- February 7, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*मुक्त अभिवाचन*
३ जानेवारी २०२४ रोजी आपल्या मंडळातील एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम *मुक्त अभिवाचन* खरोखरच खूपच छान! सर्व वाचकांचा पहिलाच प्रयत्न असूनसुद्धा कोणीही वाचक कुठेच कमी पडले नाहीत.
एकूण २३ सहभागी वाचकांनी निरनिराळ्या विषयांवर आधारित अभिवाचन केले. प्रत्येक विषय खूप विचारपूर्वक निवडलेला. कल्पना राणे, मालती सावंत इ. चे विशेष कौतुक की वयाचा विचार न करता, अशा साहित्यिक कार्यक्रमात निडरपणे माईक समोर उभे राहून अभिवाचन करताना आवाजात कुठेही कंप नाही ही की ताण नाही. शिल्पा लाड, विजया साटम यांच्या सळसळीत उत्साहाला पाहून खरच नवल तर वाटतेच पण प्रेरणा मिळते. सर्वच मैत्रिणींनी आणि इतर वाचकांनी खूपच छान सादरीकरण करून, आम्ही हेही करतो हे दाखवून दिले.
संपूर्ण कार्यक्रम नितांत सुंदर होण्याचे आणखी एक कारण म्हणजे कार्यक्रमाला लाभलेल्या, तेवढ्याच सुंदर मनाच्या,सौम्य आवाज असलेल्या, मराठी साहित्याचा प्रचंड अभ्यास असलेल्या प्रमुख पाहुण्या डॉ.वीणा सानेकर! यांचा परिचय ओळख इतकी लांबलचक की संपता संपेना. इतकं शिक्षण, या क्षेत्रातलं त्यांचं कार्य, मराठी शाळा वाचविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड या सर्वाला सलाम! डॉ.वीणा सानेकर या माझ्या पालक मैत्रीण. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. मंडळात त्यांना अजून काही ओळखीच्या मैत्रिणी भेटल्या आणि मग काय एकच कौटुंबिक, काहीही औपचारिकाता नसलेला माहौल तयार झाला होता. त्यांनी केलेले वाचकांसाठी मार्गदर्शन तर खूपच अभ्यासपूर्ण, सहज, सोपे, सुंदर असे. मला तर असे वाटते की यामुळे कार्यक्रमाला आणखी चार चाँद लागले. साटम काकींचे व्यासपीठावरील वावरणे,आभारप्रदर्शन खूप छान.आम्हाला खरच प्रेरणादायक. संजय परब यांचे सूत्रसंचालन भाव खाऊन गेले. चारोळी काय, मधे मधे पेरलेले विनोद काय.खरच सहज असे सूत्रसंचालन सर्वांना भावले.
वाचनालय व अभ्यासिका विभाग प़मुख सौ. मिनलताई सावंत, निमंत्रक श्री. प़काश पालव, सूत्रसंचालक श्री. संजय परब आणि या सर्वाना उत्तम मार्गदर्शन, सहकार्य आणि दिग्दर्शन करणारे मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. वसंतराव भोसले, तसेच उत्तम आभारप्रदर्शन करणार्या सौ. विजया साटम या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन! विशेषत: या अभिवाचनामध्ये सहभाग घेणारे सर्व वाचक होते म्हणूनच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला.
मंडळाचे सन्मानीय सभासद श्री. हेमंत भोगले यांनी स्वरचित कवितेचे अभिवाचन.. कवितेचे शिर्षक आहे, *अभिवाचन*..
बसल्या जागेवर वेगळ्या विश्वात जो मनाला पंख
लावून फिरवुन आणतो तो खरा अभिवाचक..
एका एका शब्दाने गुंफलेली वाक्यांची मालिका,
त्यातील भाव आत्मसात करत केलेले ते अभिवाचन..
कथेत कथाकाराची कल्पना, उद्दीष्ट
उमगली की सार सोपं..
मग एक एक धागा धरत, उलगडत
जावा सारा गौप्य..
खरं म्हणजे माझ्या बाबतीत
सांगायचं झालं तर..
आठवतं मला शालेय जीवनात वर्गात
धड्याचे तुटक फुटक केलेले ते वाचन..
आणि आता तर मराठा मंडळात वाचनाच्या
आधी अभि जोडला करायचे अभिवाचन..
तसं बरं का संधी मिळुनही रंगमंचावरुन
बोलन मी खरोखरच टाळतो..
गायला म्हणालात तर गाण म्हणेनही
पण माझं वकृत्व काय, ते मीच जाणतो..
हे खरंच आहे, प्रत्येक कलाक्षेत्रात
स्वतःला पहावं आजमावुन..
न जाणो आयुष्यात कशी, कुठे सरशी
होईल, म्हणुनच पहायचे पडताळून..
पुर्वी पहिल्यांदाच रसिकांच्या पुढे
गायनासाठी उभा राहिलो घाबरत..
गाण्याचा कागद राहिला फडफडत,
प्रयत्न केले तरी हात होता कापत..
नवोदितांच्या काहींच्या बाबतीत
सुरुवातीला असंच घडत राहते..
आणि मग हळूहळू भिती कमी होत,
सुरळीत जडणघडण होत जाते..
कथाकादंबरींचे लेखक कुशाग्र बुध्दीने
मांडतात आपल्या विचारांचे भांडार..
हेच भांडार वाचकांच्या विवेकी सद्बुद्धीला
चालना देत घडवतात साकार..
बरं कविता इथेच थांबवितो,
हे होते कवितेचे अभिवाचन..
आणि तुम्हा सर्व थोर मंडळींना
मनःपुर्वक अभिवादन..