“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस पहिला   

 “महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सव” 

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.

⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳

प्रतिपदेचा पहिला दिवस गुरुवारी येतो, म्हणून त्या दिवसाचा रंग पिवळा असतो. शारदीय नवरात्रीचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी, आज मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या आपल्या संस्थेमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे

पहिला दिवस: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुरी म्हणजे पर्वत कन्या. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.

पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात अशा प्रकारे करणे हे फारच विलक्षण आहे.  

आजची साडी : सौ. करूणा सावंत यांच्या सौजन्याने

देवीचे मनमोहक रूप दाखवणारी आजच्या दिवसाची रांगोळी काढली आहे सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी.