मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन – कोजागिरी पौर्णिमा – आनंद सोहळा

आपल्या मंडळाची स्थापना इ.स.१९७८ साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यानुसार या दिवशी मंडळाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता तळमजला कार्यकारिणी सभादालन येथे मंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री. अरण विठ्ठल चव्हाण व सौ. अश्विनी अरण चव्हाण या दांपत्याच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंडळाच्या वतीने चालविण्यात येणारे सरस्वती वाचनालय तळमजल्यावरील वातानुकूलीत प्रशस्त जागेत पुर्नस्थापन करुन मंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्याच बरोबर मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या मंडळाची कार्यकारिणी, सल्लागार मंडळ व विविध समित्यांच्या नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. संध्याकाळी ५.३० वाजता फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट निर्मित “आनंदरंग” या श्रवणीय गाण्यांचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला.