- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित वधुवर सूचक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील १३ वा वधुवर पालक परिचय मेळावा अतिशय मंगलमय वातावरणात सफल संपन्न झाला. नोंदणी केलेले वधुवर उमेदवार व पालक यांचा उत्फुर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला. सभागृहातील वातावरण अतिशय भारलेले असे होते.
वधुवर समितीच्या आणि नेहमीच पाठीशी उभे असणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या महिनाभराच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आज फळ मिळाले. मंडळाच्या प्रवेशद्वारापासून, कार्यालय, तळमजला सभागृह नोंदणी व्यवस्थे पासून ते पहिला मजला सभागृहातील प्रवेशद्वारातील व्यवस्था, व्यासपीठावरील सर्व व्यवस्था. सर्व काही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहात सुरू होते. मराठा मंडळाचे सर्व समिती उत्साही कार्यकर्ते, कोणतेही छोटे मोठे काम अगदी घरचे मंगल कार्य असल्यासारखे सर्व जण झोकुन देऊन करत होते.
मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेशजी शिर्के यांचे बहुमोल मार्गदर्शन, कार्यकारी मंडळाचा नेहमीच असलेला पाठिंबा हा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करत असतो. कार्यकर्त्यांनी श्रीमंत अशा आपल्या मंडळाचा अत्यंत मानाचा असलेला वधुवर पालक परिचय मेळावा मंडळाच्या नावाला साजेसा, दिमाखदार झाला. अध्यक्ष मा. रमेशजी शिर्के यांना अभिप्रेत असलेली मंडळाच्या कार्यकर्त्यांची श्रीमंती बघायला मिळाली.
सौ. सोनाली सावंत, सौ. शुभदा म्हामुणकर, सौ. विद्या सुर्वे यांचे सुत्रसंचालन उत्तम. प्रसंगाला अनुरूप अशी सुंदर रांगोळी काढून सौ. ऐश्वर्या ब्रीदने कार्यक्रमाला शोभा आणली. श्री. कृणाल शिंदे यांची LED screen ची व्यवस्था कार्यक्रमाची रंगत वाढवारी होती. मंडळाचे सहचिटणीस श्री. राजन भोसले यांनी सुयोग्य शब्दात सर्वांचे आभार प्रदर्शन केले.
मा. अध्यक्ष श्री. शिर्के साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली, मा. कार्यकारिणी सर्व सदस्य, सल्लागार, सर्व उपसमित्या, कार्यालयीन कर्मचारी यांच्या अप्रतिम सहयोगाने व जबरदस्त पाठिंब्याने मोठ्या दिमाखदारपणे संपन्न झाला. कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच पालक आणि उमेदवारांनी सर्व आयॊजनाचे कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच आपल्या अभिप्राय वहीत पालकांनी अभिप्राय नोंद केले.
संपूर्ण वधु वर समितीचे उत्तम आयोजन आणि इतर समिती सदस्यांनी दिलेली मोलाची साथ हेच या मेळाव्याच्या यशस्वीतेचे सार आहे. अनेक पालकांच्या बोलक्या प्रतिक्रियेत शिस्तबद्ध आणि नेटक्या नियोजनाबद्द्ल मराठा मंडळाचे आभार व्यक्त केले. मराठा मंडळात प्रवेश करण्यापासून ते शेवटी सर्व उमेदवारांची वधू आणि वर यांची यादी हातात मिळेपर्यंत सर्वच नियोजनबद्ध होते. सर्वांचे त्रिवार अभिनंदन.