कवितांची दिवाळी

दि. ३/१२/२०२३ रोजी सायं. ६.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड संचालित सरस्वती वाचनालय/ अभ्यासिका विभागातर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य, गझलकार, स्तंभलेखक,कथाकार श्री. मनोजजी सूर्यकांत वराडे सर यांचा ” कवितांची दिवाळी ” हा एकल काव्य कार्यक्रम सादर करण्यात आला.
संस्थेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/ निवेदन श्री मनोहर जुन्नरे यांनी करताना मंडळाचे कार्याध्यक्ष श्री महेशजी चव्हाण सरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
 
तद्नंतर मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी शिर्के सर आणि प्रमुख पाहुणे कविवर्य श्री मनोजजी वराडे सरांच्या हस्ते श्री सरस्वती देवीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले, सर्व सन्माननिय व्यक्तीच्या हस्ते समईतील दीप प्रज्वलीत करून कार्यक्रम सुरू करताना श्री मनोहर जुन्नरे यांनी प्रमूख पाहुण्यांची ओळख करून दिली , त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी शिर्के यांची प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
त्याचवेळी सरस्वती वाचनालय/ अभ्यासिका प्रमुख सौ.मिनल सावंत यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री . रमेशजी शिर्के सरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले .
आणि कार्यक्रम सुरू झाला , कविवर्य श्री. मनोजजी वराडे यांच्या एकल काव्यातून स्पष्टवक्तपणा, सुस्पष्ट सुमधुर आवाज दर्दी प्रेक्षकांच्या मनाचा , भावनांचा ठाव घेत कवितेतून प्रगट होताना कधी सायं. ८.०० वाजून गेले तरीही रसिक प्रेक्षक खुर्चीला खिळून बसलेला दिसत होता, त्यांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काव्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्कृष्टपणे साथ देताना कार्यक्रम भव्य उंचीवर नेऊन ठेवला .
सौ.मिनल सावंत यांनी प्रमुख पाहुणे , मंडळाचे सर्व पदाधिकारी , सर्व समितीप्रमुख सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. 
कार्यक्रमाची सांगता सौ करुणा सावंत यांच्या सुमधुर गोड आवाजातील पसायदानाने झाली ,त्यावेळी सभागृह मंत्रमुग्ध होताना सर्वजण एकरूप होऊन साथ देत होते.
यापुढेही असेच दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आपल्या सरस्वती वाचनालय/ अभ्यासिका विभागाचा प्रयत्न असेलच याची ग्वाही देत आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले.