१२४ वी अत्रे जयंती

१२४ वी अत्रे जयंती 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २४ नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून प्राध्यापक सुहासिनी कीर्तिकर या उपस्थित होत्या, त्यानी आचार्य अत्रे यांच्या साहित्य लेखन या विषयावर आपले विचार मांडले.