मराठा मंडळ मुलुंड, शिवजयंती उत्सव

शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी,२०२१

मराठा मंडळ मुलुंड या आपल्या संस्थेमधे, शिवजयंती उत्सव कार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम झाला. प्रमुख पाहुणे व्यख्याते, डॉ. संतोष हरिभाऊ थीटे यांच्या व्याख्यानातुन शिवरायांवरील अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण असे ओघवत्या विवेचनातून, शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची उत्तम माहिती मिळाली. संपूर्ण व्याखान केवळ अप्रतिम…!

शिवरायांबद्दल नेहमीच आपण त्यांचे पराक्रम, लढाया इ.बाबत ऐकत असतो. पण आजच्या वक्त्यांनी, आपल्याला गरीब शेतकऱ्याबद्दल शिवरायांना असलेली जाणीव,प्रेम आणि त्याच्यासाठी राबविलेल्या योजना याबद्दल माहिती दिली. जगाने जे केले ते शिवरायांनी कधीच केले नाही. पण शिवरायांनी जे केले ते जगाला कधीच जमले नाही. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी मन,मेंदू आणि मनगट सशक्त असावे लागते. आणि जो असा आहे तोच सामाजिक परिवर्तन करू शकतो. या आणि अशा अनेक वक्तव्यांनी संपूर्ण सभागृहातील जागृत,अभ्यासू श्रोते भारावून गेले होते.

“मंडळाचे वय ४३ असले तरी ते अजूनही १८ वर्षाचे आहे असे वाटले. येथील वरिष्ठांकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली ” अशा उद्गारांनी त्यांनी मराठा मंडळाप्रति आदर व्यक्त केला.

मराठा मंडळ मुलुंड, शिवजयंती उत्सव कार्यक्रमाची काही क्षणचित्रे ……!