ब्लॉग
-
- July 28, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Commentsमराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन शनिवार दि. १६/०७/२०२२ रांगोळी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात झाली. २५ ते ३० जणांचीच बॅच असेल असे वाटत असताना तब्बल ३७ जणांनी सहभाग घेतला. खूप छान प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात, मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वर भालेराव,सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर
-
- June 15, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..!
माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..! थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून, नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माणसाच्या माणुसपणाशी पोहचलेली फिल्ममेकर सुमित्रा भावे…
सौ.ऐश्वर्या ब्रीद, . मानवी नातेसंबंधांच्या वेगवेगळया सकस अनुभवांचे संकेत आपल्या कलाकृतींतून ज्यांनी दिले, ज्यांचे सिनेमे पाहत आपली पिढी मोठी झाली त्या ज्येष्ठ निर्मात्या, दिग्दर्शिका, कथा, संवाद, पटकथाकार, गीतकार, समाजसेविका अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या तब्बल ७ राष्ट्रीय आणि अनेक राज्य पुरस्कार मिळविलेल्या ‘फिल्ममेकर सुमित्रा भावे’ यांची आपल्यातून कायमची एक्झिट मनाला चटका लावून गेली. वयाच्या ७७ व्या
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
“आनंदाचे डोही आनंद तरंग..!”
सौ. ऐश्वर्या ब्रीद . आनंद म्हणजे नेमकं काय हो? प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असणार. खरं तर आनंद ही एक मनाची सकारात्मक अवस्था आहे. मनाचे समाधान म्हणजे आनंद! . प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतो. अजिबात घाई न होता मस्तपैकी पकडलेली लोकल किंवा मिळालेली सीट, लोकलमधील आपला टपरी घोळका, चांगल्या हुद्द्याची नोकरी, भरमसाट पगार, स्वतःचे
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
एक अविस्मरणीय प्रसंग
सौ.प्राची पालव . प्रत्येकाचे आयुष्य हे विविध कडू /गोड आठवणींनी भरलेले असते. पण काही विशिष्ट आठवणी, प्रसंग आयुष्यात असे घडून गेलेले असतात की, आपण ते कधीच विसरू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी शक्य नसते. माझ्याही आयुष्यात असे बरेच चांगले वाईट प्रसंग येऊन गेलेत. जीवनात आलेले चढ-उतार, चांगल्या-वाईट प्रसंगातूनच आपले आयुष्य
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपली मुंबई
सौ. मनिषा सावंत . मुंबई …..मुंबई मध्ये ई हा शब्द आहे आणि आई मध्ये सुद्धा हा शब्द आहे आई जशी आपल्या मुलांना तिच्या पदरात सामावून घेते तसेच काहीसे मुंबई आपल्या सगळ्यांना सामावून घेणारे शहर आहे. नोकरी, शिक्षण अशा विविध कारणास्तव भारताच्या कानाकोपऱ्यातून नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक रोज मुंबईला येतात काही स्वप्नं घेऊन तर काही आकांक्षा
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
।। देह देवाचे मंदिर ।।
शब्दांकन …. सौ.प्रमिला सावंत. . आपल्या उदार धर्मामधे देवाचे स्वरूप ठरवण्यास स्वातंत्र्य असतं. देव सगळ्या चराचरात असू शकतो .देव आकाशात आहे,देव पाषाणात आहे,दीनदुबळ्यात आहे, देव आपल्या ह्रदयात वसलेला आहे .आपल्या शरीराला पवित्र माणून त्याची देखभाल करणारे अभावाने आढळतात.परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे फक्त सांगण्या,ऐकण्यासाठी असते. जसं “देह देवाचे मंदीर,आत आत्मा परमेश्वर । जशी
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
गोष्ट एका मुकीची
सौ. कल्पना राणे. दोन दिवसापूर्वी मुकी गेल्याची बातमी समजली व मनाला चटका लावून गेली. साधारण ५० वर्षांपूर्वी आम्ही मुलुंडला राहायला आलो. शेजारच्या काकूंकडे मोलकरणीची चौकशी केली. दुसर्या दिवशी काकू एका बाईला घेऊन आल्या. तिने कामाला सुरूवात केली. . बाईंच नाव दुर्गा सांगण्यात आल. गव्हाळ वर्ण, कपाळावर रुपयाएवढा ठसठशीत कुंकवाचा टिळा, दोन्ही हातात भरपूर हिरव्या
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आशा भोसले
संकलन …. सौ.विजया. शा.साटम नमस्कार मैत्रीणींनो…..! . आपल्या सर्वांची आवडती गायिका आशा भोसले यांच्या जीवनपटावर आजचा लेख आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काही दिवसांपूर्वी २०२० चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने जाहीर केला. आशा भोसले भारतीय लोकप्रिय गायिका आहेत. आशा भोसलेंनी गजल,भजन,शास्त्रीय संगीत तसेच फिल्म गीत यासाठी आवाज
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
कथा : सांगावा
शब्दांकन….. सौ.चित्रलेखा शिंदे. . मे म्हईन्याचं रणरणतं ऊन, सूर्य निस्ता आग वकत व्हता. काल सांगावा आल्यापास्नं राधिच्या जीवाला थारा नव्हता. श्रीपती दादाचा फोन आला व्हता कि, आण्णांना जास्त झालंय अन तुझा जोसरा काढलाय. तू असशील तशी निघ. तुझ्यात जीव घुटमळलाय, तुझ्या वाटकडं डोळं लावून बसल्यात. बातमी ऐकली आणि तिच्या हाता पायातनं जीव गेल्यागत खाली बसली.