*निरोगी मुलुंड* २९/१२/२०१९
संपूर्ण मुलुंड आतुरतेने वाट पाहात असलेला *वैद्य अश्विन सावंत* यांच्या संकल्पनेतून साकारलेला, *मराठा मंडळ मुलुंड,मुंबई* आयोजित *निरोगी मुलुंड* या आरोग्यविषयक उपक्रमाचे आजचे हे 3रे पुष्प- *२१ व्या शतकातील जीवनशैलीचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. लोकांच्या रोजच्या दिनचर्येशी संबंधित या विषयावर मुलुंड मधील खालील नामांकित तज्ञानी आपले विचार मांडले.
*डॉ. राजीव कर्णिक* (हृदय रोग तज्ज्ञ)
*डॉ. प्रीतम काळसकर*(कर्करोग तज्ज्ञ)
*डॉ. मंजिरी मळेकर-ओक* (नेत्ररोग तज्ज्ञ)
*डॉ. तुषार म्हापणकर* (कर्ण रोग तज्ज्ञ)
*डॉ. मधुरा सहस्त्रबुद्धे* (त्वचा रोग तज्ज्ञ)
*वैद्य अश्विन सावंत* (आयुर्वेद तज्ज्ञ)
*डॉ. सुचेता सावंत*(आयुर्वेदीय स्त्री रोग चिकित्सक)
आजच्या २१व्या शतकात आपणच उभारलेले सिमेंट चे पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेल्या सुविधा, स्वैर जीवनशैली यांचा आपल्या इंद्रियांवर नेमका काय परिणाम होतो? , अत्याधुनिक सौंदर्य प्रसाधने वापरूनही आपली त्वचा व केस निरोगी का नाहीत?, आजच्या जीवनशैलीचे हृदय व रक्तदाबावर काय व कसे दुष्परिणाम होतात?, कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागे ह्याच सर्व बाबींचा कसा संबंध आहे ?, तरुण मुलींमध्ये वाढत चाललेल्या ‘पीसीओडी’ ची ही खरी कारणे हीच आहेत का?, आहारातल्या नेमक्या कोणत्या उणीवा आरोग्यास बाधक होत आहेत?, मोबाइल, कॉम्पुटर चा तिन्हीत्रिकाळ वापर याचा आपल्या डोळ्यांवर तसेच कानांवरही किती व कसा दुष्परिणाम होतो?, या सर्वांचा प्रतिबंध कसा करायचा, कोणता आहार कसा घ्यायचा या व अशा अनेक गोष्टीबद्दल प्रत्यक्ष तज्ज्ञांकडून जाणून घेता आले.
उत्तम गुणवत्तेच्या आणि उच्च विद्या विभूषित डॉक्टरांचे विचार एकाच व्यासपीठावरून ऐकण्याची सुवर्णसंधी आज आम्हा मुलुंडकरांना मिळाली. याबद्दल *मराठा मंडळ मुलुंड,मुंबई* व *वैद्य अश्विन सावंत-डॉ सुचेता सावंत* यांचे आभार!!
असेच उत्तमोत्तम आरोग्यविषयक परिसंवाद यापुढेही आम्हा मुलुंडकरांना ऐकायला-पहायला मिळतील अशी मनापासून शुभेच्छा!!