मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ - विषय : माझा आवडता सण / उत्संव - दिवाळी


गट क्रमांक १

आर्य अनंत पार्टे     

पारितोषिक : उत्तेजनार्थ 


माझा आवडता सण / उत्सवदिवाळी 

 

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. या सणाला दिपावली असेही म्हणतात. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा सण हिंदूसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय लोकप्रिय असा सण आहे. दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा सण येतो. संपूर्ण भारत देशात आनंदाचे वातावरण पसरलेले असते.

 

दिवाळी या सणाच्या दिवशी प्रभु श्रीराम आपल्या १४ वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परत आले होते. अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले आणि हा आनंदोत्सव साजरा केला होता. आजही ही प्रथा कायम आहे. आजही आपण असत्यावर सत्याचाच विजय होतो या भावनेने हा सण आनंदाने साजरा करतो.

 

मुख्यतः दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातोधनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे आहेत ते पाच दिवस. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. नरक चतुर्थीला श्रीकृष्ण यांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजन या दिवशी सकाळी लवकर उठून शरीराला उटण लावून अभ्यंग स्नान केल जात. नवीननवीन कपडे घातले जातात. लक्ष्मीची आणि गणपतीची पूजा-अर्चा केली जाते. गोवर्धन पूजा या दिवशी वासरासह गाईची पूजा केली जात. आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. आणि भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो. हा दिवस बहीण-भाऊ या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

 

दिवाळी सणाच्या दिवशी संपूर्ण घर खूप सुंदर रित्या सजवलेले असते. 'देव्हारा सजवला जातो. घरातघराबाहेर फुलांची सजावट केली जाते. सुंदर तोरणे लावली जातातघराच्या दारासमोर अतिशय सुंदर अश्या रांगोळ्या काढल्या, जातात. अशा प्रकारे संपूर्ण घर सजवले जाते. पण ही सर्व तयारी एक महिना अगोदर पासूनच सुरु केली जाते. नवीन कपडे खरेदी केले जातात. दिवे, तोरणे, आकाश कंदिल, रांगोळ्या सजावटीचे साहित्य, भांडी इत्यादी वस्तु खरेदी केले जाते आणि दिवाळी या सणातील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे फटाके आणि फराळ.

 

दिवाळी या सणात विशेषत: शाळकरी मुलांची आणि सरकारी नोकरी करत असलेल्या अधिकाऱ्यांची  खूप मजा असते. सर्व शाळांची, सरकारी कार्यालयांची साफ सफाई या दिवाळी सणाच्या वेळेस केली जाते. रंग-रंगोटी केली जाते. आणि शाळकरी मुलांना, सरकारी अधिकाऱ्यांना दिवळीची विशेष सुट्टी देखील दिली जाते. आम्ही मुले फार आनंदी असतो. घरात आईने तिच्या हाताने फराळ म्हणून चिवडा, चकल्या, लाडू, करंज्या केलेल्या असतात. गोड म्हणून पंचपक्वान देखील बनवलेले असतात. या सर्वांचा आस्वाद वर्षातून  फक्त एकदाच घेता येतो. त्यामुळे सर्वांनी  दिवाळी या सणाचा जेवढा आनंद लुटता येईल तेवढा आनंद लुटला पाहिजे.

 

गेली दोन वर्ष / अडीज़ वर्ष कोरोना विषाणूची महामारी संपूर्ण जगात सुरु होतो. या कोरोना विषाणूने अडीज वर्ष संपूर्ण जगभरात थैमान घातलं होते. करोडो जीवांचे बळी या प्राणघातक विषाणुने घेतले. २०१८ पासून ते २०२१-२२ पर्यंत ही महामारी टिकून राहिली. या कोरोना काळात कोणालाच काहीच करता येत नव्हतं, घरातून बाहेर पडता येत नव्हतं, कोणतेच सण / उत्सव पूर्वीच्या जल्लोषात, आनंदात, उत्साहात साजरे करता येत नव्हते. सरकारने दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश दिले. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे सांगितले. या कोरोना महामारीच्या काळात गरिबांचे प्रचंड हाल झाले. पूर्वी सर्व दुकाने दिवाळीच्या सजावटीच्या सामानाने फटाक्यांनी भरून जायचे. बाजारात भरपूर गर्दी व्हायची. पण कोरोना काळात सर्व दुकानेउद्योग धंदे बंद असल्यामुळे गरिबांचे हाल झाले. दिवाळीत दिवे विकणारे, आकाशकंदिल विकणारे, रांगोळ्या. तोरणे विकणारे यांच्या प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

 

पण आता कोरोना विषाणू आटोक्यात आला आहे. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेत आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटत आहे. सर्वत्र पुन्हा आनंद पसरत आहे आणि  यंदा  येणारा २०२२ चा दिवळी सण संपूर्ण जग पूर्वीच्याच उत्साहाने आनंदाने साजरा करणार आहे.

 

दिवाळी सण आला की सर्वत्र आनंद तर पसरतोत पण त्याच बरोबर एका गोष्टीमुळे होणार त्रास   त्याचा धोका देखील बळावतो. ती गोष्ट म्हणजे फटाके. मुलांना फटाके फोडायला खूप आवडतात. मुले फटाके इतक्या मोठ्या प्रमाणात फोडतात की त्याने वायू प्रदूषण तर होतेच पण त्याचा त्रास त्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही भोगावा लागतो. फटाक्यामध्ये प्राणघातक विषारी घटक असतात. त्यामुळे मुलांना इतर नागरिकांनाही  श्वसनाचा व फुफुसांचा त्रास होण्याची मोठी शक्यता असते. इतकेच नाही तर मुलांच्या  सावधपणामुळे मजा ही सजा होऊन जाते. की कधी-कधी यामुळे होणारा अपघात हा इतका मोठा असतो की त्यामुळे मुलांना आपला जीव ही गमवावा लागतो. कधीकधी जखमी अवयव गमवावा लागतो. त्यामुळे फटाके जास्त फोडता, वायप्रदूषण करता आणि मृत्यूला आव्हान देता आपण सर्वांनी दिवाळी हा सण आनंदान साजरा केला पाहिजे.

 

आले दाराशी सूख

निमित्त करून दिवाळीचे

मतभेद, भांडण सारे विसरून

रंग उधळूया प्रेमाचे  ! ! !

 

तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे दिपावलीच्या मोरपंखी शुभेच्छा !!!

 

";