- October 15, 1978
- Posted by: horizon
- Category:
सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुलुंड या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक भूक भागवण्यासाठी आणि मुलुंड या उपनगरात नवीन रहावयास आलेला परंतु विखुरालेला मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन एकत्रितपणे उपाय शोधण्यासाठी १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचा जन्म झाला.
मंडळाच्या स्थापनेपूर्वी व नंतर वैचारिक व संघटनात्मक मार्गदर्शन देण्याचे , सुयोग्य दिशा देण्याचे काम मंडळाचे एक संस्थापक व माजी अध्यक्ष कै. पूज्य वसंतराव सकपाळ यांनी केले. तसेच कै. पूज्य वसंतराव सकपाळ, कै. पूज्य धनाजीराव कदम, कै. पूज्य चंद्रकांत देसाई, कै. पूज्य राजाराम महाडिक , सर्वशी जयरामराव भोसले , श्री. गोपाळराव भोसले, कृ. बा. शिर्के, रमेश शिर्के, प्रा. एकनाथ घाग , बळीराम माने इत्यादींच्या प्रयत्नातून मानस सरोवरातून मराठा मंडळ मुलुंड, मुंबई मुंबई हि गंगा उदय पावली.