मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३

मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३

दिनांक ०३ डिंसेबर २०२३ रोजी सकाळी ९.३०मराठा मंडळ ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य समिती आणि फोर्टिस हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ व स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तज्ञ्ज्ञ डाॅक्टरांकडून आरोग्य शिबिर पार पडले.या शिबिरात जवळ जवळ २०० नागरिकांनी भाग घेऊन लाभ घेतला. 

या आरोग्य शिबिरात Random Blood Sugar Check, Body Mass Index, ECG Check Up, Eye Check Up, Blood Pressure Check Up, Doctor Consultation, BMD, Cholesterol, Creatinine इत्यादी तपासण्यांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. रमेशजी शिर्के, मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर मंडळाचे कार्याध्यक्ष श्री महेश चव्हाण उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण यांनी दिपप्रज्वलीत करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरवात केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य समिति प्रमुख श्री.राजन भोसले यांनी उत्तम रीत्या केलं.

मंडळाचे सल्लागार, अध्यक्ष ,उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार यांच्या हस्ते फोर्टिस हाॅस्पीटलचे डाॅक्टर ,कर्मचारी वर्ग यांना पुष्टगुच्छ देऊन सन्मान करण्यांत आला.

   

उपक्रम यशस्वी करण्याकरिता संपूर्ण कार्यकारिणी, समन्वयक, सर्व उपसमित्या,ज्येष्ठ नागरिक समिती, यांनी अथक परिश्रम घेतले, ज्येष्ठ नागरिक समन्वय समितिचे प्रमुख श्री.राजन भोसले यांनी सर्वाचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.