मराठा मंडळ मोफत आरोग्य शिबिर आयोजन मे २०२२

मराठा मंडळ मोफत आरोग्य शिबिर आयोजन मे २०२२

मंडळाच्या आरोग्य विभाग व जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या माध्यमातून फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्याने, मराठा मंडळाच्या सभागृहात शनिवारी ७ मे २०२२, सकाळी १००० वाजल्या पासून, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुलुंडमधील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत हजेरी लावली.

मुलुंड मधील या लोकाभिमुख संस्थेने आजवर विविध सामाजिक उपक्रमाद्वारे केवळ आपल्या सभासंदांपुरते मर्यदित न ठेवता मुंबई आणि मुंबई बाहेरील हजारो लोकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा ह्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत

फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टर गावडे आणि जनसंपर्क अधिकारी श्री. जसीम खान तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांनी फारच चांगले काम केलें. 

या शिबिराच्या आयोजनासाठी सकाळपासून कार्यकर्ते व महिला वर्ग स्वयंसेवकाच्या भुमीकेतुन वावरत होते.

शिबिराच्या शिस्तबद्ध व देखण्या आयोजनामध्ये महिला कार्यकर्त्याचा उस्फुर्त सहभाग होता.

विविध समित्यांच्या सदस्यांनी आयोजनात सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. 

मराठा मंडळाच्या जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांसोबतच जेष्ठ पत्रकार श्री सुकृत खांडेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, समाजसेवक कैलास पाटील, माजी नगरसेवक नंदू वैती इ . नी या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री रमेशराव शिर्के यांच्या नेतृत्वाखाली, श्री महेश चव्हाण, श्री अजय खामकर, श्री.रमेश शिंदे, श्री अरुण चव्हाण, श्री सुदाम म्हामुणकर, श्री राजन भोसले, श्री. शिवाजी सावंत, श्री. प्रमोद देसाई, श्री. दिगंबर राणे, श्री. ज्ञानेश्वर भालेराव, श्री. संतोष सावंत, श्री. अजय माने,श्री. नंदकुमार माने, श्री. सदानंद दळवी, सौ. माधुरीताई तळेकर, सौ. ऐश्वर्या ब्रीद, सौ. सोनाली सावंत आणि सौ. रश्मीताई राणे, या व अशा अनेक नवतरुण कार्यकर्त्यांची टीम अगदी जोमाने विविध उपक्रम राबवत असते.

 

 

 

कोविडचा काळ असो किंवा महापुराचे संकट मराठा मंडळ नेहमीच पाय रोवून उभे असते, समाजाच्या मदतीसाठी……..!