साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंती

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २० नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री. राजदत्त हे उपस्थित होते त्यानी आचार्य अत्रे यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान या विषयावर आपले विचार मांडले.