- March 29, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मोफत दंत तपासणी शिबिर आणि अस्थिरोग, सांधेदुखी संबंधी मार्गदर्शन आयोजन मार्च २०२३
मंडळाच्या आरोग्य विभाग व जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या माध्यमातून रिया फाऊंडेशनच्या सहकार्याने, मराठा मंडळाच्या सभागृहात रविवारी २६ मार्च २०२३३, सकाळी १००० वाजल्या पासून, मोफत दंत तपासणी शिबिर आणि अस्थिरोग, सांधेदुखी संबंधी मार्गदर्शन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मुलुंडमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत हजेरी लावली.
मुलुंड मधील या लोकाभिमुख संस्थेने आजवर विविध सामाजिक उपक्रमाद्वारे केवळ आपल्या सभासंदांपुरते मर्यदित न ठेवता मुंबई आणि मुंबई बाहेरील हजारो लोकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा ह्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत
रिया फौंडसशनचे डॉक्टर भूपाल माने आणि डॉक्टर प्रताप कर्नाळकर तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांनी फारच चांगले काम केलें.
प्रोजेक्टर प्रेसेंटेशनच्या माध्यमातून दोन्ही डॉक्टरांनी सर्वाना चांगले मार्गदर्शन केले. आजार होऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेण्यासाठी सुचविले.
या शिबिराच्या आयोजनासाठी सकाळपासून कार्यकर्ते स्वयंसेवकाच्या भुमीकेतुन वावरत होते.
शिबिराच्या शिस्तबद्ध व देखण्या आयोजनामध्ये सर्व कार्यकर्त्याचा उस्फुर्त सहभाग होता.
विविध समित्यांच्या सदस्यांनी आयोजनात सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले.
मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री रमेशराव शिर्के यांच्या नेतृत्वाखाली, श्री महेश चव्हाण, श्री अजय खामकर, श्री.रमेश शिंदे, श्री अरुण चव्हाण, श्री सुदाम म्हामुणकर, श्री राजन भोसले, श्री. शिवाजी सावंत, श्री. प्रमोद देसाई, श्री. दिगंबर राणे, श्री. ज्ञानेश्वर भालेराव, श्री. संतोष सावंत, श्री. अजय माने, सौ. आशाताई राणे, श्री. नंदकुमार माने, श्री. शंकर दळवी, सौ. मनीषा साळवी या व अशा अनेक कार्यकर्त्यांची टीम अगदी जोमाने विविध उपक्रम राबवत असते.
कोविडचा काळ असो किंवा महापुराचे संकट मराठा मंडळ नेहमीच पाय रोवून उभे असते, समाजाच्या मदतीसाठी……..!