ब्लॉग
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments“मनाच्या अंतरंगातून”
सौ.अंजली प्रभाकर पार्टे मार्च महिन्याचे दिवस. आम्ही सगळे काही कामासाठी वेंगुर्ले मुक्कामी गेलो होतो. सकाळपासून आकाश निरभ्र होते. हळूहळू सूर्यकिरणांचा दाह वाढू लागला. रोजच्यापेक्षा जास्त तीव्र वाटू लागला. दुपारपर्यंत कडक ऊन होते, पण भर दुपारी काही क्षणात ऊन्ह नाहीशी होऊन पावसाळी ढग जमू लागले. बघता बघता विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि क्षणात
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
स्त्री : आजची-कालची
सौ. शिल्पा लाड महिला दिनाचे औचित्य साधून आपण ८ मार्चला महिलादिन साजरा केला. सर्व कर्तृत्ववान महिलांना मानाचा मुजरा केला. खरं तर ३६५ दिवस महिलांचा सन्मान व्हायला हवा. . आपल्याकडे पूर्वी मातृसत्ताक जीवनपद्धती होती. आजही त्याचे धागेदोरे टिकून आहेत. ते आज अधिक बळकट व्हायला हवेत असे मला वाटते. मी आजच्या आणि कालच्या
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
“ती”
सौ.मीनल सावंत ती…….अगदी जन्माला आल्यापासून सर्वांची लाडकी! सगळ्यांच्या गळ्यातला जणू ताईत! तिचे सारे हट्ट पुरवणे, खूप लाड करणे हे ठरवून दिल्याप्रमाणे घडत होतं. . ती कधी मोठी झाली हे कळलंच नाही तीला. आता मात्र हळूहळू बंधनं यायला लागली. इथे जाऊ नकोस, वेळेतच घरी ये, हे बरं दिसत नाही, ते करू नकोस, आपल्या घराण्याच्या
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
संस्कार
सौ. सुषमा सावंत “काय तुम्ही आज कालच्या मुली ग, आई-वडिलांनी काही संस्कार केले की नाही की फक्त नोकऱ्याच केल्या” एक चिडलेला आवाज ऐकू आला आणि सहजच लक्ष त्या मोठ्या आवाजाकडे गेले. साधारण माझ्याच वयाची एक बाई एका वीस बावीस वर्षाच्या तरूणीवर रागवत होती. स्टेशनजवळच्या गर्दीत त्या बाईचा चेहरा मास्क वरील आठ्यांमुळे रागावलेला
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना…! सौ.विजया साटम.
कशी आणि कुठुकन सुरुवात करावी हे कळत नाहीय. मनुष्य जन्माला येतो त्या वेळी नियतीने नशीब ठरविलेले असते असे म्हणतात. पण कसे जगायचं आणि वागायचे हे थोरा मोठ्यांच्या संस्कारातुन घडायचं असते. आजी आजोबा, आई वडील यांचे आशिर्वाद आणि संस्कार मोलाचे असतात. असो! माझा जन्म कोकणात झाला. आम्ही सहा भांवडं. माझा नंबर चार. माझे वडील पोष्ट ऑफीस
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहाताना…! सौ. मनीषा सावंत.
१९८६ ची गोष्ट. मी जे.जे इस्पीतळात कक्ष क्रमांक ९ मधे कार्यरत होते. एके दिवशी रात्री २ वा. ३ वर्ष वयाच्या मुलीला घेऊन एक व्यक्ती धावतपळत आली.तिचं नाव कविता. त्यांच्या बरोबर अजून १०-१२ जणं आले होते. खूप सुंदर आणि गोड अशी मुलगी. पाणी मागत होती पण पाणी दिले की अतिशय घाबरत होती. याला हाय ड्रोफोबिया म्हणजे
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहताना…..! सौ.अंजली प्रभाकर पार्टे
दिपावलीच्या सायंकाळची वेळ !! कानावर भाऊबीजेचं गाणं पडलं “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,ओवाळीते भाऊराया,वेड्या बहिणी ची वेडी ही माया,” चटकन लहानपणीची आठवण आली. दुपारीच्या जेवणाचा थाट आगळा वेगळा असायचा.तिन्ही भाऊ पाटावर बसायचे, मी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढत असे. आईची नवीन साडी नेसता येत नसली तरी गुंडाळायचे व आईचे दागिने घालायचे. साडी सावरत हातात आरतीचे ताट घेऊन भावांना
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहताना…! चित्रलेखा शिंदे
मागे वळून पाहताना वाटते ते दिवस चांगले होते, जीवनाच्या प्रत्येक झाडावर आठवणींचे खोपे टांगले होते. मनाचा वेग कोणीच मोजू शकत नाही जसा झोका पुढे जाण्याआधी मागे गेल्यावरच म्हणजे भूतकाळात त्याला गती मिळते व तो भविष्याकडे झेपावतो व नंतर वर्तमानात स्थिर होतं तसेच मनाचे आहे. . आमच्या पिढीने समाजात होणारा मोठा बदल पाहिला आहे व त्याबरोबर
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना …..! सौ. शिल्पा नलावडे
माझ्या आयुष्याचे पुस्तक, निम्म्याहून जास्त वाचून , अनुभवून झालं.अजून काही पुढचे भाग आहेत वाचायचे . पुढच्या भागात काय आहे माहित नाही पण मागचे मात्र सगळे भाग कसे स्वच्छ ,स्पष्ट आहेत ..लख्ख प्रकाशा सारखे. आजही पुढचा मार्ग दाखवायला एकदम समर्थ.आपले विश्व म्हणजे आपले घर ,कुटुंब, नोकरी आणि परत घर या मध्येच असतं.कुटुंब म्हणजे लग्नाआधी माहेर आणि
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मागे वळून पाहतांना….! साै. शाेभा वि. सावंत
जरा विसावू या वळणावर……..या वळणावर! . आज मी वयाच्या सत्तरीच्या जवळ आलेली माझ्या नातवंडांची आजी आहे. मी नातवंडांबराेबर असताना त्यांना बघून मला माझ्या बालपणाच्या गोष्टी आठवतात. . माझे बालपण लालबाग मधील इमारतीत गेले. त्यावेळी आम्ही शेजारी मुले मुली एकत्र खेळायचाे, अभ्यास करायचो, तसेच भांडायचो, पण भांडण विसरुन पुन्हा एकत्र यायचाे. सार्वजनिक गणपती बघायला, राणीच्या बागेत