- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments

सौं . पुष्पलता मोहिते
सागर दीप, मुलुंड पूर्व
निवृत उप मुख्याध्यपिका
आपलं मुलुंड
.
मुंबई महानगराच्या पूर्व उपनगरातील सुंदर माझं गाव आणि मुलुंड त्याचं नाव. मुलुंडकरांना सार्थ अभिमान वाटावा असे हे गाव. ज्याचे नाव उच्चारताच कोणाच्याही भुवया उंचावल्या शिवाय राहत नाहीत. असे हे आपले मुलुंड.
कसे आहे बरे आपले मुलुंड? सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिकतेने नटलेले. श्री. नितिन देसाई, श्री. भा.ल.महाबळ, श्रीम.विजया वाड या व अश्या अनेकांमुळे मुलुंडचे नाव सर्वार्थाने मोठे झाले आहे.
आपल्या मुलुंडमध्ये केळकर कॉलेज, एम्. सी.सी., आय.टी. आय, अशा नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत. या संस्थांनी नामांकित चित्रकार, सिनेस्टार, अनेक गायक-गायिका अशी रत्ने देशाला दिली.
मुलुंड हे वनराईने, पशुपक्ष्यांनी नटलेले आहे. बगीच्यांचे गाव आहे. चिंतामणराव देशमुख सारखी अप्रतिम बाग येथे आहे. नाट्यवेड्या मराठी माणसांसाठी कालीदास नाट्यगृह येथे आहे. तरणतलाव, विरंगुळा, महाराष्ट्र सेवा संघ यांसारखी साहित्यिक मेवा देणाऱ्या संस्था आहेत. अनेक भगिनी मंडळे येथे आहेत. तसेच लोकांचे मानसिक स्वास्थ्य जपणारी मनशक्ती संस्था आहे.
मुलुंडचे भूषण म्हणाल तर मराठी माणसांनी एकत्र येऊन उभारलेली “मराठा मंडळ” ही संस्था. त्याचे वर्णन म्या पामराने काय करावे? श्री.वसंतराव सकपाळ, श्री.भोसले, श्री. सुधाकर महाडिक, श्री.चंद्रकांत देसाई या व इतर अनेकांच्या प्रेरणेतून, अथक परिश्रमातून, निरपेक्ष भावनेतून उभारलेली ही संस्था म्हणजे मुलुंडकरांचा अभिमानच.
मुलुंड म्हणजे उत्सवांचे माहेरघर. अनेक उत्सव येथे साजरे होतात. लॉकडाऊनच्या काळातही मुलुंडकरांनी कौतुकास्पद कामे केली. असे हे आपले मुलुंड विविधांगांनी नटलेले, शांत,स्वच्छ, मराठमोळ्या माणसांचे गाव. ह्या गावात आपण राहतो. आपण खरेच भाग्यवान!!