दिवाळी पहाट २०२४

दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ६.३० वाजता आपल्या मराठा मंडळात स्वर तरंग प़स्तूत सादर झालेला *साथ सुरेल स्वरांची* हा कार्यक्रम  अप्रतिम होता ..  या कार्यक्रमातील सर्वच गायक, वादक, निवेदिका,ध्वनी संयोजक, संगीत संयोजक इ. सर्वांचे सुंदर सादरीकरण.  सभागृहात अखेरपर्यंत खुर्चीला खिळून राहिलेला प़ेक्षकवर्ग आणि या कार्यक्रमाचे एकूणच देखणे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.   सभागृहाच्या आसनक्षमतेच्या मर्यादेमुळे  कांही रसिकांना प़वेशिका मिळूं शकल्या नाहीत. 

या कार्यक्रमाला नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री. मदन पाटील साहेबांची भेट व दिवाळी शुभेच्छा यामुळे कार्यकर्त्यांना व आयोजकांना खूपच आनंद झाला.

या दिवाळी पहाट या कार्यक्रमाला यावेळी लाभलेल्या ७/८ पायोजकांमुळे फारच चांगले आर्थिक योगदान लाभले!  *मे.पितांबरी* यांचे मुख्य प़ायोजकत्व व अन्य कांही संस्था यांचेही मोलाचे प़ायोजकत्व व सहकार्य लाभले होते. यासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम, कष्ट खरोखरच वाखाणण्यासारखे होते. 

इमारतीच्या प़वेशद्वारापासून रेखाटलेल्या रांगोळ्या, सजावट, रोषणाई इ. सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मध्यंतरात सरचिटणीस श्री. अजय खामकर यांनी या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांचे गौरवपूर्ण शब्दात आभार व्यक्त केले. रसिक प़ेक्षकांबरोबरच कांही मान्यवरांची उपस्थिती कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारी होती. 

कार्यक्रमानंतर मे.लक्ष्मी कॅटरर्स यांच्याकडून स्वादिष्ट उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी मराठा मंडळाच्या अत्यंत शिस्तबद्ध,सुरेख आणि देखण्या आयोजनाबाबत मनापासून कौतुक व अभिनंदन केले. 

आजच्या कार्यक्रम आयोजनामध्ये खरोखरच उत्तम *टीमवर्क* जाणवले!  याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विविध समित्यांचे कार्यकर्ते, मंडळाचा सर्व सेवक वर्ग मे. लक्ष्मी कॅटरर्स या सर्वांचा उत्फुर्त सहभाग, व सहकार्य निश्चितपणे जाणवले! या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मनोभावे आभार सुद्धां. 

आजच्या उत्तम टीमवर्क मुळे सर्वांचाच उत्साह वृद्धिंगत झाला आहे.

शब्दांकन : श्री. रमेश शिर्के, अध्यक्ष- मराठा मंडळ मुलुंड, मुंबई

Diwali Pahat 2024