- October 21, 1996
- Posted by: horizon
- Category:
मुलुंड मधील तमाम मराठा बंधु भगिनींनी इच्छा बाळगलेल्या एका सांस्कृतिक केंद्र इमारत बांधकाम संकल्पनेला सुरवात झाली. या वास्तूशिल्पाच्या उभारणीसाठी मंडळाने वेळोवेळी अनेक उपक्रम, कार्यक्रम व योजना आखल्या. निधीपुस्तके, सभासद वर्गणी, नाट्यप्रयोग, बक्षिश योजना, स्मरणिका जाहिराती, देणग्या, ठेवी , कर्ज उभारणी इ. विविध मार्गांनी निधी उभारण्याचे काम चालू केले.
दिनांक २१ ऑक्टोबर १९९६ रोजी मंडळाच्या भूखंडावर सांस्कृतिक केंद्र इमारतीचा मंगल शुभारंभ भूमिपूजनाच्या देखण्या सोहळ्याने करण्यात आला. मंडळाचे एक हितचिंतक व मार्गदर्शक आदरणीय डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या शुभ हस्ते, मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री. गोपाळराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पायाभरणी सभारंभ करण्यात आला. स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने मंडळाने टाकलेले ते एक दमदार पाउल ठरले!