आपलं मुलुंड

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सौ. शिल्पा कट्टी (शिर्के)
रुबी, मुलुंड पश्चिम

आपलं मुलुंड

मुंबई शहराचे सेंट्रल साईड चे शेवटचे उपनगर म्हणून ओळखले जाणारे हे “आपले  मुलुंड”. मूलकुंड यावरून आपल्या या परिसराला मुलुंड हे नाव पडले.(याचा संदर्भ अर्थातच “गुगल गुरू”)               
.
तर अशा या मुलुंडची नाळ माझ्यासोबत जोडली गेली ती माझ्या जन्मापासूनच. माझा जन्म मुलुंडचाच. शालेय शिक्षणही मुलुंड मध्येच. अगदी मुंबई महानगरच्या कॉलेज मध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरले तीही या मुलुंडमुळेच.          
.
पश्चिमेला असलेले महाकवी कालिदास नाट्यगृह, खेळाची मैदाने,जलतरण तलाव, विविध अंगी वापरण्यासाठी छोटे हॉल  हे सर्व तर मुलुंडची शानच. गुण्यागोविंदाने राहणारी विविध जातीधर्माची माणसे माणुसकी जपत आहेत. विविध कला,उपक्रम राबवत आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे हे आपले मुलुंड!! 
.
‘एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ’ हे अगदी मुलुंड ने सार्थ ठरविले आहे. २६ जुलै चा जलमय करणारा पाऊस असो, महानगरातील बॉंब हल्ले असो की अगदी आताची कोविड-१९ ची महामारी असो,प्रत्येक संकटात मुलुंड खंबीरपणे उभे आहे. आणि या साऱ्याला पाठबळ देणारे निष्णात डॉक्टर्स, फॉरटीस सारखे इस्पितळ, विविध नावाजलेल्या शाळा, महाविद्यालय, मोठे राजकारणी लोकही इथलेच. पहिली हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ही आपल्या मुलुंडच्या फॉरटीस मध्येच यशस्वी झाली. पूर्वेला असणारे मराठा मंडळ,मुलुंड इथे होणारे विविधरंगी कार्यक्रम , चालणारे उपक्रम तर अगदी वाखाणण्याजोगेच.   
.
म्हणूनच असे हे आपले मुलुंड “उपनगरांचा राजकुमार” हे बिरुद मिरवत आहे. आणि अशा या मुलुंडचा मी मुलुंडकर  असल्याचा मला रास्त अभिमान आहे!!


Leave a Reply