- November 8, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रसन्न वातावरणात, रविवार दि ५ नोव्हेंबर रोजी हा वधू-वर पालक परिचय मेळावा मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला.
मराठा मंडळ, मुलुंडचे अध्यक्ष रमेश शिर्के आणि सरचिटणीस अजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वधू- वर सूचक
मंडळ समितीचे प्रमुख सदानंद दळवी व निमंत्रक श्रीकांत पालव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी या समितीचे सर्व कार्यकर्ते आणि अन्य समित्यांचे प्रमुख, निमंत्रक, कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, सल्लागार या सर्वांनी अपार मेहनत घेतली.
सुमारे १५० वधू-वरांनी या मेळाव्यासाठी नोंदणी करून हा मेळावा संस्मरणीय केला.
आमचे कार्यालयीन सेवक, कामगार, कर्मचारी, श्री. लक्ष्मी कॅटरर्सच्या प़ोप़ा.सौ.शामल चाळके,चंद्रशेखर चाळके, राहुल सरफरे, अनिल शितप आणि त्यांचे सहकारी,तंत्रज्ञ श्री. कुणाल शिंदे यांच्या सक्रिय सहभागामुळे हा मेळावा अत्यंत देखणा, शितबद्ध व लक्षात रहाण्यासारखाच झाला.
विशेषत: मेळाव्याच्या निवेदिका शुभदा म्हामूणकर, सोनाली सावंत व मनाली महाडिक यांनी या मेळाव्याचे खुमासदार पद्धतीने निवेदन करून उपस्थित प्रेक्षकांना, पालकांना व वधू-वरांना खिळवून ठेवले. उपस्थित प़ेक्षक,पालक याच्याकडून निवेदनाला मिळालेली दाद हा मराठा मंडळाचाच गौरव होता.