- February 20, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – शिवजयंती उत्सव, २०२३
मराठा मंडळ मुलुंड या संस्थेच्या वतीने,१९ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता शिवजयंती उत्सव कार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम साजरा झाला. संपूर्ण सभागृह शिवप्रेमींनी ओसंडून भरले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या परंपरेनुसार महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मंडळाचे सरचिटणीस श्री. अजयजी खामकर व्याख्याते श्री. राजेश देसाई यांची ओळख करून दिली.
मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशजी शिर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून आणि पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन शिवभक्त व्याख्याते (सर्जा आणि रायगड वीर पुरस्कार सन्मानित) श्री. राजेश देसाई यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. ऐश्वर्या ब्रीद आणि सौ. करुणा सावंत यांच्या आवाजातील मराठा मंडळाची आरती ऐकवण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या पहाडी आवाजात ललकारी सादर करत श्री हेमंत भोगले यांनी जय जय महाराष्ट माझा या राज्य गीताचे सादरीकरण सुंदर रित्या केले आणि छान वातावरणनिर्मिती झाली.
कार्यक्रमाचे वक्ते श्री. राजेश देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजासाठी जगायचं कस ते शिकवले आणि संभाजी महाराजांनी स्वराजासाठी मरायचय ते शिकवले असं सांगून अपरिचित स्वराजाच्या इतिहास यांच्यावरील ओघवते विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले.
सौ. करुणा सावंत आणि सौ. सोनल सावंत यांनी मंडळाच्या प्रवेशद्वारी घातलेली रांगोळी प्रसंगाला अनुरूप आणि तितकीच नयनरम्य होती.
ध्वनी व्यवस्था श्री निलेश सुर्वे यांनी चोख सांभाळली. कार्यकारणी सदस्य श्री. संतोष सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
मा. अध्यक्ष श्री.रमेशजी शिर्के आणि सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि पाठींबा तसेच कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती आणि सोबत सर्व समिती सदस्य यांनी केलेल्या उत्तम आयोजन आणि नियोजनामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाचा शिवजयंती उत्सव उत्तमरीत्या साजरा झाला.