मंगळागौर २०२२
.
मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळ्यांनी विविध खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. महिला आघाडीच्या सर्व कार्यकारीणीचे खूप खूप अभिनंदन. सर्व कार्यक्रमाची आखणी ऐश्वर्या , सोनल , सोनाली , करूणा यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली होती. त्यांचे खूप खूप कौतुक. सगळ्यांना आनंद घेता आला , हे विशेष.
.
सगळ्या महिलांची आपुलकींने विचारपूस करून सगळ्यांची मन जिंकली आहेस .मनीषाची पण उत्तम साथ मिळाली असून तिचे आणि महिला आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक.
.
8 वर्षानंतर खरं माहेरी गेले असं वाटलं, मी येणार असं कळल्यावर दारात उभी राहून वाट पाहणारी आई, गेल्यावर हातात जेवणाचं ताट देणारी आई आठवली, कार्यक्रम इतका सुरेख होता की आपण खेळावं की पाहावं कळत नव्हते.
.
आपला मंगळागौरीचा कार्यक्रम अप्रतिम झाला सगळ्या मैत्रिणींनी खेळांचा मनमुराद आनंद घेत ला प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता माधुरी ताईंनी स्वतः प्रत्येकीची जातीने चौकशी केली ते मनाला खूप भावले ऐश्वर्या ने खूप छान खेळ घेतले सगळ्या कमीटी मेंबर चे खूप आभार.
.
कालचा मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. विशेष म्हणजे मैत्री दिनाच्या दिवशी आपणां सर्व मैत्रीणींना एकत्र येण्याचा आनंद मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन,नाष्टा,रांगोळी,गाणी, फोटो व व्हिडिओ सर्वच छान होते. आम्ही सर्वांनी खूप एन्जाॅय केले. महिला आघाडीच्या सर्व टिमचे अभिनंदन व खूप खूप कौतुक.
.