- October 12, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.
⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳
पाचवा दिवस: पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते.
स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. जेंव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे. आणि म्हणूनच पांढरा रंग आहे.
आजची साडी : सौ. सोनल योगेश सावंत यांच्या सौजन्याने
आजच्या दिवसाची सुबक आणि रेखीव रांगोळी काढली आहे सौ. शुभांगी बिपीनचंद्र विचारे आणि अरुणा प्रभाकर दळवी यांनी.