- February 25, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments
मराठा मंडळाची कौटुंबिक सहल रविवार दि.१८ फेब्रु.२०२४ रोजी सकाळी ७.०० वा.मराठा मंडळाच्या कार्यालया येथून निघाली माननिय मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण व मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर आणि उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण तसेच यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदाने एकूण तीन बस आजी आजोबांचे गाव मु.वाघोटे(मनोर),ता.वाडा,जि.पा लघर येथे पोहचल्या नंतर दिवसभरात खूप मौज,मजा केली तसेच सहलीचे स्पर्धा आयोजक एैश्र्वर्या ब्रिद,करुणा सावंत,श्रध्दा सुर्वे ,प्रणीला पवार,गौरी चव्हाण यांनी उत्यम रित्या विविध स्पर्धां घेतल्या या स्पर्धे मध्ये मंडळाचे सभासद,आपले कुटुंबीय तसेच जवळचे नातेवाईक सहभाग यांनी सहभाग घेतला व आनंदाने स्पर्धेची मज्जा घेतली.सांगता समारंभ करते वेळी ,उपाध्यक्ष अरुण चव्हाण,कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण सरचिटणीस श्री.अजय खामकर,मंडळाचे सल्लागार सौ.चित्रा धुरी,सहल प्रमुख सौ.माधुरी तळेकर व श्री राजन भोसले हे व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रथम सरचिटणीस श्री.अजय खामकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश शिर्के आपल्या काही महत्वाच्या कामानिमित्त येऊ शकले नाहीत परंतू वेळो वेळी फोन वर चौकशी करुन त्यांनी लक्ष ठेवले आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण यांच्या हस्ते रिसाॅर्टचे मालक श्री.निलेश हिंदूराव व योगेशशेट यांचा सन्मान करण्यांत आला.
तसेच नेहमी प्रमाणे मंडळाचे सदस्य वय वर्षे ७५ च्या वरील वयाच्या सदस्याचा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सन्मान करण्यांत आला १) प्रथम श्री. गजानन कुलकर्णी, ८६ वय वर्षे २)सहदेव कदम ८३ वय वर्षे ,३) सुनिता खामकर ८२ वय वर्षे यांचा सत्कार चित्रा धुरी यांच्या हस्ते करण्यांत आला ४)भिकाजी कदम ८४ वय वर्षे ५)बाजीराव ताबोळे ८१ वय वर्षे ६)निलिमा चव्हाण ७७ वय वर्षे ७)मधुकर गो.सावंत ७५ वय वर्षे ८)विलास कुलकर्णी ७५ वय वर्षे त्यानंतर लहान मुलाचा सत्कार करण्यांत आला कु.अव्दैत सावंत आणि कु.अभीर अनिकेत चव्हाण आणि कु.विहांन पवार त्यानंतर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धेकांना पारितोषिक देण्यांत आले. रिसाॅर्टचे मालक श्री.योगेश शेट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी उपस्थित पाहूण्यांचे आणि सहल प्रमुख ,सहल समिती तसेच सहलीत सहभागी सदस्याचे सहल यशस्वी केल्या बद्दल मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर यांनी आभार व्यक्त केले. तसेच लक्ष्मी कॅटर्रसचे मालक सौ.व श्री.चंद्रशेखर चाळके यांनी सहल ठिकाणी उपस्थित राहून जे सहकार्य केले त्याबद्दलही त्यांचे आणि त्यांचे कर्मचारी वर्ग यांचे आभार मानले आणि सहल समारंभ संपल्याचे मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर यांनी जाहीर केले.