- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
ऋणानुबंध
.
” वहिनी,निघते ग …….आई गेली!”
प्रियाचे शब्द कानी पडले आणि मी जिथल्या तिथेच थिजून गेले.काहीच बोलू शकले नाही.सर्रकन तेहतीस वर्षाचा काळ मागे गेले.
.
सासरी उंबरठ्यावर चे माप ओलांडून आले आणि अगदी जीवापाड प्रेम करणारी ताईमावशी बापू, माई मावशी,अण्णा मामा,केरकर आई अण्णा, लीला आत्या,किती किती नाती मिळाली.एक एक करून सर्वजण काळाच्या ओघात सोडून गेली.माझे वडील,मोठा भाऊ राजूदादा,प्रदीपभाई यांनी पण अर्ध्यावर साथ सोडलीच,खूप उणीव भासते सगळ्यांची.सगळे असायला हवे होते.पण म्हणच आहे ना! माणूस जन्मभर पुरत नसतो!.त्याला ते तरी कसे काय अपवाद असणार!.
.
अशीच ही प्रिया,आमच्या सख्या शेजाऱ्यांची, अंजु ताई,प्रकाश काका कुळकर्णी ची एकुलती एक लेक.उभयतां अतिशय लाघवी आणि प्रेमळ.उंबरठा ओलांडल्यावर लाभलेलं कुळकर्णी कुटुंबीयांच आणखी एक शेजारी नात.आजता गायत सोबत.कधी परके पणा जाणवलाच नाही.म्हणायला मध्ये एक भिंत,पण एकत्रित कुटुंबच होतो.सकाळी उठल्या पासून रात्री निजे पर्यंत सतत ये जा.त्यांच्या,आमच्या चुलीवर जे काही शिजेल ते एकमेकांकडे
पोचलच समजा.(कारण मध्ये भिंत ना!️) अनेक चालीरीती, सणवार,स्वयंपाक,
गोडधोड पदार्थ,माहेरी ही कधी शिकले नाही इतके काकूंकडूनच शिकले.त्यावेळी सासू सासरे गावी येऊन जावून असतं.त्यामुळे यांचाच जास्त(सासुरवास) सहवास.
.
आज जे काही बनवल्यावर “सुगरण आहेस हो” हे सर्टिफिकेट मिळत ते काकुंमुळेच.शतशः ऋणी राहीन त्यांची.त्यांच्या,आमच्या,कोणत् याही कार्यक्रमांमध्ये, नातेवाईकांच्या आधीच हजेरी आणि खूप मदतीचा हात.माझ्या लेकी ही हक्काने “अंजु आजी आज तुझी वाली गोळ्याची आमटी कर ना!,आणि प्रियाची मुल आल्यावर आपुलकीने साद घालत बिलगतात,यातच नात्याची वीण अधिक घट्ट असल्याची जाणीव होते आणि आज ही बातमी,सकाळी नाशिक वरून प्रिया येते काय, काकूंची ख्यालीखुशाली कळते काय आणि अचानक संध्याकाळी किडणीच्या आजारामुळे अकस्मात काकूंच्या निधनाची बातमी देते काय!सारेच अघटीत,काकांच्या पाठोपाठ,अवघ्या पावणेदोन वर्षातच काकुपण सोडून गेल्या.
.
आई इतकाच जीव लावला होता मलापण आणि माझ्या मुलींना सुद्धा.माझ्या आजारपणात कुटुंबाला दिलेला आधार,केलेली मदत,जे जे जवळचे गेले त्या प्रत्येक वेळेस
पाठीवर मोठा धीराचा मायेचा हात होता.आणि आज ती सोबत ते हातच….! उभयतांच असं जाणं खूप जीवाला चटका लावून गेलय.मन सुन्न झाले आहे.इतक्या वर्षाचे ऋणानुबंध संपुष्टात आले.
.
Sorry!. असे कसे होईल?अशी लाभलेली नाती विसरता कशी येतील,ती तर एक पुंजी आहे आयुष्य भराची.सदैव जीवापाड जपावित अशी.
.
म्हणूनच ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी…….भेटीत तुष्टता मोठी!