक ग्रह, त्या ग्रहांवरील भूरचना, तेथील जीवसृष्टी', हवामान, मृदा, इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास मानव विज्ञानाच्या मदतीने करण्याच्या प्रयत्नात आहे.

 

मानवाच्या व्यक्तीगत जीवनाप्रमाणेच विज्ञानाने औदयोगिक क्षेत्रातही क्रांती घडवून आणण्याचे काम केले आहे. आपण जीवघेण्या रोगांवरील रामबाण, जीवनदायी अशी औषधे फक्त आणि फक्त विज्ञानाच्या मदतीने करू शकलो. यामुळे अनेक निष्पाप जीव या जीवघेण्या रोगांच्या वेढ्यातून निसटून सुखरूप झाले. अपघातातून अपंग झालेल्या व्यक्तीनो आपण कृत्रिम अवयव लावू शकतो. हाही विज्ञानाचाच चमत्कार.

 

जसे विज्ञान जीवनदान देऊ शकते. तसेच मरणही देऊ शकते. मानवाने विज्ञानाच्या मदतीने अणुबॉम्ब सारखे विध्वंसक असे शस्त्र बनवण्यास सुरुवात केली. आणि यांच मुळे अनेक राष्ट्र सुरक्षित बनली.

 

विज्ञानाचा आणखी एक शोध म्हणजे प्लास्टिक. आपण म्हणतो प्लास्टिक वाईट आहे पण हे त्याच्या वापरावरून ठरते. मानव जसा विज्ञानांच्या आविष्कारांचा वापर करेल तसाच फायदा किंवा तोटा  मानवाला मिळेल. त्यामुळे विज्ञान वाईट आहे असे म्हणता येणार नाही.

 

विज्ञानामुळे मानव व्यवहारी बनला आहे. विज्ञानांचा आविष्कारांचा वापर कल्याणासाठी करायचा कि वि नाशासाठी हे मानवावर अक्लंबून आहे. जशी अश्वाची दौड ही त्याच्या सारथीवर अवलंबून आहे तशीच अश्वारूपी विज्ञानाची दौड ही मानवावर अवलंबून आहे.