सेकंड इनिंग

दररोज सकाळी सगळ्यांची घाई. नातीची शाळा, मुलाची मुलीची सुनेची ऑफिसला जाण्याची घाई . या सगळयात मॉर्निंग वॉकला जायचं राहूनच जायचं. एक दिवस शनिवारी सगळ्यांना सुट्टी होती त्या दिवशी आमच्या शेजारच्या बागेमध्ये मी ठरवून चालायला गेले. बागेच्या दरवाजातच मी एकदम दचकले मोठा हसण्याचा आवाज आला. मी थोड्या साशंक नजरेने आत पाहिले तर सत्तर-ऐंशीच्या वर ज्येष्ठ नागरिक बागेमध्ये जोरजोरात हसत होते .मी वॉकिंग ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली पण माझं लक्ष सगळं या लोकांकडे होतं. आता घरी सगळ्यांनी सांगितलं की तू मॉर्निंग वॉकला जात जा मागच्या कामाची  चिंता करू नकोस. दोन-तीन दिवसात या ग्रुप मध्ये   मी कधी गेले हे मला कळलंच नाही .आणि हळूहळू मी त्यांच्यातलीच एक झाले. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नवीन मैत्रिणी झाल्या.
.
हा ग्रुप म्हणजे मुलुंड पूर्व येथील मनोरंजन हास्य क्लब. चेनानी व गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली दररोज व्यायाम प्रकार होऊ लागले. पाच वर्ष या ग्रुप मध्ये मी पण सभासदआहे आम्ही दिडशे मेबर  आहोत. ..आमचे एक कुटुंबच झालं आहे. आम्ही प्रत्येकाचा वाढदिवस , प्रत्येक सण,राष्ट्रीय सण आनंदाने साजरे करतो.  व्यायाम संपले की आम्ही छान पैकी सगळ्याजणी वेगवेगळ्याविषयावर चर्चा गप्पा करतो .मैत्रिणीशी बोलायला कोणाला आवडत नाही ? आमची घट्ट मैत्री झालेली आहे .
.
यामुळे सगळा दिवस  खूप  उत्साहात जातो. आम्ही सगळे मिळून छोट्या-मोठ्या पिकनिकला सुद्धा जातो .एकमेकांची काळजी घेत एकमेकांना सांभाळत पिकनिकची मजा  खूप लुटतो. आमची सेकंड इनिंग चालू आहे. आपल्या बरोबरीचे आजारी असतील तर त्यांची काळजी घेणे त्यांची विचारपूस करणे व लवकर बरे होण्यासाठी  मनोबल वाढविणे . या सगळ्या गोष्टी ने आपलेपणा टिकून आहे .आम्ही सर्व  सणाना गोड पदार्थ पण एकमेकांना देतो.
.
हे सगळे आमचे एक स्टॅंडर्ड फॅमिली मेंबर आहेत. या क्लब च्या वर्धापना दिवशी आम्ही  गेले पाचवर्ष सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतो. कुणाच्या  गुडघ्याचे ऑपरेशन झालंय कुणाला त्रास आहे पण या सगळ्यावर मात करून   हौसेने आम्ही सर्व कार्यक्रमात भाग घेतो. आणि हो वन्स मोअर पण घेतो .या क्लब मुळे आपल्याच परिसरातील लोकं खूप ओळखायला लागले आहेत. रस्त्याने जाताना असं कधी होत नाही कोणी मैत्रीण भेटली नाही .आणि त्यांनी माझी विचारपूस केली नाही .या क्लबमध्ये बरेच  जण 50  ते 80 वयोगटातली  आहेत पण सगळेजण मनाने तरुण आहोत.   
.
सगळ्यांचे पूर्व जन्मातले काही ऋणानुबंध असतील म्हणून की काय आम्हा सगळ्यांची भेट झाली.काही मेबर तर घरी एकटेच असतात. पण या  क्लब मुळे त्याच्या शारीरीक व मानसिक तेत बदल घडून आला.क्लबमध्ये आम्ही शेवटी सर्व  प्रार्थना म्हणतो. ती मी सगळ्यांसाठी म्हणते.मैसंसार का सबसे सुखी प्राणी हु .मै संसार का सबसे स्वस्त प्राणी हु .मै सबका कुशल मंगल चाहती हू. आता करोना मुळे आम्ही भेटू शकत नाही याची खंत वाटते. माझी देवाकडे  प्रार्थना  आहे  हे कोरोना चे संकट जाओ व आम्हा सगळ्यांची भेट होवो. 
.
सौ. शैला नलावडे


Leave a Reply