मराठा मंडळ मुलुंड, मुंबईच्या अधिकृत संकेत स्थळावर आपले स्वागत!

इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी!
मराठा मंडळाची गेल्या ४४ वर्षातील गरुड झेप पाहिली कि याची सत्यता दिसून येते.

सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुलुंड या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक भूक भागवण्यासाठी आणि मुलुंड या उपनगरात नवीन रहावयास आलेला परंतु विखुरालेला मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन एकत्रितपणे उपाय शोधण्यासाठी १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचा जन्म झाला. वाचा अधिक

श्री. रमेश र. शिर्के
(अध्यक्ष – मराठा मंडळ मुलुंड, मुंबई)

नमस्कार!

सभासद बंधू-भगिनींनो, गेल्या २७ ऑगस्ट २०२३ रोजी मंडळाच्या निवडणूकीद्वारे विद्यमान कार्यकारी मंडळ निवडून आले, तेव्हांपासून आजवर सुमारे वर्षभराच्या कालावधीत नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने व शुभाशिर्वादाने उत्तम प्रकारे कामकाज चालविले आहे. एखादी संस्था किंवा संघटना मोठी झाली, नावारुपास आली की तेथे वैचारिक वैचारिक अभिसरण सुरु होते.. कांही वेळा विचार व आचार भिन्नता जाणवू लागते. हा खरे तर काळाचा महिमाच म्हणावा लागेल. आपल्या मंडळाने आता ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या चौवेचाळीस वर्षांच्या सलग वाटचालीचा, आपणा सर्वांच्या विश्वासाचा मी एक साक्षीदार आहे. मंडळाची स्थापना ज्यांच्या संकल्पनेतून झाली ते आदरणीय कृ. बा. शिर्के हे आजही आम्हां सर्वांना शुभाशिर्वाद व सामाजिक ऊर्जा देण्यासाठी आपल्या मंडळाकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन आहेत. मंडळाचे पहिले अध्यक्ष ऋषीतुल्य कै. वसंतराव सकपाळ यांच्या बरोबरच कै. धनाजीराव कदम, कै. चंद्रकांत देसाई, कै. गोपाळराव भोसले, कै. भाई सावंत, कै. राजाराम महाडिक, कै. जयरामराव भोसले, कै. सुधाकर महाडिक व कै. आत्माराम शिर्के अशा सर्व दिवंगत बुजूर्ग समाज धुरिणांचा वैचारिक वारसा मला लाभला हे मी माझे परम भाग्य समजतो.

अधिक वाचा

 

आपल्या मंडळाचे गौरवशाली व
देखणे वास्तूशिल्प

हे वास्तू शिल्प मुंबईतील तमाम मराठा समाजाला अभिमान वाटावा असे आहे . सर्व उभारणी व मंडळाच्या गौरवशाली परंपरेमध्ये मंडळाच्या सर्व बंधु भगिनींचा , समाज बांधवांचा व हितचिंतक मित्रांचा सहयोग , या सर्वाच्या सक्रिय सहकार्यामुळेच मंडळाने ही गरुड झेप घेतली आहे. वाचा अधिक

  • तळ मजला अधिक वरचे तीन माजले अशी एकूण चार माजली इमारत
  • या इमारतीमध्ये एकूण सुमारे १५००० चौ. फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे.
  • आपल्या या प्रशस्त इमारती मध्ये प्रत्येकी सुमारे ५५० आसन क्षमतेची दोन सभागृहे.
  • मुलभूत सेवा -सुविधांनी युक्त असे दोन भोजन कक्ष.
  • सहा स्वतंत्र खोल्यांचे विध्यार्थी वसतिगृह.
  • विविध साहित्याकृतिनी संपन्न असे वाचनालय.
  • उत्तमप्रकारची कॅटरिंग व्यवस्था.
  • वधू -वर सूचक मंडळ
  • इमारतीच्या दर्शनी भिंतीवर चितारला आहे , मराठयांनचा भाग्यशाली व लडाऊ इतिहास.
  • इमारतीच्या दर्शनी भागी प्रवेश द्वारावर महाराष्ट्राचे क्षात्रतेज तुळजाभवानीचे अत्यंत देखणे मंदिर.
  • संपूर्ण इमारतीला मजबूत संरक्षक भिंत.
  • मुबलक पाणी पुरवठा, सदैव स्वच्छ असणारी प्रत्येक मजल्यावरील स्वच्छता गृहे.
  • उदवाहनची / लिफ्टची व्यवस्था.
  • संपूर्ण इमारतीच्या सभोवार पेव्हर ब्लोकचे फ्लोरिंग.
  • समारंभ – कार्यक्रम प्रसंगी उपयुक्त ठरणारा मोठ्या क्षमतेचा जनरेटर.

मान्यवरांच्या बोलक्या प्रतिक्रिया