मराठा मंडळ मुलुंड मुंबई - निबंध स्पर्धा २०२२ विषय : लोकशाहीत शासकीय यंत्राचा वापर / गैरवापर

गट क्रमांक २

मधुरा मधुकर कासार      

पारितोषिक : तृतीय क्रमांक (विभागून)  



लोकशाहीत शासकीय यंत्राचे वापर | गैरवापर

 

        “लोकशाही" म्हटले की, लहानपणी नागरिकशास्त्रात शिकलेली लोकशाहीची पहिली व्याख्या आठवते.  " लोकांनी लोकांसाठी तयार केलेल शासन म्हणजे लोकशाही, ही पद्धत्त महत्त्व बहुसंख्येला अल्पसंख्येला देते. सरकार निवडून येणे हे लोकांच्या पदरात येऊन पडते ते म्हणजे लोकशाही मुळे. सरकार लोकांना चालवत नाही तर लोक चालवतात पाडतात देखील. जगात बहुधा सर्वच देश लोकशाही आहेत 'क्युबा', 'वियेतनाम' सारख्या देशांना वगळता. काही असेही देश आहेत जे स्वतःला लोकशाही म्हणतात. पण काम मात्र हुकुमशाही वाली करतात, याचे उत्तम उदाहरण चायना, रशिया आणि उत्तर कोरिया शिवाय कायच असू शकते. मग लोक  सरकार ला चालवतात अशी समज असली तरी वस्तुस्थिती प्रचंड भिन्न असते, ती कशी हे मी तुम्हाला पटवून देते.

 

        लोकशाहीचा 'ब्रम्हास्त्र' असतो 'निवडणूक' आणि तुम्हाला आणि मला देखील माहित आहे निवडणूक कशी होते. तुम्ही तुमच्या आवडीचे नेते निवडा असे म्हणून चायना सारख्या देशात निवडणूकीला तोच एकच पक्ष आणि त्याचा एकच माणूस दरवर्षी उभा राहतो आणि निवडून पण येतो. आता निवडणूकीतील 'पक्ष प्रचार' हा अतिशय गंमतीचा मुद्दा आहे. एक पक्ष बहुसंख्य गटाला पकडून बसते तर दुसरे अल्पसंख्येला आणि मग सुरू होते मारामार, शारिरीक नाही तर शाब्दिक, मग माणसांमाणसांमध्ये फुट पडते आणि ती नोकझोक पिढ्यान पिढ्या  चालते. आता हिंदू-मुस्लिम हा वादच बघाना, माणसाच्या काळजी असला विषयी हे पक्ष घेतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात. आणि जितका बुद्धीमान आहे तितकाच तो मूर्ख बालीश आहे. धर्म, पंथ, जात असे विषय आले की, वयाने माणूस मोठा असो अथवा लहान तो त्याची बौद्धिक पातळी तिथे बंदच पडते आणि त्यात तेल टाकतात ते म्हणजे त्या लोकशाहीतील पक्ष. मग एकतर हे कडू गोड नाते आयुष्य भर चालत राहते आणि मध्ये कधीतर रक्ताच्य आणि निमनुष्य झालेल्या माणसाचे ढीग लावते.

 

आता सर्वांच्या चर्चेतील आवढीचा विषय, 'भ्रष्टाचार' हे करणारे पण आतो लोकशाही पक्षच असतात. आता भ्रष्टचार फक्त लोकशाहीतच होते असे नाही. राजेशाही, हुकुमशाही यामध्ये पण भ्रष्टाचार होतोच की, मग लोकशाहीतील भ्रष्टाचारच लोकांना का खटकतो. त्याचं कारण अस असते की, राजेशाही अथवा हुकुमशाही मध्ये निर्णय घेणारा एकच असतो तर, जर तुम्हाला स्वतःचे काम करायचे आहे तर मग दया पैसे त्या एकालाच. पण लोकशाहीत तसे नसेत, ह्यात पॉवर' मध्ये असणोर लोकं बरेच आहेत. अगदी सरपंच  पासून ते पंतप्रधान पर्यंत, मग अश्यात लोकांना अनेक शासकीय यंत्रांना पैसे द्यावे लागतात, आणि ह्या आतल्या आतील का ळाबाजारीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.

 

        ह्यावेळी मी तुम्हाला शासकीय यंत्रनोनी पॉवर'चा केलेला खरा गैरवापर सांगते. ९/११ नंतर अमेरिकाने त्यांच्या नागरिकांच्या दुरध्वनीवर नजर ठेवली होती, औपचारिक भाषेमध्ये 'टॅक : तर सरकार अधिक विचित्र कायच असेल असे जर तुम्हाला वाटत तर थांबा अजून बरेच विचित्र होणार आहे. त्यांनी त्या गोष्टी नंतर अनेक मुस्लिम धर्माच्या लोकांना ताब्यात घेऊन प्रश्न विचारले. आता त्यात काही चुकीचे वाटत नाही पण चुक तेव्हा होते जेव्हा प्रश्न विचारण्या ऐवजी त्यांना शारिरीक ७ हानी देऊन त्यांच्याकडून ती माहिती काढून घेते होते जे त्यांना माहितच नाही आहे. आता आतंकवादी हमला करणारी मंडळी इस्लामची होती म्हणून प्रत्येक अमेरिकन मुस्लिमांचा गळा पकडणे किती योग्य / अयोग्य आहे, हे तर आपल्याला माहितच आहे. आता अमेरिकाच असा देश नाही आहे ज्यांनी स्वतःच्या नागरिकांकडे चोर दृष्टा पाहिले होते. चायना मध्ये सार्वजनिक ठिकाणी ( रस्ता, उदयाक, सिनेमा गृह .) जेवढे पण 'सिसिटिव्ही' आहेत त्यांच्या वर सरकारचे लक्ष असते. एक नागरिक काय करत आहे आणि काय नाय हे  सरकारत्या लगेच समजेते. तत्वज्ञांचे म्हणणे आहे की एका चायनिज नागरिक वर लक्ष ठेवण्यासाठी दहा कॅमेरा असतात, मग अश्या वेळी privacy आणि 'freedom' ही चार भिंतीच्या खोलीतच असते असे म्हणावे लागेल.

 

आता चायना आणि 'स्वतंत्राचा' विषय काढला आहे तर 'रशिया-उक्रेन चा उयुध्दाची मते अतिशय गंमतीची असतात. पण सरकारी कार्याबद्दल मत देणे हे तर घोर पापच असते मग की ते चायना मध्ये असो, अमेरिका का आपला भारत, 'पॉवर' असलेल्या पार्टीबद्दल तुमचे मत चांगलेच असले पाहिजे नाहीतर काय होते याच चित्र 'बॉलीवुड' दाखवतेच की, आपल्याला उत्तर कोरिया जो स्वत:ला लोकशाही म्हणतो, त्याची वस्तुस्थितीची भावन आपल्याला आहेच. माइकल जॅकसनचा नृत्य आणि बियोंसेच गाण मेकल तर तुम्हाला मृत्यूची शिक्षा होईल का, असे विचारले तर एकच उत्तर असणार, त्यांच्या हुकुमशाहाने हे हुकुम दिले आहे की अमेरिक कल्चर तिथे दिसलापण नाही पाहिजे. घराला आग लागली तर 'सुप्रिम लिडर्स' चे छायाचित्र पहिली बाहेर काढा, लोक माणूस मरतो आहे तर मरू दया. अशी ह्या लोकशाहीतील शासनाची प्रवृत्ती.

 

मग लोकशाही संपूर्ण निकामी असते असे नाही, लोकशाही धारण केलेली कित्येक देश आहेत ज्यांनी प्रगती केली आणि करत आहे. घोड्यांनी त्याच्या बांधलेली दोर स्वतःच तोंडात घेऊन चालणे माणूस घोडरावास फक्त बसण्याचे धोरण होते. पण आता ती दोर त्या घोडसवार पक्षाच्या हातात आहे आणि हे सरकार पक्ष लोकांना चालवत आहेत. म्हणून देशाची शासन पद्धत तेव्हा ठरते जेव्हा देशातील नागरिकांची स्थिती कळते. नागरिकांची स्थिती जर वाईटच आहे. दारिद्र, मारहाण, परातंत्र असे मग देश हुकुमाशाहीत असो का लोकशाहीत काय फरक जाणवेल.म्हणून लोकांनी आवाज उठवला पाहिजे, अन्याय तुमचा शेजारी करत असो वा सरकार, माणसानी झुकले नाही पाहिजे. माणसाला माणूस असल्या दर्जा मिळाचलाच पाहिजे, तेव्हाच तर लोकशाहीची व्याख्या वस्तुस्थितीत दिसेल, आणि आत्तापर्यंत तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल असे गृहित धरते.

 

लोकशाही हि सर्वोच्च आहे आणि ती म्हणजे नागरिकांमुळे" अज्ञात.