- December 22, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“मन करा रे सक्षम ” मानसिक आरोग्य विषयक व्याख्यानमाला
“मन करा रे सक्षम ” यावरील सर्वच डॉक्टरांची व्याख्यानमाला खुप छान होती. अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनाच्या आंदोलनांचे अभ्यास पूर्ण समालोचन होते. डॉक्टर शुभांगी पारकर आणि डॉक्टर सावंत यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होते.
या कार्यक्रमातून आपण डॉ.अश्विन सावंत डॉ.पाचपुते, डॉ. बर्वे, डॉ.पारकर विशेष मानसशास्त्र तज्ञ यांच्या अगदी साध्या भाषेत जे समाजाला गरजेचे व अभिप्रेत आहे हा गुरु मंत्र दिला.
कार्यक्रम अतिशय छान आणि सुसूत्र होता. सगळेच आपापल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी मार्गदर्शनासाठी आलेली आणि विषयदेखील आजच्या निकडीची गरज असलेल्या विषयावर हा अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त योग आपण घडवून आणला.
सगळ्यांच्या मार्गदर्शनानंतर डॉ. अश्विन सावंत यांचे मार्गदर्शन हे त्या सगळ्या वर शिरपेच किंवा कळस चढविल्यासारखे होते. त्यांच्या सांगण्यातील तळमळ ही थेट श्रोत्यांच्या मनाला भिडणारी होती.
*मन करा रे सक्षम* उत्तम अशा या मथळ्यानुसार आयोजित कार्यक्रम शांतपणे, अगदी सुसंस्कृत पध्दतीने साकार झाला. मुलुंडमध्ये डॉ. आश्विन सावंत आणि डॉ. सुचेता सावंत यांचा किती आदर आहे हे भरगच्च झालेल्या सभागृहामुळे लक्षात आले.
प्रवेशद्वारी नेहमीप्रमाणे ऐश्वर्या यांनी कार्यक्रमास अनुसरुन साकारलेली रांगोळी छान होती. प्रमोद देसाई, अजय माने आणि इतरांचे तिकीट विचारणे तसेच तिकीट विक्री हे कार्य सुरळीत सुरु होते. येणा-यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे तिकीट घेतले का ही विचारणा करत मी, सौ. दळवी, सौ. मिनल सावंत सभागृहाच्या दरवाजा जवळ होतो. आलेली छान सज्जन मंडळी हसत प्रवेश करत होती. मान देताना मान घेताना छान प्रसन्नता वाटत होती.
विशेष म्हणजे समाजाला उत्तमातील उत्तम देणे हा मानस असलेल्या मराठा मंडळाची या कार्यक्रमाला तिकीट विक्री पासुनची इतर वरदहस्त साथ ही महत्त्वपूर्ण होती.
विद्वत्तेनुसता वेगवेगळी स्वतंत्र क्षैली असलेल्या प्रत्येक डॉक्टरांनी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध यांना खुप काही मार्गदर्शन होईल असे दिले. त्यामुळे श्रोत्यांची मन तृप्त, प्रसन्न झालेली अनुभवली.
मंद शांत श्वासात ऐकत असलेल्या श्रोत्यांना डॉ. बर्वे यांनी ताठ बसुन श्वास उच्छवासाचे गणित समजवीले ते खुपच भावणारे, आचरणीय होते. हा उत्तम परिसंवादाचा सुंदर शिर्षक असलेला कार्यक्रम मन करा रे सक्षम. लक्षात राहील असा योग्य मार्गदर्शक ठरला.