जीवन त्याना कळले हो!

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई , मुंबर्ई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीवर्षी कांही दर्जेदार, हृदयस्पर्शी व करमणूक प्रधान कार्यक्रम साजरे केले जातात. या मालिकेतील अहवाल सालातील दि. १६ एप्रिल २०१७ रोजी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला पहिला कार्यक्रम म्हणजे “जीवन त्याना कळले हो”! माणूसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम रसिकाना एक समृध्द करणारा अनुभव देऊन गेला.