- November 7, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments
मंडळी नमस्कार….!
.
दीपावली पाडव्याच्या मंगल शुभदिनी आपल्या मराठा मंडळात साजरी झालेली रम्य दिवाळी पहाट खरोखरच अविस्मरणीय आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी अशीच होती. धनश्री देशपांडे आणि जयदीप बगवाडकर गायकांनी त्यांच्या सुरांनी मैफिलीत रंग भरले आणि मराठा मंडळींच्या रसिक प्रेक्षकांना गाण्याची मेजवानी दिली. आजच्या कार्यक्रमात भक्ती संगीत भावगीत कोळी गीत, लावणी अशी गाण्याची रेलचेल होती, तर निवेदक मंदार खराडे आपल्या शब्दांना रसिकांच्या भावनेने जोडत त्यांच्या मनाचा ठाव घेतला.
.
करोनाच्या काळात असामान्य कार्य करणाऱ्या, नवघर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ. वैशाली सरवदे आणि डॉक्टर कुशल सावंत या सेवाव्रतींचा प्रातिनिधिक स्वरूपात मराठा मंडळाने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
.
खूप छान रसिक प्रेक्षक…प्रत्येक गाण्याला …प्रत्येक शब्दाला दाद … आणि भरभरून टाळ्या …आज हाच आमचा फराळ होता….!
.
या प़संगी आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या प़वेशद्वारापासून करण्यात आलेली नयनरम्य सजावट, देखण्या रांगोळ्या, दिव्यांची प़काशमान आरास आणि सर्वांवर कळस ठरणारे रंगमंचावरील कल्पक नेपथ्य अगदी नजरेत भरणारे होते. या सर्वच नेत्रदीपक अशा आविष्कारा साठी अनेकांचे श्रम, प़यत्न आणि समर्पणाची भावना दिसून आली. कार्यकर्त्याना, कलाकारांना उत्तेजन, मोकळेपणा आणि त्यांच्यावर विश्वास टाकला तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्मरणीय दिवाळी पहाट!
.
या एकूण आयोजनामध्ये अनेकांचा सहभाग, सहयोग, सहकार्य लाभले त्या सर्वांचाच नामोल्लेख करणे शक्य नसले तरी प़तीवर्षी
आत्मियतेने, आपुलकीने, श्रद्धेने, निष्ठेने आणि प़चंड श्रमाने देखणी रोषणाई, सजावट साकारणारे श्री. आत्माराम तथा पप्या मोरे
याना धन्यवाद देऊन त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!!
.
रंगमंचावरील चित्ताकर्षक व अत्यंत कल्पक नेपथ्य उभारणारे सर्वश्री उदय दरेकर, निलेश सुर्वे, हेमंत भोगले, अजय माने,प़साद साळवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या कल्पना शक्तीचा मनापासून गौरव!! इमारती मध्ये प़वेश करतांच नजरेत भरण्या सारख्या विविध रंगांची उधळण करणार्या नयनरम्य रांगोळ्या पहाताना प़ेक्षक खिळून जात होते. ही सर्व कलाकारी सादर करण्यासाठी प़चंड श्रम करणार्या आमच्या महिला कलाकार ऐश्वर्या ब्रीद, सोनल सावंत, करूणा सावंत, प़ाजक्ता चव्हाण, परी सावंत, मनिषा साळवी आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनी या सर्वांचे भरभरुन कौतुक!!
.
या सर्व देखण्या आयोजनामध्ये सहभागी झालेले कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ मार्गदर्शक, विविध समित्यांचे प़मुख, निमंत्रक, सदस्य या सर्वांबरोबरच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, कर्तव्य सांभाळून मेहनत घेतलेल्या सांस्कृतिक समिती प़मुख सौ. रश्मी तथा आशाताई राणे, सौ. माधुरी तळेकर, ऐश्वर्या ब्रीद, आमच्या विद्यमान सल्लागार सौ. चित्रताई धुरी यांचे सक्षम नेतृत्व, मार्गदर्शन या बद्दल खरोखरच त्यांचे तसेच या नेत्रदीपक सोहळ्याच्या आयोजनामध्ये सहकार्य लाभलेल्या सर्व मान्यवरांचे
.
मन:पूर्वक अभिनंदन! त्यांचे मनापासून कौतुक, धन्यवाद व त्यांचे मनोभावे आभार सुद्धा! निरपेक्ष भावनेने व जाज्वल्य निष्ठेने, समर्पित होणारे कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि कलावंत हीच आपल्या मंडळाची फार मोठी श्रीमंती आहे.
.
स्वरतरंग …..अप्रतिम सुरेल कार्यक्रम …यावर्षीची दिवाळी पहाट कायम स्मरणात राहील अशी!!!
.