ते अठ्ठेचाळीस तास आणि मी   

.                                 
         सतत दोन दिवस ताप येत राहिला म्हणून आम्ही फोर्टिस मध्येच डॉक्टरांकडे तपासायला गेलो.त्यांनी एकदम ॲडमीटच व्हायला सांगितले,आणि हे काही मला नवीन नव्हते.पण सद्य  परिस्थितीत प्रकरण गंभीर होते.काट्याचा नायटा व्हायला नको म्हणून ॲडमीट व्हायचं ठरवलं,शिवाय अँटिबायोटिक्स दिल्याशिवाय इन्फेक्शन आटोक्यात येणार नव्हतं. डॉक्टरांनी” non covid” रुग्ण म्हणून दाखल करून घेण्यास सांगितले.emergency ward la ॲडमीट झाले खरी,पण संध्याकाळचे पाच वाजले तरी treatment काही सुरू करेनात,काय झालं म्हणून मुलींनी चौकशी केली तर त्यांना सांगितले की माझी ‘covid 19’ ची टेस्ट करावी लागेल.झाले इथेच पायाखालची जमीन सरकली,कारण डॉक्टरांनी तर मला शुगर वाढल्यामुळे celulitusche इन्फेक्शन आहे म्हणून ॲडमीट व्हायला  सांगितले आणि हे काय नवीन?पुरते गोंधळून गेलो होतो.पण त्यांचे म्हणणे की हॉस्पिटलच्या पॉलिसी नुसार आम्हाला ते करावेच लागेल.
.
       दरम्यान बऱ्याच वेळा मी नॉर्मल असल्याचं सांगितलं पण ते लोक काही ऐकायला तयार नव्हते.  शेवटी एकदाची टेस्ट साठी परवानगी दिली,तर आणखी एक धक्का पचवावा लागला,काय तर म्हणे यांना नॉर्मल वॉर्ड ला ठेवता येणार नाही,’सस्पेक्टेड फ्लोअर’ वर isolation madhe ठेवण्यात येईल ‘, आणि हा सर्व संवाद माझ्या पुढ्यात चालू होता, त्यामुळे मला काय करावे कळत नव्हते.तत्पूर्वी मी डोळे मिटून पडून असताना काही डॉक्टरांचे विचित्र न पटणारे संवाद ऐकले होते,एका बाजूला या परिस्थितीत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना देवदूत समजत होतो,पण इथे तर मला काही पैशांसाठी हपापलेले दानवही दिसत होते. आणखीनच घाबरले होते,मी यांना आणि मुलींना मला घरी घेवून चला म्हणून खुणवत होते, पण आता तर आमची सगळ्यांचीच “ना घर का ना घाट का” अशी अवस्था झाली होती.बिचाऱ्या त्या तरी काय करणार होत्या!मला बरे वाटावे म्हणुनच तर चालले होते सगळे. रात्री साडे नऊ वाजता एका ambulance  मधुन दुसऱ्या इमारतीत माझी रवानगी झाली. निघताना,मी सगळ्यांचाच,अखेरचा निरोप घेऊन निघाले,अगदी मला काहीही झालेलं नाही,हे माहीत असून सुध्दा निरवाणीच बोलत होते,तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या,नीट रहा,एकमेकांना जपा, आजी आजोबांना सांभाळा,अस बरच काही वेड्यासारखं बडबडत नजरे आड झाले,खूप रडू येत होत,त्या सगळ्यांचे ही डोळे पाणावले होते,चेहरे उतरले होते,पुढील अठ्ठे चाळीस तास कोणी कोणाला दिसणार नव्हतं.जो नवरा नेहमी म्हणतो तुला मी एकटीला कधीच सोडणार नाही,तोही काही करू शकणार नव्हता की ज्या मुलींचं माझ्याशिवाय पान ही हलत नव्हत,त्याही काही करू शकणार नव्हत्या. पण सतत धीर देणं चालू होत. अठ्ठेचाळीस तासानंतर काय?माझेच रिपोर्ट जर positive आले तर मग घरच्यांचं काय?  सगळं विचित्र झालं होत खर.
.
      डोकं नुसत भणभणत होत. सातव्या मजल्यावर एका प्रशस्त रूम मध्ये मन घट्ट केले आणि पाऊल टाकले आता ते दोन बेड असलेले जग फक्त माझे एकटीच असणार होत,सोडायला आलेला माणूस लगेच,जणू काही  त्याची जबाबदारी संपल्या सारखा निघूनही गेला,आणि एकदम रडायलाच आले.कॉल बेल नंतरही बऱ्याच वेळाने पूर्ण बंधिस्त वेशातली एक सिस्टर आली जिला मी बोललेल कळत नव्हतं, आणि तीच मला,कसे तरी हावभाव करून एकदाच सलाईन लावून ती निघून गेली,ताप नव्हताच सोबत होत्या त्या फक्त पायातल्या वेदना,आणि मनाला  लागलेल्या वेदना.बहुतेक गुंगीच medicine असेल आणि पायाच्या वेदने मुळे मला झोप लागली,ती पहाटे पाच ला जागं आली.दरम्यान कोणीच आले गेले नव्हते,सलाईन चालूच होती.सकाळी पूर्ण ppe किट मधली एक आया आली जिने लांबूनच आंघोळीचे पाणी दाखवले आणि निघून गेली.मी सर्व आवरून पुन्हा भयाण शांततेत बसून राहिले.
.
अधून मधून PPE  kit madhun येणारे प्रत्येक जण मला वेगवेगळ्या आकारातील कोरोनाचा विषाणू असल्यासारखे भासायाचे. मग सतत स्वामींचा धावा,तारक मंत्राचा जप चालूच होता. तेवढाच काय तो आधार वाटत होता.त्यांना आळवत होते स्वामी अशक्य ते शक्य करा,कोणताही अनर्थ येवू देवू नका.एरवी आराम मिळाला की वेळ नसतो आणि आता वेळच वेळ होता माझ्याकडे पण मनाच्या चलबिचल पणामुळे आराम वाटत नव्हता. घरून सगळे धीर देत होते.धीर देणारे पण घाबरलेलेच तर होते,समजत होते.आपापल्या परीने प्रयत्न करत होते.त्यांच्या समाधानासाठी मीही धीर एकवटत होते. खचून जावून उपयोग नसतो,शेवटी  तुमची स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ असावीच लागते तरच निभाव लागणे शक्य होते.पण एक मात्र त्या अठ्ठेचाळीस  तासांमध्ये स्वतःला ओळखायला बराच वेळ मिळाला.अध्यात्माकडे जरा जास्त कल वाढला.स्वामी कृपाच मंगळवारी सकाळी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी स्वतः डॉक्टरांनी येवून सांगितली आणि सगळ्यांचाच टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला,ताबडतोब नॉर्मल वॉर्ड ला शिफ्ट केले उर्वरित treatment चालू करुन पुढे पाच दिवसांनी सुखरूप घरी आले.
.   
       पण राहून राहून सतत विचार येतच होते,आज माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी तर सुसज्ज रूम मध्ये,शिवाय सतत धीर देणारी कुटुंबातली माणसं माझ्या सोबत होती,पण असे किती तरी लोक असतील ज्यांना या आजारातून जावे लागत असेल त्यांचे काय होत असेल? कसे सावरत असतील?कसे या आजारातून बाहेर पडत असतील? देव करो आणि हा विषाणू लवकर नष्ट होवो,पुन्हा सगळी परिस्थिती हसती खेळती आनंदी  होवो.आणि नक्कीच खात्री आहे. “अशक्य ही शक्य करतील स्वामी”…..!
.
सौ . विनिता उद्य दरेकर


Leave a Reply