मराठा मंडळ निबंध स्पर्धा २०२२ - विषय : माझा आवडता छंद - वाचन

गट क्रमांक १

उज्वल मारुती नेवसे  

पारितोषिक : तृतीय  क्रमांक 

                                                                     

माझा आवडता छद: वाचन


वाचन हा छंद महान

माणसाची भागवतो ज्ञान  तहान

मिळते आपल्याला ज्ञान दान

माणसाचे अज्ञान होते लहान

अशी वाचनाची ख्याती सांगितली जातेज्याप्रमणे ज्वालामुखी दरम्यान पृथ्वीच्या उदरातुन तप्त ज्वालारस बाहेर पडत असतो त्याप्रमाणे माणसाने ऐखादी गोष्ट करावी असे त्याला मनापासून वाटते ती  गोष्ट म्हणजे माणसाचा छंद होय: असा माझा आवडता छंद वाचन आहे. वाचनाने आपल्याला अमर्याद ज्ञान, अद्वितीय मनोरंजन,थोर पुरुषांची चरित्रे, विश्वभ्रंतीचे बारकावे,बालसाहित्यातील अभूतपूर्व जादूमनाला विरंगुळा मिळतो वाचनामुळे आपण  यशशिखरावर पोहोचू शकतो

भारतीय राज्यघटनेचा आराखडा बनवणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसातील अधिक काळ वाचनात घालवीमिसाईलमॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न यांनी म्हणजेच डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांनी 'वाचाल तर वाचाल' हा संदेश जगाला दिला. जगातील सर्वात श्रीमंत उदयोजक एलॉन मस्क यांनी कोणतीही अंतराळाविषयीची औपचारक पदवी नसताना फक्त वाचनाच्या बळावर स्पेस एक्स ही उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. रस्केन म्हणतो पुस्तक म्हणजे 'राजाचा खजिना' आहे. तो राजाचा खजिना उनमोत्तम विचारांचा आहे. अमेरीकेत व्याख्यान देताना 'माझे प्रिय अमेरीकन बधू- भगिनींनो' असे उच्चार करणारे स्वामी विवेकानंद हे वाचनामुळे ज्ञानक्षेत्रात अव्वल स्थानी आहेत

ज्ञान हे पसरलेल्या असे अफाट सागरासारखे आहे. या सागरातील पाणी गोळा करण्याचे प्रभावी साधन म्हणजे वाचन होय. वाचनाच्या तालमीत तयार झालेला पैलवान जगाच्या पाठीवर कोठेही सूर्यप्रमाणे तेज पसरवत असतो. फक्त ज्ञानदेवता गणपतीच्या आजूबाजूला राहून ज्ञानदेवता प्रसन्न होत नाही, तर वाचन करून ज्ञान ग्रहण केलेल्या भक्तावर ज्ञानदेवता प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे भुंगा फुलातील मकरंदाचा आस्वाद घेतो त्याप्रमाणे मी बालपणाचा आस्वाद घेतलेला आहे तरी त्यावेळीच्या समस्यां मला  फारशा आठवत नाहीत परंतु बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या लेखनाने त्यांनी त्या समस्या मांडल्या आहेत

विदयानामनरस्य रूपम् अधिकम, प्रच्छन्नगुप्त धनम्

विदया भोगकरी यश: सुखकरी, विदया गुरुणा गुरु 

विदया बन्धुजनो विदेशगमने, विद्या परंम देवतम् 

विदया राजसू पुज्यते तु धनम्, विद्याविहीनः पशुः


अशी विद्येची महत्ती सांगितली जाते. ज्ञान हे खरच दैवत आहे. वाचनाने मी माझ्या तलावरूपी ज्ञानात तुषाररूपी ज्ञानाचे भर पाडत आहेभारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सागररूपी ज्ञानात वाचनाच्या थेंबांचा सिंहाचा वाटा आहे. वाचनाने आपण आपल्या बुद्धीच्या तलवारीला  धार लावतोवाचन  हा ज्ञानग्रहणाचा एक प्रभावी सोपा असा महामार्ग आहे. प्रभाती जेव्हा भरकाळोखात सूर्याची किरणे प्रकाश पसरवीत  असता तेव्हा काळोखावर उजेडाचा विजय होत असतोजसेकी जीवनाच्या अज्ञानावर वाचनाच्या ज्ञानाच्या प्रभावामुळे अज्ञानावर विजय होतो. जर आपण  जीवनाला  युद्ध मानले तर वाचनाला युद्धापूर्वीची पूर्वतयारी म्हणता येईल. युद्धापूर्वी जो जितका घाम गाळतो म्हणजे जो जितके वाचन करतो त्याला युध्दात तितकेच कमी रक्त सांडावे लागते म्हणजे जीवनात कमी धक्के खावे लागतात

वाचनाने आपल्याला कधी मनोरंजन मिळते तर दु:खाच्या प्रसंगी हसवायला पात्र सापडते  कधी वाचनाने ज्ञानाचा सरोवर सापडतो देशभक्तो करू  पाहणाऱ्या मनाला देशभक्तो करण्याची दिशा मिळते, व्यक्त होऊ पाहणारे मन लेखक होते, आयुष्यात एखादी गोष्ट करू पाहणारे मन त्या क्षेत्रातील तज्ञ होते. वामन  म्हटले की आपल्यासमोर बुटका असा माणूस येतो आणि तसेच बटाट्याची चाळ हे पुस्तक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विनोद येतो. वाचनाने मनोरंजन मिळू शकते हे मला 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक वाचल्यानंतर कळाले.

वाचाल तर वाचाल 

नाहीतर जीवनात खचाल 

वाचनामुळे मोठे ग्रंथ रचाल  

वाचनाने तुम्ही ज्ञानी व्हाल 

वाचनाचे जीवनात असंख्य फायदे आहेत


वाळवंटात तहानलेल्या व्यक्तीची तहान पाण्याने भागते तर ज्ञानासाठी तहानलेल्या व्यक्तीची तहान वाचनाने भागते. मूर्तिकाराला अतुलनीय मूर्ती निर्माण करण्यासाठी अनेक दगडावर अनेक घाव करावे लागतात तसेच एका अतुलनीय बुद्धीच्या निर्मितीसाठी अनेक पुस्तकांचे वाचन करावे लागते. अनेक पुस्तके हे फक्त मनोरंजनासाठी असतात ते असे की माणसाने फक्त गोड पदार्थ खावे. माणसाला सुदृड बनवण्यासाठी चौकस आहाराची आवश्यकता असते तसेच उत्तम बुद्धीसाठी विचार करायला लावणारे लेखाचे वाचन, इतिहासातील युद्धांचे वाचन यांची ही गरज असते.  


आधी मी अमावस्येच्या रात्री चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे असणाऱ्या घाणेरीला नाटकातील पात्राने चुकीची वेशभूषा केली आहे असे समजत, परंतु दुर्गा भागवत यांच्या घाणेरी विषयीच्या लेखाचे वाचन केल्यावर घाणेरी विषयीचे मते माझी पूर्णपणे बदलली. वाचन ज्या व्यक्तीच्या जीवनातील  अविभाज्य घटक होतो त्या व्यक्तीच्या ज्ञानात  सतत वाढ होत असते. वाचनाने आपल्या अणु - परमाणु पासून ब्रम्हाडापर्यंतचे ज्ञान मिळते.

अफाट पसरलेल्या विश्वाला कोठे सामावायच असेल तर ते सहज शक्य होणार नाही तरी प्रयत्न केल्यास तो पुस्तकात सामावेल अशा पुस्तकांच्या वाचनाने आपल्याला अनेक क्षेत्रांमधले बारकावे कळतात. जगातील सर्व देश फिरवणे हे एक दिव्यच आहे, परंतु पुस्तकांच्या वाचनाने हे घरबसल्या सहज शक्य होईलवाचनाने माणसाचा दुष्टीकोन बदलतो तो सत्य मार्गावर चालायला लागतो

स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांनी देखील त्यांच्या शालेय जिवनात अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यांनी फासीवर जाण्याआधी देखील पुस्तक वाचून संपवले मग ते फासावर गेलेपुस्तकांच्या वाचनाने अनेक हिरे घडले आहेत. ज्ञानाच्या बळावर अगदी खालच्या वर्गात असलेल्या दीनदुबळ्या  माणसांमध्ये वाढलेल्या माणसाला भारतरत्न मिळू शकते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले. ज्ञानाच्या बळावर माणूस चिखलातल्या कमळाप्रमाणे तलावाची शोभा वाढवतातजगातील प्रत्येक माणूस विदयसमोर नतमस्तक होते. हे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळते. वाचनामुळे माणूस डबक्यातील ब्रेडूक म्हणून राहत नाही तर समुद्रातल्या देवमाशाप्रमाणे जगतो

जसा गरुड पंखांच्या बळावर गरुडझेप घेतो. तसेच माणूस ज्ञानाच्या बळावर भरारी घेतो. गरुडाच्या पंखांना बळ त्यांच्या पोषक आहारामुळे मिळतो. तसेच ज्ञानाला पोषक आहार वाचनामुळे मिळते. बगळा शांततेच्या बळावर त्याला असणारा छोटा मोठा मासा पकडतो तसेच मी माझ्या आवडणाऱ्या छंदामुळे अनेक छोटी मोठी बक्षीसे मिळवूली आहेत. मोर त्याच्या पिसाऱ्यामुळे शोभून दिसतो तसा माणूस त्याच्या ज्ञानामुळे शोभून दिसतो

जर एखादया माणसाने हा छंद स्वतःच्या अंगी बाळगला तो मध्येच सोडला नाही तर तो नक्कीच यशशिखरावर पोहोचेल. मी आजवर माझ्या ज्ञानाच्या बळावर माझ्या कुंपनापर्यंतच्या यशापर्यंत पोहचलो आहे. जर मी माझा हा  छंद असाच जोपासला तर मी यशस्वी  व्यक्ती बनेल अशी मी आशा करतो

वाचनाने प्रगती होते,

वाचनाने ज्ञान हाती येते

वाचनाने जीवन सुलभपणे जगता येते 

वाचनाने जगही जिकंता येते