मराठा मंडळ मुलुंड,मुंबई – महीला आघाडी आयोजित पाककला स्पर्धा उपक्रम खूप छान पार पडला. या स्पर्धेसाठी करण्यात आलेले नियोजन अतिशय उत्तम होते. मंडळाची प्रशस्त जागा त्यामुळे टेबलांची सुंदर मांडणी केली होती. सर्वांना व्यवस्थित व प्रशस्त टेबल मिळाला तसेच प्रत्येक टेबलावर प्लेट,चमचा व टिश्यू मांडलेले होते. हाॅलमधे आल्यावरच एकदम प्रसन्न वाटले.
.
.
आयोजन आणि नियोजन अर्थातच नेहमीप्रमाणे मंडळाच्या परंपरेनुसार अत्यंत रेखीव आणि अर्थातच शिस्तबध्द. सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा खूप छान एन्जॉय केली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आणि नंतर अर्थातच पदार्थ हौसेने चाखण्यासाठी आलेल्या खवय्या मैत्रिणींची उपस्थिती खऱ्या अर्थाने मनाला आनंद देणारी होती.
.
सौ.सोनालीचे सावंतचे सूत्रसंचालन, प्रमुख सौ.माधुरी तळेकर व मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे मनोगत,सौ. करुणा सावंत यांचे आभारप्रदर्शन उत्तम!
.
स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध शेफ श्री. पराग जोगळेकर यांचे उत्तम परीक्षण आणि मार्गदर्शन खूप भावले. प्रत्येक पदार्थ चाखून पाहणे. त्याची पौष्टिकता तपासणे,त्याबद्दल प्रश्न विचारणे,सजावट निरखणे इ.गोष्टींचे परीक्षण अत्यंत शांतपणे परंतु शिस्तबध्द पद्धतीने, ते आणि
त्यांची कन्या हसतखेळत करत होते.
.
करुणा आणि सोनल यांनी घातलेली,कार्यक्रमाला साजेशी रांगोळी आणि श्री.हेमंतजी भोगले यांची रंगमंचावरील सजावट सर्वच खूप सुंदर!!
मा.अध्यक्ष श्री. शिर्के काका यांची अनुपस्थिती जाणवली. तरी त्यांचे डोक्यावर असलेले आशीर्वाद आणि सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ सहकारी आणि मंडळाच्या सल्लागार सौ.चित्रा धुरी, सौ.माधुरी तळेकर आणि सौ. रश्मी राणे या माझ्या दोन्ही प्रमुख व निमंत्रक सौ.मनीषा साळवी तसेच सर्व मैत्रिणी आणि हितचिंतक यांचे प्रोत्साहन सतत मिळत असते.
.
स्पर्धकांना सर्व सोयी मिळाल्या. महिला आघाडीच्या प्रमुख सौ.माधुरीताई तळेकर व त्यांच्या सहकारी टिमला खूप खूप धन्यवाद!! मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्याचे पण आभार.तसेच सर्व स्पर्धक मैत्रिणी व पाककला स्पर्धेला भेट देवून बनवलेल्या पदार्थांची चव चाखून दाद देणार्या सर्व खवय्यांचेही मनपूर्वक धन्यवाद!! आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
पुरुक्रमा …………..! सुरतालाची संस्मरणीय परीक्रमा हा सुंदर कार्यक्रम आपल्या मराठा मंडळात होणार आहे.
नेमकं हा कार्यक्रम काय आहे ?
लेखक दिग्दर्शक संगीतकार नेपथ्य-वेशभूषाकार आणि चित्रकार पुरुषोत्तम बेर्डे, म्हणजे खऱ्या अर्थाने सबकुछ पुरुषोत्तम बेर्डे. गेली ५० वर्षे मराठी नाट्यसृष्टीत आपल्या बहुरंगी बहुढंगी कलाकृती सादर करणारे तसेच त्यानंतर तिसेक वर्षे चित्रपट सृष्टीत ‘हमाल दे धमाल ‘ते अलिकडचा ‘निशाणी डावा अंगठा’ सारखा सहज सुंदर आणि वास्तववादी विडंबनात्मक चित्रपटांपर्यंत मराठी रसिकाना दर्जेदार मनोरंजन देणारे पुरुषोत्तम बेर्डे आता तितकाच आगळा वेगळा दृकश्राव्य कार्यक्रम आपल्या मंडळात घेउन येत आहेत.
या कार्यक्रमात ते आपली नाटयचित्रपटीय कलासफर आणि सर्जनशील अनुभवांचे विविध तालवादयांच्या आणि संगीतमय चित्रफितींच्या आधारे
बहुआयमी कलावंत हा नेहमी जुन्या नव्याचा शोध घेत असतो, नाटक लिहावे। कि सिनेमा करावा या विचारात असतानाच तो जेव्हा स्वतः चे कलाविश्व
नाटयरुपात सादर करायचे ठरवतो तेव्हा पुरुषोत्तम बेर्डे च्या नव्याने आलेल्या ‘पुरुक्रमा ‘सारखी एकपात्री दृकश्राव्य कलाकृती निर्माण होते.’
या अशा अनेकविध प्रतिक्रियानी नटलेली हि ‘ पुरुक्रमा’ हा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरेल यात शंका नाही. नक्की उपस्थित रहा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या.