४५ वा वर्धापनदिन सोहळा मराठा मंडळ मुलुंड, मुंबई,

कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्थापना झालेले आपले मराठा मंडळ ४५ वर्षांचे झाले.
४५ वा वर्धापनदिन साकारताना…मंडळाच्या स्थापनेपासून ते आजवरचा या जगन्नाथाच्या रथाचा आतापर्यंतचा यशस्वी कार्यकाळाचा आढावा घेत पुढील उज्वल भवितव्याचा सकारात्मक दृष्टिकोन  सर्वांसमोर *अध्यक्ष  मा.श्री. रमेश शिर्केकाका*  आणि *कार्याध्यक्ष मा.श्री. महेशजी चव्हाण यांनी मांडला.* मंडळाचे *सरचिटणीस मा.श्री. अजयजी खामकर* यांनी उत्तम प्रास्ताविक केले.
 
 
मंडळासाठी आजपर्यंत चांदनाप्रमाणे झीजून ज्योतीप्रमाणे उजळलेले, सर्वांना ऋषितुल्य, सर्वांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवून मार्गदर्शन करणारे,मंडळाला अधिक क्रियाशील बनवणारे  मा.श्री. कृ.बा.शिर्के काका आणि मा. श्री.अरविंद राणे काका यांचा व्यासपीठावरील सन्मान तसेच मंडळासाठी बहुमूल्य योगदान देणारे, मंडळाच्या आर्थिक अडचणीत वेळोवेळी सहकार्य करणारे श्री लक्ष्मी केटरर्स चे मा.श्री.चंद्रशेखर चाळके व सौ.शामल चाळके, मंडळासाठी योगदान देणारे श्री.यशवंतराव काका यांचा सन्मान हा या वर्धापनदिन सोहळ्याचा परमोच्च आनंदाचा भाग होता.
मंडळाचे कर्मचारी श्री.परब मामा व श्री.राजेश दुर्वे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचाही सन्मान कौतुकास्पद.
या सोहळ्यातील,कलामंच प्रस्तुत…*हे सुरांनो चंद्र व्हा…* हा करमणुकीचा कार्यक्रम श्री.हेमंत भोगले यांनी साकार केलेल्या चांद्रयान उड्डाणाच्या देखण्या चलतचित्राच्या देखाव्याने सुरू झाला.
 
सूत्रसंचालिका सौ.सोनाली सावंत,सौ.शुभदा म्हामुणकर यांचे सूत्रसंचालन अतिशय रसाळ, लालित्यपूर्ण!! आपल्या आयुष्यातील चंद्राचे स्थान हळुवारपणे उलगडत सर्व गाणी आणि नृत्य यांना छान माळेत गुंफले. 
या संपूर्ण कलाविष्काराला रसिकांनी उत्स्फुर्तपणे डोक्यावर घेतले.. नेहमीप्रमाणे हाही सोहळा मोठ्या उत्साहाचा, रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा, प्रसन्न हास्यात डुंबवुन ठेवणारा ठरला..
 
सांस्कृतिक विभाग प्रमुख *सौ. रश्मी राणे* यांचे कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन लाभते. सांस्कृतीक विभागातील त्यांच्या आजवरच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री.उदय दरेकर यांचे उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. सौ.करुणा सावंत यांच्या  सुरुवातीच्या आखणी पासून ते कार्यक्रम सादर होईपर्यंतच्या धडपडीला, मेहनतीला मनापासून सलाम.
नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या, प्रत्येक कामात स्वतः जातीने सहभाग घेणाऱ्या *श्री. अजयजी खामकर* यांच्या मार्गदर्शनात रंगमंचावर केलेली  सजावट खूप नयनरम्य होती. या कार्यामध्ये श्री.विजय-श्रद्धा सुर्वे, उदय दरेकर, करुणा सावंत या मंडळींनी हातभार लावला.
 . 
कु.अदिती चव्हाण हिने सर्व ट्रॅक्स चे संकलन करण्यास खूप मदत केली. दृष्टी आर्ट्स च्या कृत्तिक शिंदे,कुणाल शिंदे यांचेही या कामात मोलाचे सहकार्य लाभले. कलाकारांच्या ऑडिशन साठी श्री.महेंद्र मोहिते सर यांनी काम पाहिले. महिला कलाकार, घरचे सर्व करून…मंडळातील नवरात्री उत्सवात सहभागी होऊन… तर काहीजण ऑफिस मधून येऊन, छोटे कलाकार आपले शाळा, क्लासेस  सांभाळून या कार्यक्रमाच्या  रात्री उशिरापर्यंत प्रॅक्टिस करत होते. अशा प्रकारे मंडळाच्या कलामंचाने एकजुटीने,एकोप्याने वर्धापन दिन सोहळा आनंदमय केला.
.
सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ आम्हा सर्व कलाकारांना सुंदर रंगमंच देऊन, प्रत्येक कार्यक्रमात कौतुकाची थाप पाठीवर देत गौरवांकीत करतात. सर्व समिती सदस्यांचे सहकार्य असते. 
.
सहभागी झालेल्या आपल्या सर्व गायक आणि नृत्य कलाकारांचे खूपखूप अभिनंदन!! *
शब्दांकन : सौ. ऐश्वर्या ब्रीद