मंडळाचा इतिहास
सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद सर्वांनी एकत्रित पणे उपभोगावा, मंडळाच्या कार्याचा प्रसार, प्रचार व सादरीकरण मोठ्या प्रमाणात व देखण्या स्वरूपात केला. मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारती समोरील रस्त्यावर भव्य सभा मंडप व तितकाच प्रशस्त रंगमंच उभारून उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात…Read More
सुमारे २५-३० वर्षांपासून मनाशी बाळगलेल्या संकल्पनेच्या पूर्णत्वाचा मंगल दिवस उजाडला तो मराठा मंडळाच्या एक मजली वास्तूच्या शुभारंभाचा! या सांस्कृतिक केंद्र इमारतीचा वास्तुशांती धार्मिक सोहळा व त्या निमिताने श्री सत्यनारायणाची महापूजा असा सभारंभ दिनांक १० मे २००६ रोजी मंडळाच्या वास्तूमध्ये आयोजित करण्यात आला होता.
मंडळाचे पहिले अध्यक्ष कै. वसंतराव सकपाळ यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेने यथोचित गौरव करून मंडळाच्या वास्तू जवळच्या चौकाचे कै. वसंतराव र. सकपाळ चौक असे नामकरण करण्यास मंजूरी दिली. त्यानुसार दि. २९ मे २००५ रोजी मुंबईचे महापौर मा. श्री. दत्ताजी दळवी यांच्या शुभहस्ते व स्थानिक नगरसेवक श्री. नंदकुमार आ.…Read More
इमारत बांधकाम निधी अभावी बंद पडू नये म्हणून निधी जमविण्याचे विविध मार्ग अवलंबिण्यात आले. त्यापैकी एक भाग्यवान देणगीदार योजना ! प्रतेकी १०० रु. दराने कुपन काडून त्यातील भाग्यवान विजेते ठरवण्यासाठी एक सोडत दि. ३१ ऑक्टोबर २००४ रोजी काढण्यात आली. या योजनेमधून सभासदांच्या उस्फुर्त सहभागामुळे खर्च व बक्षिसे जाउन ११ लाख…Read More
मंडळाच्या संकल्पित सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आराखडा वास्तुविशारद श्री. संजय आयरे यांनी महापालिकेकडे सादर केल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम सुरवात करण्यास परवानगी मिळाली. दि. ५ एप्रिल २००० रोजी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुप्रसिद्ध मा.श्री.बी .जी. शिर्के यांच्या शुभहस्ते व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात व अमाप उत्साहात साजरा करण्यात आला. या…Read More
मुलुंड मधील तमाम मराठा बंधु भगिनींनी इच्छा बाळगलेल्या एका सांस्कृतिक केंद्र इमारत बांधकाम संकल्पनेला सुरवात झाली. या वास्तूशिल्पाच्या उभारणीसाठी मंडळाने वेळोवेळी अनेक उपक्रम, कार्यक्रम व योजना आखल्या. निधीपुस्तके, सभासद वर्गणी, नाट्यप्रयोग, बक्षिश योजना, स्मरणिका जाहिराती, देणग्या, ठेवी , कर्ज उभारणी इ. विविध मार्गांनी निधी उभारण्याचे काम चालू केले. दिनांक २१…Read More
मंडळाने केलेल्या अथक प्रयत्नाना लाभलेले यश म्हणजे महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्तीसह मंडळाला मुलुंड पूर्व येथील केळकर महाविद्यालयाजवळ १५५०.७५ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाचा दिलेला भूखंड ! अडचणीचा व दलदलीचा हा भूखंड इ.स. १९८९ च्या अखेरीस मंडळाने ताब्यात घेऊन तो विकसित केला. त्यावर भरणी घालून सपाटीकरण करणे, कुंपण घालून तो…Read More
सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुलुंड या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक भूक भागवण्यासाठी आणि मुलुंड या उपनगरात नवीन रहावयास आलेला परंतु विखुरालेला मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या…Read More
