वधू वर सूचक व्यवस्था
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
मराठा समाजातील उपवर -वधू – वरांचे विवाह जुळविण्याकरिता सहाय्यभूत व्हावे म्हणून गेली १४/१५ वर्षे कार्यरत असलेला वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे फार मोठे सामाजिक कार्य मंडळाने अविरत चालू ठेवले आहे. या वर्षामध्ये एहुन ३८१ विवाहनुरूप तरुण तरुणींची नावे नोंदवण्यात आली आहेत. एवढ्यामोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंडळाचा हा उपक्रम किंवा वधू वर सूचक व्यवस्था किती आवश्यक आहे याची साक्ष पटते.
हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी मंडळाची वधू वर सूचक समिती उत्तम प्रकारे काम करीत आहे. विशेषता महिला सदस्यानचा फारमोठा व उस्फुर्त सहभाग नेहमीच लाभत आहे. मंडळाच्या या वधू वर सूचक व्यवस्थेचे कामकाज दर शनिवारी संद्याकाळी ५.०० ते ७.०० व रविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळात चालू असते. शनिवारचे व्यवस्थापन आमच्या माहिला सदस्या तर रविवारचे व्यवस्थापन पुरुष वर्गाकडून केले जाते.