आपलं मुलुंड

सौ. नागरत्ना सावंत
धनसंपदा, मुलुंड पूर्व
निवृत्त शिक्षिका

आपलं मुलुंड

ट्रेन मध्ये २ मैत्रिणींचा संवाद, मी तिसऱ्या सीट वर बसून डोळे बंद करून ऐकत होते. घरच्या ऑफिस च्या गप्पा झाल्यावर रिया नीताला म्हणते,”अगं मला ना आता मुंबईमध्ये छोट्या जागेत राहून कंटाळा आला आहे. आता मला कुठेतरी उपनगरात मोठी जागा घ्यायची आहे. पण पसंत पडत नाही. गैरसोयीचे वाटते. त्यावर दुसरी मैत्रीण नीता जी मुलुंडलाच राहणारी होती “अगं मग तू आमच्याकडे मुलुंडलाच का नाही बघत?
.
अगं रिया , मुलुंड म्हणजे अगदी सगळ्याच दृष्टीने सोयीचे आहे. आणि मुलुंड सेंट्रललाच आहे. शिवाय मुंबईतच येते. येथील वातावरणही छान आहे. गजबजाट अजिबात नाही. शिवाय लोकवस्ती चांगली, उच्चशिक्षित नोकरवर्ग असल्यामुळे लोकं सुजाण, सुसंस्कृत, सतर्क आहेत. सोसायटी ही फार चांगल्या चांगल्या आहेत.
हे बघ रिया, तू एकदा का मुलुंडला रहायला आलीस की अगदी कामवाल्या पासून ते पाळणाघर, पोळीभाजी सेन्टर्स, पार्लर्स, सहकार बाजार सारखी दुकाने ,फिश मार्केट वगैरे शिवाय मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनेही प्रीप्रायमरी, प्रायमरी, माध्यमिक, उचचमाध्यमिक, कॉलेज, ट्युशन कलासेस सर्व काही अगदी सुसज्ज व स्टँडर्ड आणि तुझ्या  ज्येष्ठ नागरिक सासू सासऱ्यांसाठी तर मुलुंडमध्ये भरपूर मनोरंजनाची  साधने आहेत. वेस्टला  कालिदास नाट्यगृह, थिएटर शिवाय चिंतामणराव देशमुख गार्डन, संभाजी गार्डन, समर्थ गार्डन वैगरे तसेच विरंगुळा केंद्र,जिव्हाळा कट्टा,योग कट्टा,महाराष्ट्र सेवा संघ,मुलुंड मराठा मंडळ,मैत्रेयी,ही सर्व मुलुंडकरांसाठी मोठी पर्वणी.
.
या सर्वांसाठी राजकीय कार्यकर्ते स्वतः लक्ष घालून लोकसंग्रहासाठी व मुलुंडच्या विकासासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवितात.त्याचबरोबर  वैद्यकीय सोयी सुविधा व उचचविद्याविभूत डॉक्टर्स व हॉस्पिटल भरपूर आहेत. उदा. आशीर्वाद, अदिती,फॉरटीस वैगरे दुसरं म्हणजे धार्मिक आवड असणाऱ्यासाठी मुलुंडला स्वामी समर्थ मठ,कळवतीआई मंदिर, गणेश मंदिर वैगरे. येथे कार्यक्रमही भरपूर असतात.
.
तर हे बघ रिया,तुला मी थोडक्यात मुलुंड विषयी सांगायचा प्रयत्न केला. आणि मी तिला दुजोरा दिला.हो मीही गेली ४० वर्षे मुलुंडलाच राहतेय. माझा ही हाच अनुभव आहे. तर बघ तू विचार कर. “अस्सं सुरेख मुलुंड बाई,येथे राहून पाहावे.”


Leave a Reply