रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी मराठा मंडळाचा ४४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात, आनंदात व प़चंड उपस्थितीत दिमाखात पार पडला.
.
मंडळाच्या प्रवेशद्वारी नयनरम्य रंगसंगती साधून सौ प्राजक्ता चव्हाण कार्यक्रमाला अनुसरून यांनी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष्य वेधत होती.
.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. धनंजय प्रकाश महाडिक, राज्य कर उपायुक्त, वस्तू आणि सेवाकर विभाग आणि श्री. प्रवीण मुळये, सहाय्यक संपादक, महाराष्ट्र टाइम्स लाभले होते. पालकांनी मुलांच्या कलेने घायला हवे, मुलांशी एक मित्र म्हणून संवाद साधायला हवं या विषयावर विस्तृतपणे मनोगत व्यक्त केले. हल्लीच पिढी फार हुशार आहे, पालकांनी जर मोबाइलचा मर्यादित प्रमाणावर वापर केला तर मुले सुद्धा त्यांचं अनुकरण करतील, हा या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.
.
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई सरस्वती वाचनालय वतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा ३ गटात झालेल्या (इ. ८ वी ते १० वी, इ. ११ ते महाविद्यालय, खुला गट नागरिकांसाठी ) पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा यावेळी करण्यात आला.
.
या सोहळ्यामध्ये सादर करण्यात आलेला ” टूर निघाली…… हा कार्यक्रम खरोखरच अप्रतिम! कार्यक्रमाची सुरवात सौ. सोनाली कदम दिग्दर्शित अंत्यत मंगलमय वातावरणात गणेश वंदनाने झाली.
या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व कलाकार, विशेषत: महिला वर्गाचा सहभाग आणि त्यांनी सादर केलेला नृत्य- नाट्य आणि संवादात्मक कार्यक्रम उत्तम!! रेट्रो नृत्या मध्ये जेष्ठ महिलांचा असलेला सहभाग, अभिनय खरंच वाखाणण्यासारखा होता. खूप छान प्रयत्न आणि सादरीकरण सुद्धां! रेट्रो नृत्याचे नृत्याचे दिग्दर्शन करतानाची मेहनत सौ ऐश्वर्या ब्रीद यांची दिसून येत होती.
यावेळी रंगमंचावर सादर झालेले कोळी नृत्य खरोखरच असलेल्या कलाकारांचे नृत्य वाटले. या नृत्यामध्ये सौ. सोनल सावंत आणि सौ. प़णाली पवार यांची अदाकारी अत्यंत लक्षवेधी होती. या नृत्याची दिग्दर्शिका सौ. ऐश्वर्या ब्रीद, सौ. प़णाली पवार यांचे खास अभिनंदन!
.
या सर्व रंगमंचीय सजावट आणि देखाव्यामध्ये श्री. कुणाल शिंदे यांची कलाकारी प़काश योजना, विद्युत रोषणाई फारच छान! विशेष म्हणजे श्री. राजेश सावंत यांनी गायलेल्या ” हिरवा निसर्ग ” या गाण्याच्या वेळी पडद्यावर साकारलेला हिरवा निसर्ग अप्रतिम!! लाजवाब! कुणाल शिंदे यांच्या कलेला, त्यांच्या परिश्रमाना मनापासून सलाम!! या कार्यक्रमाची संहिता लिहिणारे, दिग्दर्शक श्री. उदय दरेकर यांचे खास अभिनंदन!! कराओके ट्रॅकवर श्री. हेमंत भोगले , राजेश सावंत, डॉ. नेहा सावंत, ऋचा मोहिते या गायकांनी गायलेली गाणी नेहमीप्रमाणे अप्रतिम होती.
.
या एकूणच कार्यक्रमाचे, आयोजन, नियोजन, सादरीकरण या सर्व गोष्टींसाठी मेहनत करणारे, आपले अत्यंत बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांना मन: पूर्वक धन्यवाद! सांस्कृतिक समिती प़मुख सौ. रश्मी राणे, महिला आघाडी प़मुख सौ. माधुरी तळेकर त्यांचे सर्व सहकारी यांच्या अपार कष्टाचे फळ म्हणजेच कालचा अप़तिम कार्यक्रम!!
.
याबरोबरच स्टेज कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभ याचे उत्तम निवेदन, सूत्रसंचालन इ. सौ. शुभदा म्हामूणकर, सौ. सोनाली सावंत यांनी फारच उत्तमप्रकारे केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे सर्व ज्ञात – अज्ञात सहकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
.
दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे वक्तव्य विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरित असे होते. अध्यक्ष श्री रमेश शिर्के काका यांचे मनोगत प्रेरणादायी होते. सर्व गुणवंतांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
Purukrama
मंडळी नमस्कार ……!
पुरुक्रमा …………..! सुरतालाची संस्मरणीय परीक्रमा हा सुंदर कार्यक्रम आपल्या मराठा मंडळात होणार आहे.
नेमकं हा कार्यक्रम काय आहे ?
लेखक दिग्दर्शक संगीतकार नेपथ्य-वेशभूषाकार आणि चित्रकार पुरुषोत्तम बेर्डे, म्हणजे खऱ्या अर्थाने सबकुछ पुरुषोत्तम बेर्डे. गेली ५० वर्षे मराठी नाट्यसृष्टीत आपल्या बहुरंगी बहुढंगी कलाकृती सादर करणारे तसेच त्यानंतर तिसेक वर्षे चित्रपट सृष्टीत ‘हमाल दे धमाल ‘ते अलिकडचा ‘निशाणी डावा अंगठा’ सारखा सहज सुंदर आणि वास्तववादी विडंबनात्मक चित्रपटांपर्यंत मराठी रसिकाना दर्जेदार मनोरंजन देणारे पुरुषोत्तम बेर्डे आता तितकाच आगळा वेगळा दृकश्राव्य कार्यक्रम आपल्या मंडळात घेउन येत आहेत.
या कार्यक्रमात ते आपली नाटयचित्रपटीय कलासफर आणि सर्जनशील अनुभवांचे विविध तालवादयांच्या आणि संगीतमय चित्रफितींच्या आधारे
बहुआयमी कलावंत हा नेहमी जुन्या नव्याचा शोध घेत असतो, नाटक लिहावे। कि सिनेमा करावा या विचारात असतानाच तो जेव्हा स्वतः चे कलाविश्व
नाटयरुपात सादर करायचे ठरवतो तेव्हा पुरुषोत्तम बेर्डे च्या नव्याने आलेल्या ‘पुरुक्रमा ‘सारखी एकपात्री दृकश्राव्य कलाकृती निर्माण होते.’
या अशा अनेकविध प्रतिक्रियानी नटलेली हि ‘ पुरुक्रमा’ हा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरेल यात शंका नाही. नक्की उपस्थित रहा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या.