व्याख्यान : कांस्य थाळी फूट मसाज आणि फायदे + एक पाऊल आर्थिक श्रीमंतीकडे

व्याख्यान : एक पाऊल आर्थिक श्रीमंतीकडे + कांस्य थाळी फूट मसाज आणि फायदे 
.
अत्यंत आवश्यक, महत्वाचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात/व्यवहारात त्याचा फायदा होईल असे दोन कार्यक्रम “मराठा महिला मंडळ”  शुक्रवार,, दिनांक 3/12/2021″रोजी दोन्ही व्याख्यान कार्यक्रम छान पार पडले. संध्याकाळी ५.०० सभेला सुरूवात झाली सर्व सभासदांसाठी हा कार्यक्रम खुला ठेवण्यात आला होता. ९० सभासदांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. 
.
पहिले व्याख्यान : अर्थविषयक कार्यक्रम थोडक्यात रूपरेषा होती. नागरिकांना shares मधील गुंतवणुकीतील अनास्थेबद्दल  ‘निर्मित ग्रुप चे डायरेक्टर श्री नंदकिशोर हरम’ यांनी जागरूक केले. अतिशय सुंदरपणे शेअर्स मधील गुंतवणूक या बद्दल मार्गदर्शन केले. त्यांचे या विषयावरील online मार्गदर्शन शनिवार सायंकाळी ६ वा. आणि  रविवारी सायं.५ वा. प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाची लिंक त्यांच्याकडून आल्यावर ग्रुप वर दिली जाईल.
.
दुसरे व्याख्यान : कांस्य थाळी फूट मसाज खूप माहितीपूर्ण होता. कांस्यथाळीने मसाज केल्यामुळे कोणकोणते आरोग्यविषयक फायदे होतात याचे सुंदर विश्लेषण प्रा.सौ.मनीषा सुर्वे यांनी केले. फूट मसाजचे ३ जणांना प्रात्यक्षिकही दिले.
.
मराठा मंडळ सभासदांसाठी विशेष सवलतीत मसाजसाठी ४० जणांनी नाव नोंदणीही झाली.(रु.५०/- प्रतिदिन)
(१५ दिवसांसाठी शुल्क  रु.७५०/- आणि ५ दिवस extra. म्हणजे एकूण २० दिवस)(३० दिवसांसाठी रु.१५००/- आणि ११ दिवस extra म्हणजे ४१ दिवस)
.
खूप चांगल्या उपयुक्त  विषयांवर आयोजित आजचे दोन्ही कार्यक्रम छान झाले. मराठा मंडळ मुलुंड,मुंबई चे अध्यक्ष श्री.रमेशजी शिर्के, महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर यांचे मनोगत, सौ. सोनाली सावंत यांचे ओघवते सूत्रसंचालन आणि सौ. शुभदा महामुणकर यांचे आभार प्रदर्शन नेहमीप्रमाणे खूप छान झाले.
.
विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमात देणगी म्हणून शिक्षण फंडासाठी सौ. शैलजा नलावडे ताई यांनी २५०००/- चा चेक दिला, त्यांचे सर्वांनीच कौतुक केले.
.
मराठा मंडळाचे अध्यक्ष मा. रमेशजी शिर्के काका यांचे थोडकच पण मुद्देसुद मनोगत अतिशय सुंदर  झाले तसेच मंडळाचे सल्लागार संपूर्ण कार्यकारीणी सदस्य उपाध्यक्ष, पदाधिकारी  आणि वेगवेगळ्या समितीचे सदस्य ह्या सगळ्यांच्या उपस्थिती साठी आभार.
.
अशा प्रकारे पुढील काळात उपयुक्त आणि उत्तमोत्तम कार्यक्रम  देण्याचा आम्ही महिला आघाडी तर्फे प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन, महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरी तळेकर यांनी केले. 
.

पुढील अशाच छान छान,माहितीपूर्ण, उपयुक्त कार्यक्रमांसाठी महिला आघाडी समितीला खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!

.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
.
 
.
 
.
 
.
   
.