रविवार दि.०६ मार्च २०२२ रोजी मंडळाचे ४२वे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरे झाले. गेल्या २ वर्षांच्या खडतर कालावधीनंतर आपण पुन्हा एकदा नवी झेप घेत आहोत.
.
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई च्या कलमंच ने सादर केलेला “कोकण दडलंय…मनांत” हा अभिनय,गायन,नृत्य यांनी सजलेला कार्यक्रम अतिशय झोकात साजरा झाला. गेल्या अनेक दिवसांची सर्व कलाकारांची मेहनत दिसून येत होती. सिनीअर मैत्रिणींचा यातील सहभाग अत्यंत कौतुकास्पद आणि भाव खाऊन गेला. श्री.उदय दरेकर यांची कमी वेळेची(अवघी ४० मिनिटे) सर्वसमावेशक संकल्पना-बांधणी आणि त्यातून दिलेला तरुण पिढीबद्दल चा सकारात्मक संदेश आणि दिग्दर्शन निव्वळ अभिमानस्पद!! सर्व कलाकारांच्या भूमिका,गायन,नृत्य सर्व काही केवळ लाजबाब!!!
.
रंगमंचावर तर खरोखरच कोकण अवतरले होते. तसेच गुणवंत गौरव सोहळ्यासाठी चेही नेपथ्य अप्रतिम साकारले होते. सजावटीसाठी आपली प्रतिभा आणि कौशल्य पणाला लावणारे श्री हेमंतजी भोगले आणि त्यांना दिवस रात्र सहकार्य करणारे श्री. उदय दरेकर सर, श्री.विजय सुर्वे दांपत्य आणि इतर सर्व सहकारी यांना सलाम प्रचंड मेहनत, संयम याची पराकाष्ठा दिसून येत होती.
श्री निलेशजी सुर्वे यांचे साऊंड,गायन,अभिनय…सर्वच स्तरावरील सहभाग आणि समन्वय भारी…!
.
सर्वच लहान-मोठ्या कलाकारांची अदाकारी भन्नाट. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. संतोष सावंत यांचे आभारप्रदर्शन नेहमीप्रमाणेच लाजवाब. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळातील काही नवीन गुणवंत कलाकारांचा शोध लागला.
मराठा मंडळ नेहमीच आपल्या सभासद कलाकारांना संधी देत असते. आम्ही या संधीचे सोने करण्याचा नेहमीच प्रयत्न करू.
.
गुणगौरव सोहळा अप्रतिम साजरा झाला. दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे वक्तव्य विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरित असे होते. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालिका सौ.सोनाली सावंत,सौ.शुभदा म्हामूनकर आणि सौ.विद्या सुर्वे यांचे निवेदन उत्तमच!! अध्यक्ष श्री रमेश शिर्के काका आणि कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे मनोगत आमच्यासाठी प्रेरणादायी होते. सर्व गुणवंतांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
.
सर्वांचे अभिनंदन अध्यक्ष श्री. शिर्के काका यांचे मार्गदर्शन , सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचे प्रोत्साहन, सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य, सांस्कृतिक प्रमुख सौ.रश्मी राणे यांचे योग्य नियोजन, सर्व समिती उत्साही कार्यकर्ते, उत्साही आणि प्रामाणिक सेवक वर्ग, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य यांमुळेच कार्यक्रम बहारदार झाला.