मराठा मंडळ मुलुंड मुंबई महिला आघाडीने शनिवार दि १२ मार्च रोजी,जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
.
यावेळी मराठा मंडळ मधील सभासद महिला तसेच मुलुंड मधील सर्व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सभागृह उत्साहाने भारून गेले होते.
.
या मेळाव्यास सुप्रसिद्ध सुसंवादीका, उत्तम व्याख्यात्या, निवेदिका धनश्रीताई लेले यांच्या निरक्षर स्त्रीचे काव्य- ओवी यावरील निरुपणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.काही क्षणी अनेक महिला भावनिक झाल्या होत्या. अतिशय सुमधुर वाणीने त्यांनी सर्व रसिकांची मने जिंकली.
.
.
.
.
यावेळी अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या अध्यक्षा वैशालीताई जोंधळे, सुवर्णाताई पवार आणि सौ. ज्योती इंदप यांचा सन्मान करण्यात आला.
.
.
.
तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या मुलुंडस्थित महिला मंडळांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
.
व्यासपीठाच्याखाली महिला दिन विषयाला अनुसरून उत्तम सजावट श्री. आत्माराम मोरे यांनी केली. यात भारत रत्न लता मंगेशकर आणी समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांना आदरांजली वाहिली होती.
.
.
.
.
महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरीताई तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली सावंत व सौ शुभदा म्हामूनकर यांनी खूप उत्तमरित्या केले. तसेच आभार प्रदर्शन सौ. मीनल सावंत यांनी केले. सौ.सोनाली सावंत यांनी धनश्रीताई लेले यांचे आभार मानताना त्यांच्याबद्दल खूप छान भावना व्यक्त केल्या.
.
या सोहळ्यासाठी रंगमंचावर विषयाला अनुसरून अशी देखणी सजावट श्री.हेमंत भोगले यांनी केली होती.त्यांना श्री उदय दरेकर आणि श्री.विजय सुर्वे यांचे सहकार्य लाभले होते.ध्वनी संयोजन श्री.निलेश सुर्वे यांचे होते.
.
.
प्रवेशद्वारी सौ.प्राजक्ता चव्हाण यांनी विषयाला अनुसरून सुंदर रेखीव रांगोळी घातली होती. फोटोग्राफी श्री.कुणाल शिंदे आणि खानपान व्यवस्था श्री लक्ष्मी कॅटेरर्स यांची होती.
.
.
या संपूर्ण सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के काका यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदाधिकारी-कार्यकारिणी सदस्य यांचा पाठींबा, सल्लागार सौ.चित्रा धुरी,सांस्कृतिक समिती प्रमुख सौ.रश्मी राणे, महिला आघाडी निमंत्रक सौ.मनीषा साळवी,सर्व उत्स्फूर्त कार्यकर्ते, सहकारी सेवक वर्ग,हितचिंतक यांच्यामुळे सोहळा दिमाखात पार पडला.
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – आम्ही उद्योगिनी-ग्राहक पेठ
*******************************************
.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने प्रथमच महिला उद्योजकांसाठी आम्ही उद्योगिनी या ग्राहकपेठेचे आयोजन केले होते. शनिवार दि.१२मार्च २०२२ रोजी सकाळी या ग्राहकपेठेचा उद्घाटन सोहळा खूप उत्साहाने पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन मराठा मंडळाच्या सभासद आणि उद्योजक सौ. मृणालिनी महेश चव्हाण आणि सौ.उज्वला साटम यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही उद्योजीकांनी स्टॉलधारकांना आणि मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना उद्योग निर्मितीबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले.
.
या ग्राहक पेठेत एकूण ६० स्टॉल्स लागले होते. शनिवार-रविवार अशा २ दिवसांच्या या ग्राहकपेठेस ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. खूप उत्साहाचे वातावरण होते. सर्वच्या सर्व स्टॉलधारकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
. .
.
पुढील वेळी लवकरात लवकर पुन्हा असा उपक्रम राबवावा अशा प्रकारची मागणी सर्व स्टॉल धारकांकडून अजूनही येत आहे. मराठा मंडळाने खूप उत्तमरित्या या ग्राहक पेठेचे दिमाखदार असे आयोजन आणि नियोजन केले असे कौतुक सर्वत्र होत आहे.
मंडळाने सर्व स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सर्वांचे अभिनंदन केले. पुढील वेळी अजून जोमाने नवीन ग्राहक पेठ भरवण्याचे वचन देऊन या ग्राहक पेठेची सांगता करण्यात आली.
.
या समारंभास ठाणे मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी सुर्वे साहेब, सरचिटणीस राजेंद्रजी साळवी सर आणि सुप्रसिद्ध फणी वादक, गायक आणि अभिनेते शशिकांत खानविलकर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे सरचिटणीस श्री अजयजी खामकर यांनी केले.
.
संपुर्ण सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के काका यांचे मार्गदर्शन लाभले. सरचिटणीस श्री अजयजी खामकर यांचा भक्कम पाठिंबा, सर्व पदाधिकारी-कार्यकारिणी सदस्य यांचे प्रोत्साहन, महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरी तळेकर,निमंत्रक सौ मनीषा साळवी, सल्लागार सौ.चित्रा धुरी, सांस्कृतिक प्रमुख सौ.रश्मी राणे,फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर श्री.कुणाल शिंदे,सर्व समिती महिला आणि पुरुष कार्यकर्ते,सेवक सहकारी यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Purukrama
मंडळी नमस्कार ……!
पुरुक्रमा …………..! सुरतालाची संस्मरणीय परीक्रमा हा सुंदर कार्यक्रम आपल्या मराठा मंडळात होणार आहे.
नेमकं हा कार्यक्रम काय आहे ?
लेखक दिग्दर्शक संगीतकार नेपथ्य-वेशभूषाकार आणि चित्रकार पुरुषोत्तम बेर्डे, म्हणजे खऱ्या अर्थाने सबकुछ पुरुषोत्तम बेर्डे. गेली ५० वर्षे मराठी नाट्यसृष्टीत आपल्या बहुरंगी बहुढंगी कलाकृती सादर करणारे तसेच त्यानंतर तिसेक वर्षे चित्रपट सृष्टीत ‘हमाल दे धमाल ‘ते अलिकडचा ‘निशाणी डावा अंगठा’ सारखा सहज सुंदर आणि वास्तववादी विडंबनात्मक चित्रपटांपर्यंत मराठी रसिकाना दर्जेदार मनोरंजन देणारे पुरुषोत्तम बेर्डे आता तितकाच आगळा वेगळा दृकश्राव्य कार्यक्रम आपल्या मंडळात घेउन येत आहेत.
या कार्यक्रमात ते आपली नाटयचित्रपटीय कलासफर आणि सर्जनशील अनुभवांचे विविध तालवादयांच्या आणि संगीतमय चित्रफितींच्या आधारे
बहुआयमी कलावंत हा नेहमी जुन्या नव्याचा शोध घेत असतो, नाटक लिहावे। कि सिनेमा करावा या विचारात असतानाच तो जेव्हा स्वतः चे कलाविश्व
नाटयरुपात सादर करायचे ठरवतो तेव्हा पुरुषोत्तम बेर्डे च्या नव्याने आलेल्या ‘पुरुक्रमा ‘सारखी एकपात्री दृकश्राव्य कलाकृती निर्माण होते.’
या अशा अनेकविध प्रतिक्रियानी नटलेली हि ‘ पुरुक्रमा’ हा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरेल यात शंका नाही. नक्की उपस्थित रहा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या.